Vastu Tips: बेडरूम नावालाच, तिथं कधीच आराम-शांतता मिळत नाही; या दिशा त्यासाठी पूर्णपणे अशुभ
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Bedroom Direction: घराची रचना किंवा बेडरुमची दिशा योग्य नसेल तर त्याचा जीवनावर परिणाम होऊ शकतो. बेडरूमची योग्य दिशा खूप महत्त्वाची असते. बेडरूमसाठी कोणती दिशा योग्य मानली जात नाही आणि त्याचा काय परिणाम होऊ शकतो.
मुंबई : बेडरुम ही दिवसभर कष्ट-परिश्रम केल्यानंतर विश्रांती घेण्याची जागा असते. बेडरुममध्ये शांत झोप घेतली की फ्रेश वाटू लागतं, आपल्या खासगी आयुष्याचा बेडरुम एक महत्त्वाचा भाग असते. वास्तुशास्त्रानुसार घराची रचना करताना बेडरुमची दिशा योग्य ठिकाणी निश्चित करायला हवी. योग्य ठिकाणी असलेली बेडरुम विविध गोष्टींसाठी फायदेशीर ठरते.
घराची रचना किंवा बेडरुमची दिशा योग्य नसेल तर त्याचा जीवनावर परिणाम होऊ शकतो. बेडरूमची योग्य दिशा खूप महत्त्वाची असते. बेडरूमसाठी कोणती दिशा योग्य मानली जात नाही आणि त्याचा काय परिणाम होऊ शकतो. ज्योतिषी आणि वास्तु सल्लागार पंडित हितेंद्र कुमार शर्मा या विषयावर अधिक माहिती देत आहेत.
नात्यांमध्ये कलह - घरातील शौचालय, स्वयंपाकघर, प्रवेशद्वार इतर गोष्टींची दिशा जशी असते तशीच बेडरूमची दिशा देखील खूप महत्त्वाची असते. अनेकदा असे दिसून आलंय इतर सर्व काही बरोबर असूनही, लोकांना मानसिक ताण, झोपेचा त्रास किंवा नातेसंबंधांमध्ये कटूता यासारख्या समस्या येतात. याचे कारण बेडरूम चुकीच्या दिशेला असू शकते.
advertisement
अस्थिरता वाढते - काही दिशा बेडरूमसाठी अजिबात योग्य मानल्या जात नाहीत. उदाहरणार्थ, तुमची बेडरूम पश्चिम, वायव्य, दक्षिण, नैऋत्य किंवा आग्नेय दिशेला असेल तर त्यामुळे समस्या उद्भवू शकतात. या दिशांना बेडरूम असण्यामुळे वैयक्तिक जीवनात सतत थकवा, चिडचिड आणि अस्थिरता येऊ शकते.
advertisement
याशिवाय, ईशान्य दिशा देखील बेडरूमसाठी चांगली मानली जात नाही. या दिशांना झोपल्याने डोकेदुखी, निर्णय घेण्यात अडचण आणि भावनिक असंतुलन निर्माण होऊ शकते. विशेषतः जे लोक दिवसभर मानसिक काम करतात किंवा मेंदूवर ताण देतात त्यांच्यासाठी ही दिशा हानिकारक ठरू शकते.
बेडची योग्य स्थिती - बेडरूम वरील दिशांना बांधली असेल तर काय करावे? घर पाडणे किंवा सर्वकाही पुन्हा बांधणे आवश्यक नाही. काही उपायांनीही दिशेचा परिणाम कमी करता येतो. जसे की खोलीत हलके रंग वापरणे, बेडची योग्य स्थिती ठरवणे आणि खोलीतील अनावश्यक वस्तू काढाव्या. तसेच, खोलीची स्वच्छता आणि मोकळी हवा येण्याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
May 29, 2025 6:51 PM IST
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Vastu Tips: बेडरूम नावालाच, तिथं कधीच आराम-शांतता मिळत नाही; या दिशा त्यासाठी पूर्णपणे अशुभ