Diwali 2025: लक्ष्मी पूजनाचा शुभ मुहूर्त सुरू झाला! फक्त इतक्याच वेळात आटोपून घ्या सर्व विधी

Last Updated:

Diwali Laxmi Pujan 2025: दिवाळीच्या पाच दिवसांमधील लक्ष्मी पूजन हा एक महत्त्वाचा विधी मानला जातो. आश्विन अमावास्येच्या दिवशी प्रदोषकाली भगवान विष्णूने लक्ष्मीसह सर्व देवांना बळीच्या कारागृहातून मुक्त केलं होतं.

News18
News18
मुंबई : दिवाळीतील आज लक्ष्मीपूजनाचा दिवस आहे. दिवाळीच्या पाच दिवसांमधील हा एक महत्त्वाचा विधी मानला जातो. आश्विन अमावास्येच्या दिवशी प्रदोषकाली भगवान विष्णूने लक्ष्मीसह सर्व देवांना बळीच्या कारागृहातून मुक्त केलं. म्हणून आपण या दिवशी लक्ष्मी-कुबेर पूजन करीत असतो. लक्ष्मी-कुबेर पूजन कसे करायचे ते आणि शुभ मुहूर्त पाहुया.
एका चौरंगावर स्वस्तिक काढावे. त्यावर कलश ठेवावा. कलशावर ताम्हन ठेवून त्यात. लक्ष्मीची व कुबेराची प्रतिमा ठेवावी. तसेच नवीन वर्षाच्या हिशेब लिहीण्याच्या वह्या आणि लेखन साहित्य ठेवावे.. जवळच दिवा लावून ठेवावा. स्नान करून पूजेचा संकल्प करावा. नंतर श्रीसूक्त म्हणत लक्ष्मी-कुबेर, हिशेबाच्या वह्या यांची षोडशोपचारे पूजा करावी. धने, गूळ, साळीच्या लाह्या, बत्तासे व चवळीच्या शेंगा लक्ष्मीला वाहाव्या. गाईच्या दुधात वेलची, लवंग व साखर घालून त्याचा आणि लाडवाचा नैवेद्य दाखवावा. नंतर पुष्पांजली अर्पण करून लक्ष्मीची प्रार्थना म्हणावी.
advertisement
पूजनाचा शुभ मुहूर्त - आज लक्ष्मी-कुबेर पूजनासाठी सांयकाळी शुभ मुहूर्त आहे. सायंकाळी 6.10 ते रात्री 8.40 वाजेपर्यंत पूजा विधी करून घ्यावेत.
नमस्ते सर्वदेवानां वरदासि हरे: प्रिया ।
या गतिस्त्वत्प्रपन्नानां सा मे स्यात्तव दर्शनात् ॥
“ ( हे लक्ष्मी , ) तू सर्व देवांना वर देणारी आणि श्रीविष्णूला प्रिय आहेस. तुला शरण येणाऱ्यांना जी गती प्राप्त होते ती मला तुझ्या दर्शनाने प्राप्त होवो. “
advertisement
त्यानंतर कुबेराची प्रार्थना म्हणावी. —
धनदाय नमस्तुंभ्यं निधिपद्माधिपाय च ।
भवन्तु त्वत्प्रसादेन धनधान्यादिसम्पद: ॥
निधी आणि पद्म यांचा अधिपती असलेल्या कुबेरा, तुला नमस्कार असो. तुझ्या कृपेने ( मला ) धनधान्यादी संपत्ती प्राप्त होवो. “
पुराणात एक कथा आहे. आश्विन अमावास्येच्या रात्री लक्ष्मी सर्वत्र संचार करते आणि आपल्या निवासासाठी योग्य जागा शोधू लागते. जिथे स्वच्छता, रसिकता, उद्योगप्रियता, श्रम असेल तेथे ती आकर्षित होते. तसेच ज्या घरात चारित्र्यवान , कर्तव्यदक्ष, धर्मनिष्ठ , संयमी, सदाचारी, क्षमाशील माणसे राहतात तेथे वास्तव्य करणे लक्ष्मीला आवडते.
advertisement
केवळ पैसा किंवा संपत्ती म्हणजे लक्ष्मी नव्हे ! चांगल्या मार्गाने मिळविलेल्या आणि चांगल्या मार्गाने खर्च होण्यार्या पैशाला ‘ लक्ष्मी ‘ म्हणतात. भ्रष्टाचाराने, अनीतीने व लबाडीने मिळविलेल्या पैशाला ‘लक्ष्मी ‘ म्हणत नाहीत. लक्ष्मी ही विष्णुपत्नी , देवदानवांनी क्षीरसागराचे मंथन केले त्यालेळी लक्ष्मी सागरातून बाहेर आली. लक्ष्मी हा शब्द ‘ चिन्ह ‘ यावरून बनलेला आहे. ‘ श्री ‘ म्हणजे लक्ष्मी ! श्री हे अक्षर स्वस्तिकापासून बनले आहे. लक्ष्मीचे लक्ष्म म्हणजे चिन्ह हे ‘स्वस्तिक‘ आहे. लक्ष्मी ही सर्व प्रकारचे ऐश्वर्य देणारी ठरल्यामुळे तिची (१) धनलक्ष्मी (२) धान्यलक्ष्मी (३) धैर्यलक्ष्मी (४) शौर्यलक्ष्मी (५) विद्यालक्ष्मी (६) कीर्तीलक्ष्मी (७) विजयलक्ष्मी आणि (८) राज्यलक्ष्मी अशी आठ रूपे कल्पिलेली आहेत. लक्ष्मीचे ‘बल‘ आणि ‘उन्माद‘ असे दोन पुत्र असल्याचे सांगितलेले आहेत. मात्र, हे भावात्मक पुत्र असावेत. कारण ज्याच्याकडे लक्ष्मी येते तो बलवान असतो, कधी कधी त्याला उन्मादही असू शकतो. श्रीसूक्तात मात्र लक्ष्मीच्या चार पुत्रांची आनंद, कर्दम, श्रीद आणि चिक्लित अशी नावे सांगितलेली आहेत. याविषयीची माहिती ज्येष्ठ पंचागकर्ते दा.कृ. सोमण यांनी सोशल मीडिया साईटवर दिली आहे.
advertisement
धनत्रयोदशी व्यतिरिक्त या 7 प्रसंगी घरासाठी झाडू खरेदी करणं शुभफळदायी
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
view comments
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Diwali 2025: लक्ष्मी पूजनाचा शुभ मुहूर्त सुरू झाला! फक्त इतक्याच वेळात आटोपून घ्या सर्व विधी
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement