Rain Nakshatra: उद्यापासून पुन्हा दम'धार'! सासवा गेल्या आता सूनांचा पाऊस; वाहन म्हैस असल्यानं...
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Rain Nakshatra: पूर्वा फाल्गुनी नक्षत्रातील पावसाला सूनांचा पाऊस किंवा 'सूनेचा पाऊस' असंही म्हणतात. या नक्षत्रात पडणारा पाऊस कमी वेळेत खूप मुसळधार असतो. तो संततधार नसतो, म्हणजे सतत पडत नसून जोरदार सरींच्या रूपात येतो आणि लगेच थांबतो.
मुंबई : मराठी पंचांगानुसार पावसाळ्यात नक्षत्र बदलल्यानंतर पावसाच्या प्रमाणातही बदल होतो, असे सांगितले जाते. पंचांगानुसार शनिवारी 30 ऑगस्टपासून पूर्वा फाल्गुनी नक्षत्र लागले असून पावसाचे वाहन म्हैस आहे. म्हैस वाहन असल्यास पाऊस चांगला पडतो, असे मानले जाते. सध्या सासूंचा पाऊस सुरू होता, सासूंचा झाल्यानंतर सूनांचा पाऊस पडतो. पूर्वा फाल्गुनी नक्षत्रातील पाऊस आणि त्या नक्षत्राचे वाहन हे पारंपारिक भारतीय ज्योतिषशास्त्र आणि कृषिविषयक लोककथांचा एक भाग आहे. यानुसार, प्रत्येक नक्षत्राचे एक विशिष्ट वाहन असते आणि त्या वाहनावरून त्या नक्षत्रातील पावसाचा अंदाज वर्तवला जातो.
advertisement
भारतीय पंचांगानुसार, पूर्वा फाल्गुनी नक्षत्र साधारणपणे ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सुरू होते आणि सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यापर्यंत असते. या नक्षत्राचा कालावधी सुमारे 15 दिवसांचा असतो. पूर्वा फाल्गुनी नक्षत्रातील पावसाला सूनांचा पाऊस किंवा 'सूनेचा पाऊस' असं म्हणतात. या नक्षत्रात पडणारा पाऊस कमी वेळेत खूप मुसळधार असतो. तो संततधार नसतो, म्हणजे सतत पडत नसून जोरदार सरींच्या रूपात येतो आणि लगेच थांबतो. यामुळे शेतात पाणी साचू शकते पण ते लगेच जमिनीत मुरते.
advertisement
लग्नानंतर सासरी गेलेल्या मुलीला (सुनेला) जेव्हा माहेरची आठवण येते, तेव्हा ती अचानक खूप रडते आणि नंतर शांत होते. याच उपमेवरून या नक्षत्रातील पावसाला 'सूनांचा पाऊस' असं नाव पडल्याचे सांगितले जाते. हा पाऊस येतो आणि जातो, पण त्याचा जोर खूप असतो, त्यामुळे ही उपमा सूनांच्या पावसाला योग्य ठरते.
शेतीवर होणारा परिणाम - हा पाऊस खरीप पिकांसाठी, विशेषतः भात (धान) आणि इतर पिकांसाठी खूप महत्त्वाचा मानला जातो. पावसाळ्याच्या उत्तरार्धात येणारा हा पाऊस पिकांच्या वाढीसाठी आणि दाणे भरण्यासाठी उपयुक्त असतो. पण, जर तो खूप जास्त प्रमाणात झाला, तर पाणी शेतात साचून पिकांना नुकसान देखील होऊ शकते. भारतीय ज्योतिषशास्त्र आणि कृषी परंपरेनुसार, पावसाचे नऊ प्रमुख नक्षत्रे आहेत आणि त्यापैकी प्रत्येक नक्षत्राचे स्वतःचे वैशिष्ट्य आहे. काही नक्षत्रात जास्त पाऊस पडतो, काही नक्षत्रे जोरदार पावसासाठी विशेषतः ओळखली जातात.
advertisement
पावसाची नक्षत्रे -
पुनर्वसू नक्षत्र : या नक्षत्राला तरणा पाऊस असेही म्हणतात. पुनर्वसू नक्षत्रात पाऊस चांगला आणि सातत्यपूर्ण पडतो, ज्यामुळे पिकांना योग्य वाढीसाठी मदत होते.
advertisement
आर्द्रा नक्षत्र : हे नक्षत्र पावसाच्या निश्चित आगमनासाठी ओळखले जाते. आर्द्रा नक्षत्रात पाऊस पडला तरच पेरणी योग्य होते, असे मानले जाते. या नक्षत्रात अनेकदा मुसळधार पाऊस पडतो, ज्यामुळे शेतीसाठी आवश्यक ओलावा निर्माण होतो.
advertisement
advertisement
मघा नक्षत्र: या नक्षत्राला सासवांचा पाऊस असे म्हणतात, कारण तो अचानक आणि जोरदारपणे येतो. काही ठिकाणी या नक्षत्रात मुसळधार पाऊस पडतो, तर काही ठिकाणी तो कमी असतो. मात्र, जेव्हा हा पाऊस पडतो, तेव्हा तो खूप जोरदार असतो.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 29, 2025 2:12 PM IST
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Rain Nakshatra: उद्यापासून पुन्हा दम'धार'! सासवा गेल्या आता सूनांचा पाऊस; वाहन म्हैस असल्यानं...