Numerology: एक्स्ट्रा मेरिटल अफेयर! मोबाईल नंबरमध्ये हा दुहेरी अंक असणाऱ्यांसाठी इशारा; नंतर पश्चाताप
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Mobile Numerology : प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात कधी-कधी विचित्र प्रसंग येतात. अचानक नातेसंबंध बिघडतात, आरोग्याच्या समस्या वारंवार उद्भवतात किंवा आयुष्यात विनाकारण ताण येऊ लागतो. अंकशास्त्रानुसार..
मुंबई : मोबाईल अंकशास्त्रानुसार प्रत्येक क्रमांकाचे वेगळे महत्त्व आहे. मोबाईलमधील शेवटचे 4 अंक महत्त्वाचे आहेत. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात कधी-कधी विचित्र प्रसंग येतात. अचानक नातेसंबंध बिघडतात, आरोग्याच्या समस्या वारंवार उद्भवतात किंवा आयुष्यात विनाकारण ताण येऊ लागतो. अंकशास्त्रानुसार, तुमचा मोबाईल नंबर देखील या सर्वामागे कारण असू शकतो. ज्योतिषी, वास्तुतज्ञ आणि अंकशास्त्रज्ञ हिमाचल सिंह या विषयावर अधिक सविस्तर सांगत आहेत.
काय परिणाम दिसून आला आहे?
ज्या लोकांच्या मोबाईल नंबरमध्ये 64 किंवा 46 आहे, त्यांच्यासोबत खाली काही समस्या सहसा दिसून येतात.
1. त्वचेशी संबंधित समस्या
2. नातेसंबंधांमध्ये तणाव किंवा विवाहबाह्य संबंधांचे प्रकार
3. वारंवार लघवीचा संसर्ग
4. वेगळ्या जाती किंवा परंपरेत लग्न झाल्यामुळे नात्यांमध्ये दुरावा
हे प्रत्येकासोबत घडतेच असे नाही, पण बहुतेक प्रकरणांमध्ये तसं दिसून आलं आहे. वर नमूद केलेल्या समस्यांना तोंड दिलेल्या लोकांचे मोबाईल नंबर तपासले गेले तेव्हा त्यांच्यामध्ये 64 किंवा 46 चे संयोजन आढळले. याचा अर्थ असाही होऊ शकतो की, आता कोणतीही समस्या नसेल पण भविष्यात काही अडचणी येऊ शकतात. काळानुसार त्याचा परिणाम दिसून येण्याची शक्यता आहे.
advertisement
असं का घडतं? - तुमच्या कुंडलीत जसजसा वेळ बदलतो तसतसा संख्येचा परिणामही बदलतो. कुंडली बदलता येत नाही, परंतु मोबाईल नंबर बदलता येतो. म्हणून, जर तुम्हाला वारंवार एखाद्या विशिष्ट संख्येची समस्या येत असेल तर तो नंबर बदलणे योग्य ठरेल.
64/46 हा आकडा कोणाला लकी? जर तुमचा रेस्टॉरंट किंवा हॉटेल व्यवसाय असेल तर हा आकडा तुमच्यासाठी योग्य आहे, कारण त्यात लोकांशी कमी वैयक्तिक संबंध असतात.
advertisement
यावर उपाय काय असावा?
1. जर तुमच्या मोबाईल नंबरमध्ये 64 किंवा 46 असेल तर या आकड्याचा वापर टाळा, व्यावसायिकांनी व्यवसायासाठी वापरू नये.
2. दररोज काही वेळ देवीची पूजा करा आणि मंत्रांचा जप करा.
3. सकाळी लवकर उठण्याची सवय लावा.
advertisement
4. "ओम राम राहवे नमः" सारखे राहू ग्रहाचे मंत्र जप करा.
5. काळे कपडे किंवा कमी वापराच्या वस्तू वापरा.
6. मोबाईल नंबर घेताना तुमच्या कुंडलीनुसार किंवा तुमच्या मूलांकानुसार नंबर निवडा.
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 11, 2025 1:31 PM IST
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Numerology: एक्स्ट्रा मेरिटल अफेयर! मोबाईल नंबरमध्ये हा दुहेरी अंक असणाऱ्यांसाठी इशारा; नंतर पश्चाताप