Premanand Maharaj: ...म्हणजे आळस येणार नाही, मोबाईलची सवयसुद्धा सुटेल; प्रेमानंद महाराजांच्या कार्यक्षमता सुधारण्याच्या टिप्स

Last Updated:

Premanand Maharaj Latest Tips: प्रेमानंद महाराज सांगतात, आळस हा रोग नाही. तो आपल्या आचरणातील एक दोष आहे. एखादी व्यक्ती आपलं खाणं-पिणं, झोपणं आणि बोलण्याचं प्रमाण वाढवू किंवा कमी करू शकते. त्याचप्रमाणे आळसावरही नियंत्रण ठेवता येतं.

News18
News18
मुंबई : आजकाल ज्या महाराजांची जास्त चर्चा आहे, त्यामध्ये प्रेमानंद महाराजांचे नाव आघाडीवर आहे. त्यांचे विचार लोकांवर प्रभाव टाकत आहेत. सध्याच्या धकाधकीच्या जीवनात चांगले आयुष्य जगण्यासाठी लोकांना या महाराजांचे विचार प्रेरक वाटतात. त्यांचे विचार ऐकण्यासाठी देश-विदेशातून लोक येतात. आळस आणि मोबाईलची सवय किंवा मोबाईलचं व्यसन सोडण्यासाठी एखाद्या व्यक्तीनं काय केलं पाहिजे याबाबत महाराजांनी सांगितलेले विचार आज आपण जाणून घेऊ.
प्रेमानंद महाराज सांगतात, आळस हा रोग नाही. तो आपल्या आचरणातील एक दोष आहे. एखादी व्यक्ती आपलं खाणं-पिणं, झोपणं आणि बोलण्याचं प्रमाण वाढवू किंवा कमी करू शकते. त्याचप्रमाणे आळसावरही नियंत्रण ठेवता येतं.
त्यांच्या मते, जो माणसू आधी 35 रोट्या खाऊ शकत होता तो साधना करून दीड चपात्यावरही तृप्त होऊ शकतो. कारण सरावाने सर्वकाही बदलते. त्याचप्रमाणे झोपेवरही नियंत्रण ठेवता येतं. जी व्यक्ती 7 तास झोपते. सरावाच्या मदतीने तो फक्त 3 तासातही पूर्ण विश्रांती घेऊ शकतो.
advertisement
कमी बोला, कमी खा, कमी झोपा -
आळसावर विजय मिळवण्याचे सरळ साधे सूत्र सांगताना महाराज सांगतात - "कमी बोला. कमी खा. कमी झोपा आणि देवाचं नामस्मरण करा - मग आळस आपोआप गायब होईल. जेव्हा व्यक्तीचे मन देवाच्या नामस्मरणात आनंद घेऊ लागतं. तेव्हा मोबाईल आणि मनोरंजनाचे बाह्य आकर्षण आपोआप गळून पडतं.
मोबाईलचा वापर चांगल्या गोष्टींसाठी केला पाहिजे असं त्यांनी सांगितलं. मोबाईलवर बिनाकामाच्या गोष्टीमंध्ये लोकांचा वेळ जात आहे. नको ते फोटो-व्हिडिओ आपण पाहत वेळेचा अपव्यय होतोय. मोकळ्या वेळात मोबाईल वापरायचा असेल तर. तेव्हा सत्संग श्रवण, शास्त्र वाचन आणि नामस्मरण करावं, यापासून व्यक्तीला चांगल्याची प्रेरणा मिळतेय. महाराजांच्या मते, चांगलं स्वीकारा, वाईटाचा त्याग करा, हीच सुबुद्धी आहे.
advertisement
दैनंदिन व्यवहारात शिस्त पाहिजे -
आपल्या रोजच्या आयुष्याला शिस्त हवी. आळस घालवण्यासाठी महाराज सांगतात की, पहाटे लवकर उठण्यासाठी गजर नको मनाचा दृढनिश्चय असायला पाहिजे. पहाटे साडेतीन वाजता उठायचे आहे, असे एखाद्यानं ठामपणे ठरवलं तर भगवंतच त्याचे डोळे उघडतील.
झोपेतून उठल्यानंतर लगेच चेहरा धुवा आणि नामस्मरण सुरू करा. नामस्मरण करताना झोप येऊ लागली तर फेरफटका मारा, पाणी प्या आणि पुन्हा ध्यान करा. या अखंड सरावाने शरीर आणि मन दोन्ही हलके होतात.
advertisement
मोबाईलचा वप्रेमानंद महाराज सांगतात, मोबाइल ही खूप चांगली गोष्ट आहे पण तो वापरण्यासाठी विवेक आवश्यक आहे. त्याचा उपयोग ज्ञान, सेवा आणि सत्संगासाठीच केला पाहिजे. तो निष्काळजीपणे आणि चुकीच्या कामांसाठी वापरला गेला नाही पाहिजे. कोणत्याही सदृढ व्यक्तीसाठी सहा तासांची झोप पुरेशी असते, पहाटे पाच वाजता उठणे शुभ मानले जाते. आपल्या जीवनाची सुरुवात नेहमी भगवंताच्या नामाने करा आणि दिवसभर आपले कार्य करत असतानाही मनात नामस्मरण करा. इतकं तुम्ही खऱ्या मनानं करू लागल्यानंतर आपोआप फरक तुम्हाला जाणवू लागेल.
view comments
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Premanand Maharaj: ...म्हणजे आळस येणार नाही, मोबाईलची सवयसुद्धा सुटेल; प्रेमानंद महाराजांच्या कार्यक्षमता सुधारण्याच्या टिप्स
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement