Shukrawar Upay: सुख-समृद्धी, धन प्राप्तीसाठी शुक्रवारी करतात या गोष्टी; देवी लक्ष्मीची कृपा अपरंपार

Last Updated:

Shukrawar Upay Marathi: माता लक्ष्मीला धन, संपत्ती आणि समृद्धीची देवी मानले जाते, तिच्या आशीर्वादाने प्रत्येकाच्या जीवनात आनंद आणि यश मिळते. आयुष्यात आर्थिक प्रगती हवी असेल किंवा व्यवसायात नफा मिळवायचा असेल तर तुम्ही शुक्रवारी काही सोपे उपाय करू शकता.

News18
News18
मुंबई: शुक्रवार हा विशेषतः देवी लक्ष्मीचा दिवस म्हणून ओळखला जातो. माता लक्ष्मीला धन, संपत्ती आणि समृद्धीची देवी मानले जाते, तिच्या आशीर्वादाने प्रत्येकाच्या जीवनात आनंद आणि यश मिळते. आयुष्यात आर्थिक प्रगती हवी असेल किंवा व्यवसायात नफा मिळवायचा असेल तर तुम्ही शुक्रवारी काही सोपे उपाय करू शकता. शास्त्रांनुसार, या उपायांमुळे संपत्तीसोबत मानसिक शांती आणि आनंद देखील मिळतो. जाणून घेऊया शुक्रवारचे कोणते खास उपाय आपल्या आयुष्यात आनंद आणि समृद्धी आणू शकता.
लक्ष्मी देवीचा फोटो - आपल्या घरात नेहमी सुख आणि समृद्धी हवी असेल, तर शुक्रवारी बाजारातून कमळाच्या फुलावर बसलेल्या देवी लक्ष्मीचा एक फोटो खरेदी करा. हा फोटो देव्हाऱ्यात लावा. यानंतर, विधीनुसार देवीची पूजा करावी.
एक रुपयाचे नाणे - सुख-समृद्धीसाठी शुक्रवारी एक रुपयाचे नाणे देव्हाऱ्यात देवी लक्ष्मीसमोर ठेवावी. नंतर देवी लक्ष्मीची आणि त्या नाण्याचीही पूजा करा. हे नाणे एक दिवस देव्हाऱ्यात ठेवा आणि दुसऱ्या दिवशी ते लाल कापडात बांधून तुमच्याकडे ठेवा. असे केल्याने तुमची आर्थिक स्थितीही मजबूत होईल.
advertisement
आरोग्यासाठी शंख अर्पण करा - चांगल्या आरोग्यासाठी, शुक्रवारी देवी लक्ष्मीच्या मंदिरात शंख अर्पण करावा. शंख अर्पण केल्यानं आरोग्य सुधारतेच असे नाही तर शरीरात नवीन ऊर्जा देखील निर्माण होते. यासोबतच, देवी लक्ष्मीला खीर अर्पण केल्याने आरोग्य, जीवनात आनंद आणि शांती देखील मिळते.
advertisement
मातीच्या भांड्यात तांदूळ आणि नाणे - संपत्ती वृद्धीसाठी शुक्रवारी एक लहान मातीचे भांडे घ्या आणि त्यात तांदूळ भरा. नंतर त्या तांदळावर एक रुपयाचे नाणे आणि हळद घाला. हा कलश झाकणाने बंद करा आणि एखाद्या पवित्र ठिकाणी ठेवा. त्यानंतर हा कलश पुजाऱ्याला दान करा. असे केल्याने देवी लक्ष्मी तुमच्या घरात वास करते आणि तुम्हाला कधीही पैशाची कमतरता भासत नाही, असे मानले जाते.
advertisement
व्यवसायात नफा मिळविण्यासाठी मंत्रांचा जप -
व्यवसायात यश आणि नफा हवा असेल तर शुक्रवारी स्नान केल्यानंतर स्वच्छ कपडे घाला आणि आसनावर बसून देवी लक्ष्मीचा मंत्र जप करा. मंत्र असा आहे - ‘ॐ श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्म्यै नमः’ या मंत्राचा किमान 11 वेळा जप करा. असे केल्याने व्यवसायात नफा मिळतो आणि उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतात, असे मानले जाते.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
view comments
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Shukrawar Upay: सुख-समृद्धी, धन प्राप्तीसाठी शुक्रवारी करतात या गोष्टी; देवी लक्ष्मीची कृपा अपरंपार
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement