Numerology: दैनिक अंकशास्त्र! शुक्रवारचा दिवस 1 ते 9 मूलांकाना कसा असेल, भाग्याची साथ

Last Updated:

Numerology 04 September 2025: ज्योतिषशास्त्राप्रमाणेच अंकशास्त्रही महत्त्वाचं असतं. अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 05 सप्टेंबर 2025 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल, त्याबद्दल ज्योतिषी चिराग दारूवाला यांनी सांगितलेलं भविष्य जाणून घ्या.

News18
News18
नंबर 1 (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19, 28 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
आज शुक्रवारी मित्र आणि जवळच्या नातेवाईकांकडून मदत मिळू शकते. काही लोक त्यांच्या स्वार्थासाठी तुमची दिशाभूल करू शकतात. त्यामुळे अशा लोकांपासून सावध राहा. कठोर परिश्रमामुळे करिअरमध्ये यश मिळू शकते. जोडीदाराला वचनबद्धता दाखवण्यासाठी दिवस चांगला आहे.
Lucky Number : 1
Lucky Colour : Light Brown
नंबर 2 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20, 29 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
advertisement
आज शुक्रवार थोडा अडचणीचा असू शकतो. भावंड किंवा जवळच्या मित्राशी भांडण होऊ शकतं. त्यामुळे संयम बाळगा. जमीन किंवा मालमत्तेचे नुकसान होऊ शकते. दूरच्या ओळखीतून पैसे मिळतील. तुम्ही प्रेमाच्या मूडमध्ये असाल.
Lucky Number : 6
Lucky Colour : Crimson
नंबर 3 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21, 30 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
advertisement
आपल्यासाठी शुक्रवारचा दिवस त्रासदायक असू शकतो. भावंडांशी वाद झाल्यानं चिंता वाढेल. दिवसभर थकवा जाणवेल. आता व्यायाम करण्याची वेळ आली आहे. तुमच्याकडे खास कौशल्य आहे. तुम्ही ज्या गोष्टीला स्पर्श करता, तिचं सोनं होतं. जागरूक राहा. कारण ज्या व्यक्तीशी उर्वरित आयुष्य शेअर करायचं आहे, अशी व्यक्ती तुम्हाला भेटू शकते.
Lucky Number :17
advertisement
Lucky Colour : Lavender
नंबर 4 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22, 31यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
खरं आणि अफवा यातील फरक ओळखा. आरोग्य कमकुवत असेल. त्यामुळे ताण घेऊ नका. प्रयत्न केल्यास नफा मिळू शकतो. तसेच पैसे देखील कमवता येतील. नुकत्याच भेटलेल्या एखाद्या व्यक्ती सोबत डेटवर जाताना दोनवेळा विचार करा.
advertisement
Lucky Number : 18
Lucky Colour : Indigo
नंबर 5 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 5, 14, 23 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
तुमचा कल तात्त्विक विचारांकडे असेल. मुलं नकारात्मक विचार करत आहेत असं वाटू शकतं. आरोग्याची काळजी घ्या. विविध स्रोतांतून पैसे मिळू शकतात. तुमच्या आणि जोडीदारामध्ये कोणीतरी उभं ठाकलं आहे. त्यामुळे आता कृती करण्याची वेळ आली आहे.
advertisement
Lucky Number : 9
Lucky Colour : Sandy Brown
नंबर 6 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 6, 15, 24 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
न्यायालयात कायदेशीर वाद सुरू असेल तर त्यामुळे तुमच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. एखादं वाईट स्वप्न पडल्यानं त्रस्त असाल. नोकरी नीरस वाटू शकते. नात्यासाठी दिवस चांगला आहे. रागावर नियंत्रण ठेवा म्हणजे स्वभाव चांगला राहील.
advertisement
Lucky Number : 2
Lucky Colour : Orange
नंबर 7 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 7, 16, 25 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
तुमचा कल तत्त्वज्ञानाकडे असेल. तुम्ही निवांत मूडमध्ये असाल. आरोग्य चांगले राहील. चैनीच्या वस्तूंवर जास्त खर्च करण्याची ही वेळ नाही. विवाहाची बोलणी निश्चित करण्यासाठी दिवस चांगला आहे.
Lucky Number : 7
Lucky Colour : Yellow
नंबर 8 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 8, 17, 26 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
घरात वडिलांशी किंवा कुटुंबात संबंध ताणले जातील. तुम्ही बाहेर जेवायला जाऊ शकता. कोणत्याही प्रकारचा वाद तुमच्यासाठी नुकसानदायक ठरू शकतो. तुम्हाला चांगल्या कामासाठी बक्षीस मिळेल. जोडीदाराच्या निष्ठेबद्दल मनात असलेला अविश्वास तुम्हाला त्रासदायक ठरेल.
Lucky Number : 1
Lucky Colour : Light Red
नंबर 9 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 9, 18, 27 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
अनावश्यक वाद टाळा. डोक्याला दुखापत होण्याची शक्यता असल्याने सावध राहा. सट्टेबाजांनी जास्त सावधगिरी बाळगावी. कामादरम्यान नवीन लोकांशी भेट होईल. लवकरच तुम्हाला तुमचा सोबती मिळू शकतो.
Lucky Number : 11
Lucky Colour : Violet
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Numerology: दैनिक अंकशास्त्र! शुक्रवारचा दिवस 1 ते 9 मूलांकाना कसा असेल, भाग्याची साथ
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement