Gan Astrology: राक्षस गणाची माणसं राक्षसासारखी नसतात! अशी कामं फक्त तिच करू शकतात

Last Updated:

Gan Astrology: 3 गण म्हणजे देव, मानव आणि राक्षस गण. पण, राक्षस गण म्हटल्यावर अनेकाच्या मनात त्या व्यक्तीविषयी खराब किंवा राक्षसाची प्रतिमा तयार होते. या शब्दांचा चुकीचा अर्थ घेण्याची गरज नाही.

News18
News18
मुंबई : ज्योतिषशास्त्रात व्यक्तीच्या 3 गणांबद्दल माहिती देण्यात आली आहे. पत्रिकेत व्यक्तीचे हे गण त्याचा स्वभाव, वैशिष्ट्य आणि दोष यांची माहिती देतात. हे 3 गण म्हणजे देव, मानव आणि राक्षस गण. पण, राक्षस गण म्हटल्यावर अनेकाच्या मनात त्या व्यक्तीविषयी खराब किंवा राक्षसाची प्रतिमा तयार होते. या शब्दांचा चुकीचा अर्थ घेण्याची गरज नाही. याविषयी नितीन श्री. जोगळेकर यांनी एका सोशल साईटवर सविस्तर दिलेली माहिती जाणून घेऊ.
आश्लेषा, विशाखा, कृत्तिका, चित्रा, मघा, ज्येष्ठा, मूळ, धनिष्ठा आणि शततारका या नक्षत्रांवर जन्म झालेली माणसं राक्षस गणाची असतात. पण, तरीही या प्रत्येक नक्षत्राचे गुण हे वेगळे आहेत, क्षेत्र वेगळी आहेत, अभिव्यक्ती वेगळी आहे. म्हणजे थोडक्यात प्रकृतीच वेगळी आहे.
आपल्या समाजात अनेक चुकीच्या रूढी, परंपरा असतात. काही मूठभर लोक समाजावर अन्याय करत असतात. या सर्व गोष्टींच्या विरोधात कोणीतरी काहीतरी करावे, असे सगळ्यांनाच वाटते. पण, पाय रोवून अन्यायाच्या विरोधात कितीजण पुढे उभे ठाकतात? तसं उभा राहणारी, क्रांतीकारक राक्षस गणाचे लोक असतात.
advertisement
मऊ आणि अत्यंत भावनिक अशा तुकाराम महाराज किंवा मीराबाई यांच्या सारखे व्यक्तिमत्व कधी सैन्याचे सेनापती होऊ शकले असते का? त्यांचा पिंडच या कामासाठी योग्य नव्हता तर त्यांची योजना ही वेगळ्या कर्मासाठी होती. जर लष्कराचा सेनापती व्हायचे असेल तर मूळ नक्षत्राचे कणखर व्यक्तीच पाहिजे. कठोर निर्णय घेण्याची क्षमता जी राक्षस गणात असते ती देवगणात किंवा मनुष्य गणात नाही. त्यामुळे राक्षस गणाची माणसे वाईट असतात असे काहीही नाही. जग चालवायला सगळेच हवेत.
advertisement
लग्न जुळवण्यासाठी फक्त गुणमेलन अर्थात किती गुण जुळले हे बघणे किंवा फक्त मंगळ बघणे म्हणजे नखं बघून संपूर्ण माणसाविषयी बोलण्यासारखे आहे कारण तो एक स्वतंत्र आणि फार मोठा विषय आहे. 36 गुण जुळले याचा अर्थ संसार सुखाचा होईल असे नाही किंवा 1, 4 , 7 , 8 आणि 12 व्या घरात मंगळ हा ग्रह आहे, म्हणजे काहीतरी अशुभ होणार असेही नाही. घरात पेट्रोलचा साठा आपण ठेवत नाही कारण आग लागण्याची शक्यता असते. पण आग लागण्यासाठी ठिणगीसुद्धा असावी लागते. ती ठिणगी आहे का हे शोधणे हे खऱ्या ज्योतिषाचे कौशल्य आहे. जर ती ठिणगी नसेल तर आग लागत नाही हे साधे तत्व लक्षात घ्यावे.
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Gan Astrology: राक्षस गणाची माणसं राक्षसासारखी नसतात! अशी कामं फक्त तिच करू शकतात
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement