Amavasya: पितृदोषातून सुटका करण्याची आजच संधी! कार्तिकी अमावस्येला केलेली ही कामं परिणाम देतात
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Amavasya: कार्तिक दर्श अमावास्या आज, बुधवार, 19 नोव्हेंबर रोजी आहे. प्रत्येक महिन्याची अमावास्या खास असतेच. कार्तिक अमावस्या पितृशांतीसाठी शुभफळदायी मानली जाते. आपल्या घरात पितृदोषासारख्या गोष्टी जाणवत असतील आणि त्यासाठी काही उपाय करण्याची
मुंबई : अमावस्या तिथीला हिंदू धर्मात महत्त्वाचं मानलं जातं. एकादशी, संकष्टी, पौर्णिमा तिथीप्रमाणं अमावस्या तिथी प्रत्येक महिन्यात येत असते. अमावस्येदिवशी मराठी महिना संपतो आणि दुसरा सुरू होतो. ही कार्तिक अमावस्या असल्यानं कार्तिक महिना संपून मार्गशीर्ष महिना सुरू होतोय.
कार्तिक दर्श अमावास्या आज, बुधवार, 19 नोव्हेंबर रोजी आहे. प्रत्येक महिन्याची अमावास्या खास असतेच. कार्तिक अमावस्या पितृशांतीसाठी शुभफळदायी मानली जाते. आपल्या घरात पितृदोषासारख्या गोष्टी जाणवत असतील आणि त्यासाठी काही उपाय करण्याची आवश्यकता असेल तर कार्तिक दर्श अमावास्यापेक्षा चांगला दिवस नाही. या अमावास्या तिथीला तुम्ही काही गोष्टी केल्यास घर पितृदोषातून मुक्त होऊ शकते. त्यासाठी काय करावं हे आज आपण जाणून घेऊ. कार्तिक अमावास्या आज 19 नोव्हेंबर रोजी सकाळी 09:43 वाजता सुरू होते आणि उद्या, 20 नोव्हेंबर रोजी दुपारी 12:16 वाजता संपते.
advertisement
पितृदोष दूर करण्यासाठी या गोष्टी दान करा -
दर्श अमावस्येला पूर्वजांच्या नावाने दान करणे, गरिबांना अन्नदान करणे अतिशय शुभ मानले जाते. पितृदोष दूर करण्यासाठी कार्तिक दर्श अमावस्येला भगवान विष्णू आणि पूर्वजांची पूजा करा, नंतर त्यांच्या नावाने गहू, तांदूळ आणि काळे तीळ दान करा. असे मानले जाते की या वस्तू दान केल्यानं पूर्वज प्रसन्न होतात आणि कुटुंबाला सुखी ठेवतात.
advertisement
दर्श अमावस्येला सकाळी पवित्र नदीत स्नान करावे. नदीत स्नान करणे शक्य नसेल तर घरी बादलीत गंगाजला सारखे पवित्र पाणी मिसळा. स्नान करताना आपल्या पूर्वजांचे ध्यान करावे. यामुळे पूर्वज प्रसन्न होतात. आजच्या तिथीला उडीद डाळ, ब्लँकेट दान करणे देखील शुभ आहे. यामुळे पूर्वज आनंदी आणि समाधानी राहतात. राहू आणि केतूचे नकारात्मक प्रभाव देखील कमी होतात.
advertisement
पक्ष्यांना खाऊ घालणं - आज अमावस्येच्या दिवशी पक्ष्यांना खाऊ घालणं खूप शुभ मानलं जाते. धार्मिक श्रद्धेनुसार पूर्वज पक्ष्यांच्या रूपात येऊन अन्न-नैवेद्य स्वीकारतात. असे केल्याने पूर्वजांना शांती मिळते. पूर्वजांच्या फोटोसमोर उभा राहून त्यांच्याकडे सुख-शांतीसाठी प्रार्थना करावी. पूर्वजांच्या आशीर्वादाने कुटुंब आनंदी राहते, करिअरमध्ये यश मिळते आणि वंश देखील वाढतो.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 19, 2025 7:42 AM IST
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Amavasya: पितृदोषातून सुटका करण्याची आजच संधी! कार्तिकी अमावस्येला केलेली ही कामं परिणाम देतात


