Solapur News: सततच्या पोटदुखीला कंटाळला, शिक्षकानं केलं असं, सारं गाव हळहळलं!
- Reported by:Patel Irfan Hassan
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Solapur News: जिल्हा परिषद शाळेत शिक्षक असल्याने ते बार्शी शहरात राहण्यास होते. तर आई वडील हे मूळ गावी राहत असून शेती करत होते.
सोलापूर: आरोग्याच्या समस्येनं घेरलं की भलेभलेही हात टेकतात. सोलापुरातील बार्शी तालुक्यात असाच काहीसा प्रकार घडला आहे. कुसळंब येथील एका 51 वर्षीय शिक्षकाने आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. राजेंद्र चतुर्भुज कोरे असे आत्महत्या केलेल्या शिक्षकाचे नाव असून ते गेल्या काही काळापासून पोटाच्या आजाराने त्रस्त होते. याप्रकरणी बार्शी तालुका पोलिसांत नोंद झाली आहे.
पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, आत्महत्या केलेले राजेंद्र चतुर्भुज कोरे हे मूळचे बार्शी तालुक्यातील शेंद्री गावातील रहिवासी होते. परंतु, खांडवी येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक असल्याने ते बार्शी शहरात राहण्यास होते. तर आई-वडील हे मूळ गावी राहत असून शेती करत होते. शिक्षक राजेंद्र यांना गेल्या काही वर्षांपासून पोटदुखीचा त्रास होता. त्यामुळे ते मानसिक तणावात देखील होते.
advertisement
शनिवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास शेतकरी आसाराम मडके हे शेताकडे जात होते. तेव्हा राजेंद्र हे शेतातील आंब्याच्या झाडाला गळफास घेतलेल्या स्थितीत दिसून आले. आसाराम यांनी तात्काळ या घटनेची माहिती पोलिसांना दिली. बार्शी तालुका पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी घटनास्थळी तात्काळ हजर झाले व तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांना चिठ्ठी सापडली. ही चिठ्ठी मयत राजेंद्र कोरे यांची होती व त्यामध्ये त्यांनी पोटाच्या आजारामुळे मी आत्महत्या करत असल्याचे लिहिले होते. आई-वडिलांनी मुलाचा मृतदेह पाहताच हंबरडा फोडला.
view commentsLocation :
Solapur,Maharashtra
First Published :
Jan 11, 2026 9:41 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सोलापूर/
Solapur News: सततच्या पोटदुखीला कंटाळला, शिक्षकानं केलं असं, सारं गाव हळहळलं!








