advertisement

Sankashti Chaturthi 2026: संकष्टीचा उपवास अचूक वेळेवर सोडा; आपल्या गाव-शहरांनुसार चंद्रोदय किती वाजता होईल

Last Updated:

Sankashti Chaturthi 2026: चंद्रोदयाचा वेळ हा संकष्टी चतुर्थीच्या व्रतामध्ये अत्यंत महत्त्वाचा असतो कारण चंद्रदर्शन घेतल्याशिवाय हा उपवास पूर्ण होत नाही. प्रत्येक शहराच्या भौगोलिक स्थानानुसार चंद्रोदयाची वेळ वेगवेगळी असते, त्यामुळे आपल्या शहरातील निश्चित वेळ...

News18
News18
मुंबई : संकष्टीचा उपवास महाराष्ट्र कित्येक लोक करतात. आज शुक्रवार, 6 मार्च 2026 रोजी संकष्ट चतुर्थी आहे. हिंदू धर्मात संकष्ट चतुर्थीला विशेष महत्त्व असून हा दिवस अडचणी दूर करणारा देव श्री गणेशाला समर्पित आहे. भाविक या दिवशी पहाटेपासून उपवास धरतात आणि रात्री चंद्रदर्शन झाल्यानंतर गणपतीची पूजा करून व चंद्राला अर्घ्य देऊन आपला उपवास सोडतात. शुक्रवारी ही चतुर्थी आल्याने याला शुक्रवारी संकष्टी चतुर्थी असे म्हटले जाते.
या दिवशी खऱ्या श्रद्धेने गणेशाची आराधना केल्यास जीवनातील सर्व संकटे दूर होतात आणि रखडलेली कामे मार्गी लागतात. पूजेदरम्यान गणपतीला दुर्वा, लाल फुले आणि मोदकाचा नैवेद्य अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते. संकष्टी या शब्दाचा अर्थच संकटातून मुक्त करणारा असा होतो, त्यामुळे अनेक लोक कौटुंबिक सुख आणि समृद्धीसाठी हे व्रत आवर्जून करतात.
advertisement
चंद्रोदयाचा वेळ हा संकष्टी चतुर्थीच्या व्रतामध्ये अत्यंत महत्त्वाचा असतो कारण चंद्रदर्शन घेतल्याशिवाय हा उपवास पूर्ण होत नाही. प्रत्येक शहराच्या भौगोलिक स्थानानुसार चंद्रोदयाची वेळ वेगवेगळी असते, त्यामुळे आपल्या शहरातील निश्चित वेळ जाणून घेऊनच पूजेची तयारी करावी. दाते पंचांगानुसार 6 मार्च 2026 साठी महाराष्ट्रातील प्रमुख शहरांची चंद्रोदय वेळ खालीलप्रमाणे आहे.
advertisement
अकोला - 21:03, अमरावती - 21:00, अलिबाग - 21:18, अहिल्यानगर - 21:11, ओझर - 21:16, कल्याण - 21:18, कोल्हापूर - 21:11, जळगाव - 21:09, जालना - 21:07, ठाणे - 21:18, धाराशिव - 21:04, धुळे - 21:13, नांदेड - 21:00, नागपूर - 20:55, नाशिक - 21:16, पंढरपूर - 21:07, परभणी - 21:03, पाली - 21:17, पुणे - 21:14, पुळे - 21:15, बीड - 21:06, बुलढाणा - 21:06, भंडारा - 20:53, भुसावळ - 21:09, महाड - 21:17, मुंबई - 21:19, मोरगाव - 21:12, यवतमाळ - 20:58, रत्नागिरी - 21:15, रांजणगाव - 21:13, लातूर - 21:03, वर्धा - 20:57, वेंगुर्ले - 21:12, छ. संभाजीनगर - 21:09, सांगली - 21:09, सातारा - 21:12, सावंतवाडी - 21:11, सिद्धटेक - 21:10, सोलापूर - 21:05.
view comments
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Sankashti Chaturthi 2026: संकष्टीचा उपवास अचूक वेळेवर सोडा; आपल्या गाव-शहरांनुसार चंद्रोदय किती वाजता होईल
Next Article
advertisement
पेट्रोल पंप समोर लाइन लावावी लागणार का? इंधनाचा साठा किती दिवस पुरणार, कोणालाच माहिती नाही भारताचा 'बॅकअप प्लॅन'
पेट्रोल पंप समोर लाइन लावावी लागणार का? इंधनाचा साठा किती दिवस पुरणार
  • पेट्रोल-डिझेलच्या साठ्याबाबत मोठी अपडेट

  • जाणून घ्या किती दिवस पुरेल तेलसाठा

  • भारताचे 'ऑईल सिक्रेट' पहिल्यांदाच कळाले

View All
advertisement