Numerology: थोड्या प्रयत्नांमध्ये यश! या जन्मतारखा असणाऱ्यांना सरकारी नोकरी लवकर मिळते

Last Updated:

Numerology Prediction Government Job: सरकारी नोकरी मिळवणं अनेकांच्या आयुष्याचे ध्येय असते. आजच्या काळातही सरकारी नोकरीची लोकांमध्ये क्रेझ आहे. सरकारी नोकरीसाठी देशातील लाखो तरुण प्रयत्न करतात, काही लोकांना कमी प्रयत्नात सरकारी नोकरी मिळते, काहींना...

News18
News18
मुंबई : मध्यमवर्गीय कुटुंबातील अनेक लोकांना सरकारी नोकरी मिळवण्याशी आशा असते. सरकारी नोकरी मिळवणं अनेकांच्या आयुष्याचे ध्येय असते. आजच्या काळातही सरकारी नोकरीची लोकांमध्ये क्रेझ आहे. सरकारी नोकरीसाठी देशातील लाखो तरुण प्रयत्न करतात, काही लोकांना कमी प्रयत्नात सरकारी नोकरी मिळते, काहींना खूप प्रयत्नांनी फळ मिळत नाही. आज आपण कोणत्या जन्मतारखांच्या लोकांना सरकारी लवकर मिळू शकते, याविषयी जाणून घेऊ.
मूलांक 1 - कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19, 28 या तारखांना जन्म झालेल्या लोकांचा मूलांक 1 असतो. या मूलांकाच्या लोकांमध्ये प्रचंड आत्मविश्वास आणि नेतृत्व क्षमता असते. ते आयएएस, आयपीएस सारख्या प्रशासकीय सेवांमध्ये चमकू शकतात. या मूलांकाचा स्वामी ग्रहांचा राजा सूर्य आहे. सूर्य, जो शक्ती आणि उच्च स्थानाचे प्रतीक आहे. या मूलांकाचे लोक खूप कष्ट करणारे असतात, त्यांची एकाग्रता सूर्याप्रमाणे तीक्ष्ण असते, त्यामुळे गोष्टी समजून घेण्यात अडचणी येत नाहीत.
advertisement
मूलांक 4 - कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22, 31 या तारखांना जन्मलेल्या लोकांचा मूलांक 4 असतो. या मूलांकाचा स्वामी ग्रह राहू आहे. राहूचा प्रभाव असल्यानं या मूलांकाचे लोक मेहनती, नियोजबद्ध काम करणारे असतात. या मूलांकाच्या लोकांना बँक, रेल्वे, एसएससी यासारख्या तांत्रिक आणि सरकारी मंडळाच्या परीक्षांमध्ये यश मिळू शकते. या मूलांकाचे लोक कठोर परिश्रम घ्यायला कमी पडत  नाहीत आणि लेखन अभ्यासाकडे पूर्ण लक्ष देतात.
advertisement
मूलांक 6 - कोणत्याही महिन्याच्या 6, 15, 24 या तारखांना जन्य झालेल्या लोकांचा मूलांक 6 असतो. या मूलांकाचा स्वामी शुक्र आहे. तो प्रेम, सौंदर्य, विलासीता, कला, संपत्ती, सुखसोयींचा कारक आहे. शुक्राचा प्रभाव असल्यानं या मूलांकाचे लोक कायदेशीर सेवा, शिक्षक किंवा समाज कल्याण विभागात सरकारी नोकरी मिळवू शकतात. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात आकर्षण असतं, त्यामुळे त्याचा मुलाखतीत परिणाम होतो. त्याला अभ्यासामध्ये चांगले मन रमते, त्यामुळे त्यांना लवकर यश मिळते.
advertisement
मूलांक 8 - कोणत्याही महिन्याच्या 8, 17, 26 तारखांना जन्मलेल्या लोकांचा मूलांक 8 असून स्वामी शानी देव असतात. शनी प्रभावामुळे मूलांक 8 असलेल्या लोकांना अडचणींचा सामना करावा लागतो, परंतु दीर्घकालीन स्थिर सरकारी नोकरीची संधी मिळते. या मूलांकाचे लोत पीडब्ल्यूडी, कोर्ट किंवा रेल्वे विभागात वर्चस्व गाजवतात. शनीचा सखोल प्रभाव सरकारी सेवेत यशस्वी होतो.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
view comments
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Numerology: थोड्या प्रयत्नांमध्ये यश! या जन्मतारखा असणाऱ्यांना सरकारी नोकरी लवकर मिळते
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement