Ganesh Visarjan 2025: अन्यथा 10 दिवसांचे कष्ट निष्फळ! गणेश विसर्जन दिवशी या गोष्टींमध्ये एकही चूक नको

Last Updated:

Ganpati Visarjan 2025 Niyam: विसर्जन विधी नीट व्हायला हवेत. परंतु बऱ्याचदा विसर्जनाच्या दिवशी इतके काम असते की, नकळत काही चुका होतात, ज्यामुळे 10 दिवसांच्या पूजेच्या फळांना यश मिळत नाही. म्हणून विसर्जन करताना काही गोष्टींची विशेष काळजी घेतली पाहिजे.

News18
News18
मुंबई : अनंत चतुर्दशी उद्या 6 सप्टेंबर रोजी साजरी केली जाणार आहे. सार्वजनिक मंडळांच्या गणरायांचे याच दिवशी विसर्जन केले जाईल. अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपतीचे विसर्जन केले जाते. गणेश विसर्जनाचा क्षण आनंद आणि दुःखाचे जणू मिश्रण असतो. गणेश चतुर्थी तिथीला मंडपात आलेल्या बाप्पाचे अनंत चतुर्दशीला विसर्जन केले जाते. विसर्जन विधी नीट व्हायला हवेत. परंतु बऱ्याचदा विसर्जनाच्या दिवशी इतके काम असते की, नकळत काही चुका होतात, ज्यामुळे 10 दिवसांच्या पूजेच्या फळांना यश मिळत नाही. म्हणून विसर्जन करताना काही गोष्टींची विशेष काळजी घेतली पाहिजे.
गणेश विसर्जन 2025 -
10 दिवस चालणारा हा मोठा उत्सव अनंत चतुर्दशीच्या दिवशी बाप्पाच्या विसर्जनाने संपतो. आनंदानं निरोप द्यायचा असला तरी गणराय जात असल्यानं मनात बरेच दुःख असते. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असं म्हणत गणेश भक्त बाप्पाला निरोप देतात. धार्मिक श्रद्धेनुसार, ज्याप्रमाणे बाप्पाला आदराने आणले जाते, त्याचप्रमाणे अनंत चतुर्दशीच्या दिवशी त्याचे विधीपूर्वक पवित्र जलाशयात, नदीत विसर्जन केले जाते. बाप्पाची पूजा करून त्याला निरोप दिल्यानं सर्व कामे पूर्ण होतात आणि प्रत्येक संकटातून मुक्तता मिळते, असे मानले जाते.
advertisement
गणेश विसर्जनादरम्यान या गोष्टींकडे विशेष लक्ष द्या -
- विसर्जन करण्यापूर्वी, घरात किंवा मंडपामध्ये गणपतीची विधीपूर्वक पूजा करा. गणरायाला फळे, फुले, मोदक अर्पण करा.
- घरातून किंवा मंडपामधून बाप्पाला निरोप देण्यापूर्वी 10 दिवसात आपल्याकडून काही चूक झाली असल्यास, चुकीसाठी क्षमा मागा, त्यानंतरच बाप्पाला निरोप द्यावा.
- शक्य असल्यास घरातील गणपतीला निरोप देण्यापूर्वी, मूर्ती एकदा संपूर्ण घराभोवती फिरवा आणि नंतर विसर्जनास न्ह्या.
advertisement
- घराच्या किंवा मंडपाच्या दारातून बाहेर पडताना, गणेशाचे तोंड घराकडे आणि त्यांची पाठ बाहेरच्या दिशेने फिरवा. त्याचप्रमाणे, विसर्जनाच्या ठिकाणी घेऊन जा.
- विसर्जनासाठी नेण्यात येणारी मूर्ती खंडित झालेली नसावी, याची काळजी घ्या. खंडित मूर्तीचे विसर्जन अशुभ मानले जाते.
- घाईघाईने विसर्जन करू नका. विसर्जन करण्यापूर्वी तिरावर मूर्ती बाजूला ठेवा आणि शेवटची पूजा आरती करा आणि चुकांसाठी क्षमा मागा.
advertisement
- मूर्ती एकाच वेळी पाण्यात सोडू नका, हळूहळू आणि आदराने विसर्जित करा.
- विसर्जनाच्या उरलेल्या वस्तू इकडे तिकडे फेकू नका, उरलेल्या वस्तू मातीत पुरून टाका किंवा कुठेतरी ठेवा. पर्यावरणपूरक गोष्टींची काळजी घ्या.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
view comments
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Ganesh Visarjan 2025: अन्यथा 10 दिवसांचे कष्ट निष्फळ! गणेश विसर्जन दिवशी या गोष्टींमध्ये एकही चूक नको
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement