Sarva Pitru Amavasya 2025: पितृपक्षात काही चुकलं-राहीलं असलं तरी पूर्वज माफ करतील; आज एक काम चुकवू नका

Last Updated:

Sarva Pitru Amavasya 2025: पितृपक्षाचा शेवटचा दिवस असल्यानं करणं गरजेचं आहे. त्यानं रुष्ट झालेले पूर्वजही शांत होतात. धार्मिक श्रद्धेनुसार या दिवशी पितृ स्तोत्र आणि पितृ कवचचे पठण केल्याने पूर्वजांची नाराजी दूर होऊ शकते आणि त्यांच्याकडून वंशजांना समृद्धी, संतती सुख आणि आरोग्याचे आशीर्वाद मिळतात.

News18
News18
मुंबई : आज सर्वपित्री दर्श अमावस्या आहे, त्याला अमावस्या महालय असंही म्हणतात. हा दिवस विशेषतः पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी समर्पित आहे. या दिवशी तर्पण आणि पिंडदानाचे विशेष महत्त्व आहे. अनेक घराघरात आज पुरण पोळीचा नैवेद्य पितरांसाठी केला जातो. सर्वच पूर्वजांच्या कृपेसाठी आज नैवेद्य अर्पण करून त्यांना तृप्त केलं जातं. छतावर ठेवलेला नैवेद्य जर कावळ्यानं शिवला तर तो पूर्वजांना तो प्राप्त झाल्याचे मानले जाते. याशिवाय आणखी एक गोष्ट पितृपक्षाचा शेवटचा दिवस असल्यानं करणं गरजेचं आहे. त्यानं रुष्ट झालेले पूर्वजही शांत होतात. धार्मिक श्रद्धेनुसार या दिवशी पितृ स्तोत्र आणि पितृ कवचचे पठण केल्याने पूर्वजांची नाराजी दूर होऊ शकते आणि त्यांच्याकडून वंशजांना समृद्धी, संतती सुख आणि आरोग्याचे आशीर्वाद मिळतात. संपूर्ण पितृ स्तोत्र आणि पितृ कवच पठण आज वाचा, त्याचा फायदा संपूर्ण कुटुंबाला होईल.
।।पितृ स्तोत्र ।।
अर्चितानाममूर्तानां पितृणां दीप्ततेजसाम् ।
नमस्यामि सदा तेषां ध्यानिनां दिव्यचक्षुषाम् ।।
इन्द्रादीनां च नेतारो दक्षमारीचयोस्तथा ।
सप्तर्षीणां तथान्येषां तान् नमस्यामि कामदान् । ।
मन्वादीनां च नेतार: सूर्याचन्दमसोस्तथा ।
तान् नमस्यामहं सर्वान् पितृनप्युदधावपि ।।
नक्षत्राणां ग्रहाणां च वाय्वग्न्योर्नभसस्तथा ।
द्यावापृथिवोव्योश्च तथा नमस्यामि कृताञ्जलि: ।।
देवर्षीणां जनितृंश्च सर्वलोकनमस्कृतान् ।
अक्षय्यस्य सदा दातृन् नमस्येहं कृताञ्जलि: ।।
advertisement
प्रजापते: कश्पाय सोमाय वरुणाय च ।
योगेश्वरेभ्यश्च सदा नमस्यामि कृताञ्जलि: ।।
नमो गणेभ्य: सप्तभ्यस्तथा लोकेषु सप्तसु ।
स्वयम्भुवे नमस्यामि ब्रह्मणे योगचक्षुषे ।।
सोमाधारान् पितृगणान् योगमूर्तिधरांस्तथा ।
नमस्यामि तथा सोमं पितरं जगतामहम् ।।
अग्रिरूपांस्तथैवान्यान् नमस्यामि पितृनहम् ।
अग्रीषोममयं विश्वं यत एतदशेषत: ।।
ये तु तेजसि ये चैते सोमसूर्याग्रिमूर्तय: ।
जगत्स्वरूपिणश्चैव तथा ब्रह्मस्वरूपिण: ।।
advertisement
तेभ्योखिलेभ्यो योगिभ्य: पितृभ्यो यतामनस: ।
नमो नमो नमस्तेस्तु प्रसीदन्तु स्वधाभुज ।।
।।पितृ कवच।।
कृणुष्व पाजः प्रसितिम् न पृथ्वीम् याही राजेव अमवान् इभेन।
तृष्वीम् अनु प्रसितिम् द्रूणानो अस्ता असि विध्य रक्षसः तपिष्ठैः॥
तव भ्रमासऽ आशुया पतन्त्यनु स्पृश धृषता शोशुचानः।
advertisement
तपूंष्यग्ने जुह्वा पतंगान् सन्दितो विसृज विष्व-गुल्काः॥
प्रति स्पशो विसृज तूर्णितमो भवा पायु-र्विशोऽ अस्या अदब्धः।
यो ना दूरेऽ अघशंसो योऽ अन्त्यग्ने माकिष्टे व्यथिरा दधर्षीत्॥
उदग्ने तिष्ठ प्रत्या-तनुष्व न्यमित्रान् ऽओषतात् तिग्महेते।
यो नोऽ अरातिम् समिधान चक्रे नीचा तं धक्ष्यत सं न शुष्कम्॥
ऊर्ध्वो भव प्रति विध्याधि अस्मत् आविः कृणुष्व दैव्यान्यग्ने।
अव स्थिरा तनुहि यातु-जूनाम् जामिम् अजामिम् प्रमृणीहि शत्रून्।
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Sarva Pitru Amavasya 2025: पितृपक्षात काही चुकलं-राहीलं असलं तरी पूर्वज माफ करतील; आज एक काम चुकवू नका
Next Article
advertisement
OTT Trending: ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन, 2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने, ओटीटीवर वर 4 कपलची कहाणी हिट
ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन,2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने,OTT ट्रेंडिंग
    View All
    advertisement