Guru Gochar 2025: निंदकांचा जळफळाट! वक्री शनी आणि गुरूचा उदय या राशींची चौफेर प्रगती करेल
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Guru Gochar Astrology: ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांच्या स्थितीमुळे राशीचक्र चांगले-वाईट परिणाम दिसून येतात, ग्रहांचे गोचर राशींवर शुभ-अशुभ परिणाम करते. ठराविक अंतराने ग्रहांचे संक्रमण होते आणि ही एक नियमित चालणारी प्रक्रिया आहे. ग्रह कधी सरळ मार्गी कधी वक्री होतात याशिवाय त्यांचा उदय आणि अस्त काळ राशींवर परिणाम दाखवतात.
ज्योतिषशास्त्रानुसार ५०० वर्षांनंतर एक मोठा योगायोग जुळून येणार आहे, त्यामुळे काही राशींचे भाग्य उजळू शकते. नुकतेच १४ मे २०२५ रोजी गुरू ग्रहाचा उदय झालाय आणि आता १३ जुलै २०२५ रोजी शनी मीन राशीत वक्री होणार आहे. या स्थितीमुळे काही राशींचे भाग्य चमकणार आहे. या भाग्यवान राशी कोणत्या आहेत, जाणून घेऊया.
advertisement
advertisement
advertisement
वृषभ - शनि-गुरूच्या या स्थितीमुळे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या लोकांना घवघवीत यश मिळू शकते. स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊ शकता. गुंतवणुकीसाठी हा उत्तम काळ असेल. करिअरमधील वाढ थक्क करणारी असेल, तमुच्या प्रगतीचा हेवा वाटेल. चांगल्या पगार वाढीसह पदोन्नती मिळू शकते. विविध मार्गांनी पैसा तुमच्याकडे येईल, आर्थिक स्थिती चांगली असेल. घरातील वातावरण चांगले असेल.
advertisement
advertisement
मिथुन राशीच्या बेरोजगारांना नोकरी मिळण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांना नवीन प्रकल्पांवर काम सुरू करण्यासाठी हा उत्तम काळ असेल. तुम्ही कुटुंबासोबत प्रवासाला जाऊ शकता. घरी काही शुभ कार्य पूर्ण होण्याची शक्यता आहे.
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)