Samudrikshastra: नाकाच्या या बाजूला तीळ? आश्चर्यकारकपणे दिवस पालटतील, करोडपतींच्या यादीत येणार

Last Updated:

Astrology Marathi: शरीरावर असलेले हे तीळ आपल्या नशिबावर देखील परिणाम करतात. आज आपण नाकावरील तिळाविषयी जाणून घेऊ. सामुद्रिक शास्त्रानुसार, नाकावर तीळ असणे विशेष महत्त्वाचे आहे.

+
News18

News18

मुंबई : सामुद्रिक शास्त्रानुसार, शरीरावर असलेले तीळ व्यक्तीच्या स्वभाव, नशीब आणि भविष्याबद्दल बरेच काही सांगतात. शरीरावरील तीळाचे स्थान, रंग, आकार आणि पोत एखाद्या व्यक्तीचे आयुष्य कोणत्या दिशेने जाईल याविषयी संकेत देतं. शरीरावरील तीळ जन्मापासून असू शकतात किंवा नंतर देखील बाहेर येऊ शकतात. शरीरावर असलेले हे तीळ आपल्या नशिबावर देखील परिणाम करतात. आज आपण नाकावरील तिळाविषयी जाणून घेऊ. सामुद्रिक शास्त्रानुसार, नाकावर तीळ असणे विशेष महत्त्वाचे आहे. सामुद्रिक शास्त्र याबद्दल काय सांगते, ते जाणून घेऊया.
नाकाच्या डाव्या बाजूला तीळ - नाकाच्या डाव्या बाजूला तीळ असणं हे आत्मविश्वासाचं प्रतीक मानलं जातं. सामुद्रिक शास्त्रानुसार, असे लोक धाडसी, दयाळू आणि ध्येयाप्रति समर्पित असतात. त्यांच्यात निर्णय घेण्याची तीक्ष्ण क्षमता असते आणि ते कोणताही धोका पत्करण्यास घाबरत नाहीत. विशेषतः महिलांसाठी, नाकाच्या डाव्या बाजूला तीळ असणे अत्यंत शुभ मानले जाते. हा तीळ यश, समृद्धी आणि उच्च पदाची प्राप्ती देखील दर्शवितो. असे लोक स्वतःच्या कष्टानं जीवनात उंची गाठतात आणि समाजात आदर मिळवतात.
advertisement
नाकाच्या उजव्या बाजूला तीळ - सामुद्रिक शास्त्रानुसार, असे लोक मानसिकदृष्ट्या खूप स्ट्राँग असतात. त्यांचे व्यक्तिमत्व इतके प्रभावी असते की, कुठेही यांचा शब्द चालतो. हा तीळ विशेषतः पुरुषांसाठी शुभ मानला जातो, कारण तो करिअरची वाढ, नात्यांमध्ये गोडवा आणि आर्थिक ताकद दर्शवितो. हे लोक सहसा खूप भाग्यवान असतात. असे लोक खूप यश मिळवतात.
advertisement
नाकाच्या मध्यभागी तीळ - सामुद्रिक शास्त्रानुसार, नाकाच्या मध्यभागी तीळ असणारे लोक आपल्या बोलण्यातून इतरांना लवकर आकर्षित करतात. ते लेखन, डिझाइन, मीडिया, सर्जनशील क्षेत्रात चांगले काम करतात. नाकाच्या मध्यभागी तीळ असलेले लोक महत्त्वाकांक्षी असतात. या लोकांनी योग्य दिशेने कठोर परिश्रम केले तर ते जीवनात मोठ्या उंचीवर पोहोचू शकतात.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
view comments
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Samudrikshastra: नाकाच्या या बाजूला तीळ? आश्चर्यकारकपणे दिवस पालटतील, करोडपतींच्या यादीत येणार
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement