सकाळी 7 ते रात्री 12, या मराठी फिल्मचा प्रत्येक शो हाऊसफुल! रिलीजच्या दुसऱ्या आठवड्यातही आहे ट्रेडिंग
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Marathi Movie : बॉक्स ऑफिसवर सध्या एक मराठी सिनेमा गाजतोय. सकाळी 7 ते रात्री 12 पर्यंत या मराठी फिल्मचा प्रत्येक शो हाऊसफुल असल्याचं पाहायला मिळत आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ या फिल्मबद्दल बोलताना दिग्दर्शक हेमंत ढोमे म्हणाला,"मराठी प्रेक्षक दर्जेदार आणि आशयपूर्ण चित्रपटाला नेहमीच मनापासून साथ देतो. ‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ला मिळणारा प्रतिसाद प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर अपेक्षेपलीकडचा आहे. इतका मोठा आणि सातत्यपूर्ण प्रतिसाद आम्ही कल्पनाही केली नव्हती".
advertisement
हेमंत ढोमे पुढे म्हणाला,"सकाळपासून रात्रीपर्यंत हाऊसफुल शो, प्रेक्षकांच्या डोळ्यात दिसणारी भावुकता आणि चित्रपटानंतर मिळणाऱ्या प्रतिक्रिया हे सगळं अत्यंत भारावून टाकणारं आहे. चांगल्या गोष्टीला प्रोत्साहन देण्याची संस्कृती हीच मराठी चित्रपटसृष्टीची खरी ताकद आहे. या प्रेमाने संपूर्ण टीमला नव्या उमेदीने पुढे काम करण्याचं बळ दिलं आहे".
advertisement
प्रेक्षक आणि समीक्षकांकडून ‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ या चित्रपटाचे भरभरून कौतुक होत आहे. दिग्दर्शक हेमंत ढोमे, कलाकारांची कामगिरी, संगीत आणि कथानक यांची विशेष दखल प्रेक्षक घेत आहेत. “हेमंत ढोमे यांनी अत्यंत उत्कृष्ट चित्रपट दिला आहे,” “शाळेतील आठवणी पुन्हा जिवंत झाल्या,” “मराठी भाषा व मराठी शाळेची गळचेपी कोणताही अतिरेक न करता प्रभावीपणे मांडली आहे,” अशा प्रतिक्रिया सातत्याने व्यक्त होत आहेत. चित्रपटाची संवेदनशील मांडणी प्रेक्षकांना भावुक करून असल्याचे अनुभव अनेकांकडून समोर येत आहेत.










