Numerology: रविवारी सूर्यकृपा होणार! या 3 मूलांकाचे लोक अडचणीतून अलगद बाहेर पडतील
- Published by:Ramesh Patil
- Written by:Chirag Daruwalla
Last Updated:
Numerology Marathi: ज्योतिषशास्त्राप्रमाणेच अंकशास्त्रही महत्त्वाचं असतं. अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 28 सप्टेंबर 2025 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल, त्याबद्दल ज्योतिषी चिराग दारूवाला यांनी सांगितलेलं भविष्य जाणून घ्या.
नंबर 1 (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19, 28 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
रविवारचा दिवस अनेक कामांचा आहे. सोबतच्या लोकांकडून केवळ प्रेम मिळाल्यास तुमच्यातलं सर्वोत्तम व्यक्त होऊ शकतं. तुम्ही आनंदी आणि समाधानी असाल. आजचा दिवस कामात यश देणारा आहे. चांगला आर्थिक लाभ प्राप्त कराल. कोणी तरी खास व्यक्ती तुमच्यासाठी काही तरी अधिक चांगलं करील.
Lucky Number : 18
Lucky Colour : Red
नंबर 2 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20, 29 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
advertisement
आज रविवारी नशिबाचे चढ-उतार सहन कराल. सुट्टी असल्यानं काही ग्रुप अॅक्टिव्हिटीजमध्ये सहभागाची शक्यता आहे. तुम्ही बऱ्याच काळापासून ज्याची प्रतीक्षा करत होतात, ते ताब्यात घेण्याची वेळ आली आहे. कुटुंब आणि जोडीदारासोबतची रिलेशनशिप उत्तम आहे.
Lucky Number : 7
Lucky Colour : Lemon
नंबर 3 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21, 30 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
advertisement
पूर्वी केलेल्या काही कामांमुळे लाभ होईल, अनपेक्षित ठिकाणांहून तुमचं कौतुक होऊ शकतं. आज कुटुंबाकडून आनंदाचे मोठे क्षण अनुभवता येतील. त्वचेची काही समस्या असल्यास चांगल्या तज्ज्ञाची भेट घ्या. व्यवसाय समृद्ध होईल. तुमचं उत्पन्नही वाढेल. तुमच्या जोडीदाराचं आरोग्य हा या काळात मोठ्या चिंतेचा विषय असेल. पण, सगळ्यावर मार्ग निघेल.
Lucky Number : 22
advertisement
Lucky Colour : Indigo
नंबर 4 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22, 31यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
रविवारी घरातील खरेदीकडे कल असेल. आरामदायक सुखाची साधनं आपल्याकडे असावीत ही भावना दिवसभर राहील. शेजारील विरोधक सक्रिय आहेत. तुम्ही क्लृप्त्या आणि मुत्सद्देगिरी वापरून त्यांना नामोहरम करू शकता. आज अतिरिक्त खर्चाच्या मूडमध्ये असाल. जोडीदारासोबत काही संस्मरणीय क्षण व्यतीत कराल.
advertisement
Lucky Number : 18
Lucky Colour : Rosy Brown
नंबर 5 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 5, 14, 23 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
रविवारचा दिवस असूनही उच्चपदस्थ लोकांच्या माध्यमातून बरंच काही मिळवाल. मानसिक आणि शारीरिक ऊर्जा सर्वोच्च पातळीवर आहे. त्यामुळे तु्म्हाला शक्तिशाली असल्यासारखं वाटत आहे. आता मिळालेल्या माहितीच्या आधारे तुम्ही आर्थिक लाभ प्राप्त करू शकता. सध्याच्या रिलेशनशिपवर मळभ दाटून येईल. पुन्हा जुळण्यासाठी प्रयत्न करू नका. काळ हेच त्यावर उत्तर आहे.
advertisement
Lucky Number : 17
Lucky Colour : White
नंबर 6 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 6, 15, 24 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
बराच काळ प्रलंबित असलेलं काम आज आश्चर्यकारकरीत्या अगदी सहजतेने पूर्ण होईल. कामात अडथळ्यांमुळे छोटी कामे पूर्ण होणार नाहीत. ज्यांच्याकडे तुम्ही खूप आकर्षित झालात झालात, अशा एखाद्या नव्या व्यक्तीशी भेट होईल; मात्र पहिलं पाऊल कसं उचलावं, याबद्दल तुम्हाला कळत नाहीये.
advertisement
Lucky Number : 7
Lucky Colour : Maroon
नंबर 7 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 7, 16, 25 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
रविवार कामाचा आहे, बडा नेता तुम्हाला मदत करील. आयुष्यात आरामदायक सुखाची साधनं हवीत ही इच्छा दिवसभर कायम राहील. आजारी पडण्याची शक्यता आहे. सार्वजनिक संबंधांतून चांगला लाभ होण्याची शक्यता आहे. आयुष्यात रोमान्समुळे तुम्हाला पूर्णत्वाची भावना मिळेल. तुम्हाला हवेत चालल्यासारखं वाटेल.
Lucky Number : 1
Lucky Colour : Light Red
नंबर 8 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 8, 17, 26 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
रविवारी कामांचा गोंधळ उडेल, त्यातच कोणा तरी महत्त्वाच्या व्यक्तीचा तुमच्याबद्दल गैरसमज होईल. त्याची चिंता वाटेल. कोणी मदत करायला पुढे आलं तर ती मदत स्वीकारताना सावध राहा. फसवणुकीची शक्यता आहे. विवाहबाह्य संबंधांची शक्यता आहे.
Lucky Number : 11
Lucky Colour : Peach
नंबर 9 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 9, 18, 27 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
रविवारचा दिवस थोडा गोंधळाचा असेल, काही काळापूर्वी रिलेशनशिपमध्ये झालेल्या दुखापतीवर तुमचा समजूतदारपणा हे औषध ठरेल. आज खरेदीचा मूड असेल. घरासाठी काही खरेदी कराल. शंका असल्यास वैद्यकीय तपासणी करून घ्या. तुम्ही कदाचित काही दिवसांपासून त्याकडे दुर्लक्ष करत असाल. आज आर्थिक योग आहे.
Lucky Number : 6
Lucky Colour : Red
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 27, 2025 7:31 PM IST
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Numerology: रविवारी सूर्यकृपा होणार! या 3 मूलांकाचे लोक अडचणीतून अलगद बाहेर पडतील