Numerology: डोक्यावरचं मोठं ओझं रविवारी उतरणार; या 3 मूलांकाना गुडन्यूज, कामांमध्ये प्रगती
- Published by:Ramesh Patil
- Written by:Chirag Daruwalla
Last Updated:
Numerology Marathi: ज्योतिषशास्त्राप्रमाणेच अंकशास्त्रही महत्त्वाचं असतं. अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 21 सप्टेंबर 2025 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल, त्याबद्दल ज्योतिषी चिराग दारूवाला यांनी सांगितलेलं भविष्य जाणून घ्या.
नंबर 1 (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19, 28 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
धार्मिक आणि घरगुती कामात सहभागी व्हाल. तुमच्याविषयी आकर्षण वाढेल. आरोग्य फारसं चांगले नसेल. त्यामुळे थोडा आराम करा. व्यवसाय आनंदानं करणं करिअरसाठी फायदेशीर असेल. प्रेमजीवनात सुसंवाद असेल; पण काही गोंधळ होऊ शकतो.
Lucky Number : 3
Lucky Colour : Light Yellow
नंबर 2 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20, 29 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
advertisement
कुटुंब आणि भावंडांकडून स्नेह मिळेल. घरासाठी उत्साहात वस्तू खरेदी कराल. आज तुमच्या कल्पनांना विरोध होऊ शकतो; पण चिकाटी कायम ठेवा. परदेशातल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी जास्त पैसे खर्च कराल. प्रेमजीवनात रोमान्स चांगला असेल.
Lucky Number : 8
Lucky Colour : Violet
नंबर 3 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21, 30 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
advertisement
घरगुती वाद टाळा अन्यथा गोष्टी हाताबाहेर जाऊ शकतात. अनावश्यक वादविवाद टाळा. पैसे किंवा मौल्यवान वस्तू हरवण्याची शक्यता आहे. तुम्हाला विविध स्रोतांतून पैसा मिळेल. प्रेमजीवनात आनंदाचे क्षण असतील.
Lucky Number : 1
Lucky Colour : Orange
advertisement
नंबर 4 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22, 31यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
आज कामावर आणि कुटुंबात वादविवाद होतील. थोड्यावर आज आत्मसंतुष्ट होऊ नका. कितीही प्रयत्न केले तरी विरोधक तुमचं नुकसान करू शकणार नाहीत. नोकरीची नवीन आणि चांगली संधी मिळू शकते. अविवाहित व्यक्तीच्या विवाहाची तारीख फिक्स होऊ शकते. याबाबत तुम्ही निर्णय घेऊ शकता.
advertisement
Lucky Number : 17
Lucky Colour : Violet
नंबर 5 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 5, 14, 23 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
मित्र किंवा सहकाऱ्यांकडून मदत मिळणार नाही. काही स्वार्थी व्यक्ती त्यांच्या फायद्यासाठी तुमची दिशाभूल करू शकतात. त्यामुळे सतर्क राहा. तुम्ही जो नफा कमवाल तो तुमच्या परिश्रमाच्या तुलनेत फार कमी असू शकतो. जोडीदाराशी वाद होऊ शकतात. काळजी न घेतल्यास वाद हाताबाहेर जाऊ शकतात.
advertisement
Lucky Number : 4
Lucky Colour : Navy Blue
नंबर 6 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 6, 15, 24 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
आजचा दिवस अनलकी असू शकतो. तुमचा वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संबंधित प्रकल्प नोकरशाहीच्या वादामुळे अडकेल. अनावश्यक वाद टाळा. दिवसभर उत्साही असाल. वाहन चालवताना उत्साह जास्त जाणवेल. दूरच्या व्यवसाय किंवा व्यक्तीकडून अपेक्षित पैसे सहज मिळतील. प्रेमजीवनात निराशा जाणवेल.
advertisement
Lucky Number : 15
Lucky Colour : Chocolate
नंबर 7 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 7, 16, 25 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
बरीच कामे होतील, मित्र अडचणीच्या वेळी मदत करतील. आरोग्याची किरकोळ समस्या त्रस्त करू शकते. एखादा प्रचार किंवा चांगल्या व्यवसायाचा प्रस्ताव मिळू शकतो. त्याचा पुरेपूर फायदा घ्या. जोडीदारानं तुमच्या मनातली प्रत्येक गोष्ट ओळखावी अशी अपेक्षा ठेवू नका. जोडीदाराकडे भावना व्यक्त करा.
Lucky Number : 11
Lucky Colour : Orange
नंबर 8 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 8, 17, 26 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
तुमच्या मार्गात मोठे अडथळे आज दूर होऊ शकतात. अनपेक्षित मतभेद का होत आहेत आणि त्याचा काय परिणाम होईल असे प्रश्न पडतील. त्यावर उत्तर सापडेल, नवीन काही खरेदीसाठी दिवस चांगला आहे. बँक बॅलन्स वाढू शकतो. नात्यातली लैंगिक उदासीनता प्रेमजीवनाला मारक ठरेल. त्यामुळे परिस्थितीचा योग्य आढावा घ्या.
Lucky Number : 18
Lucky Colour : Purple
नंबर 9 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 9, 18, 27 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
कामात वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संघर्ष टाळा. आहारात लिंबूवर्गीय फळं आणि पालेभाज्यांचा समावेश करा. चैनीच्या वस्तूंवर भावनेच्या भरात खर्च टाळा. जोडीदार तुमच्यासोबत फारसा नसेल. मनातल्या काल्पनिक गोष्टींमधली तथ्यं शोधा.
Lucky Number : 8
Lucky Colour : Parrot Green
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 20, 2025 9:47 PM IST
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Numerology: डोक्यावरचं मोठं ओझं रविवारी उतरणार; या 3 मूलांकाना गुडन्यूज, कामांमध्ये प्रगती