Shardiya Navratri: नवरात्रीमध्ये आज देवी ब्रह्मचारिणीची पूजा! या अभिजित मुहूर्तावर करून घ्या सर्व विधी

Last Updated:

Navratri 2025 2nd Day Brahmacharini : देवीला पांढरी किंवा पिवळी वस्त्रे आणि फुले अर्पण करावीत. देवीला विशेषतः कमळाचे फूल अर्पण केले जाते. देवीला साखरेचा नैवेद्य अर्पण करणे शुभ मानले जाते. याशिवाय, फळे, मिठाई आणि इतर सात्विक पदार्थ अर्पण करू शकता.

News18
News18
मुंबई : आज शारदीय नवरात्राचा दुसरा दिवस असून या दिवशी देवी दुर्गेचे दुसरे रुप ब्रह्मचारिणीची मातेची पूजा केली जाते. या नावावरूनच तिच्या शक्ती प्रकट होतात. ब्रह्मा म्हणजे तपश्चर्या आणि चारिणी म्हणजे तपश्चर्या करणारी. देवी ब्रह्मचारिणी तिच्या भक्तांना ज्ञान, बुद्धी आणि आध्यात्मिक शक्तीचे आशीर्वाद देते. तिची पूजा केल्यानं जीवनात निर्णय घेण्याची क्षमता आणि खऱ्या ज्ञानाचा प्रकाश मिळतो. ब्रह्मचारिणीची पूजा पद्धत, मंत्र, नैवेद्य आणि आरती याबद्दल जाणून घेऊया.
ब्रह्मचारिणीच्या पूजेचे महत्त्व -
ब्रह्मचारिणी ही नवरात्राची दुसरी देवी असून तिला तपश्चर्या आणि संयमाचे प्रतीक मानले जाते. ब्रह्मचारिणी देवीनं कठोर तपश्चर्येद्वारे भगवान शिवाला पती म्हणून प्राप्त केले. तिची पूजा केल्याने भक्तात तपश्चर्या, संयम, त्याग आणि आत्मसंयम यांची शक्ती निर्माण होते. देवी ब्रह्मचारिणी तिच्या भक्तांना ज्ञान, बुद्धी आणि आध्यात्मिक शक्तीचा आशीर्वाद देते. तिची पूजा केल्याने दृढनिश्चय आणि खऱ्या ज्ञानाचा प्रकाश मिळतो. माता ब्रह्मचारिणीची पूजा केल्यानं घरात आनंद, शांती आणि सौभाग्य येते आणि ग्रह आणि तार्‍यांच्या अशुभ प्रभावापासूनही मुक्तता मिळते.
advertisement
माता ब्रह्मचारिणीचे रूप - ब्रह्मचारिणीचे रूप आकर्षक असून तिचा रंग गोरा (तेजस्वी) आहे. तिचा चेहरा अत्यंत शांत आणि साधा आहे, तो तपस्येचा आभा प्रतिबिंबित करतो. तिची पांढरी वस्त्रे, पवित्रता आणि ब्रह्मचर्य यांचे प्रतीक आहे. तिचे दागिने साधे आहेत, कारण ती एक तपस्वी आहे.
ब्रह्मचारिणी पूजेचा मुहूर्त -
ब्रह्म मुहूर्त: सकाळी 4:36 ते 5:23 पर्यंत
advertisement
अभिजित मुहूर्त: सकाळी 11:50 ते दुपारी 12:38 पर्यंत
गोधुली मुहूर्त: संध्याकाळी 6:17 ते संध्याकाळी 6:41
अमृत ​​काल: सकाळी 7:06 ते सकाळी 8:51
द्विपुष्कर योग: दुपारी 1:40 ते 4:51 AM, 24 सप्टेंबर
ब्रह्मचारिणीला नैवेद्य आणि फुले -
आज तुम्ही देवी ब्रह्मचारिणीला साखर, खीर, पंचामृत, बर्फी इत्यादी अर्पण करू शकता. देवीला पांढरा रंग प्रिय आहे, त्यामुळे तुमच्या पूजेत पांढरा रंग वापरा. तसेच देवीला पांढरी फुले अर्पण करा.
advertisement

ब्रह्मचारिणी मंत्र

दधाना करपद्माभ्याम्, अक्षमालाकमण्डलू।
देवी प्रसीदतु मयि, ब्रह्मचारिण्यनुत्तमा।।
ॐ ऐं ह्रीं क्लीं ब्रह्मचारिण्यै नम:
दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोऽस्तुते।।

ब्रह्मचारिणी पूजा विधि

पूजा सुरू करण्यापूर्वी सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि स्वच्छ वस्त्रे परिधान करावीत. पूजा करण्याचे ठिकाण आणि देवीची मूर्ती किंवा प्रतिमा स्वच्छ करावी. हातात पाणी आणि अक्षता घेऊन पूजा सुरू करण्याचा संकल्प करावा. देवीच्या मूर्तीला किंवा प्रतिमेला पंचामृताने (दूध, दही, तूप, मध आणि साखर यांचे मिश्रण) अभिषेक करावा. देवीला पांढरी किंवा पिवळी वस्त्रे आणि फुले अर्पण करावीत. देवीला विशेषतः कमळाचे फूल अर्पण केले जाते. देवीला साखरेचा नैवेद्य अर्पण करणे शुभ मानले जाते. याशिवाय, फळे, मिठाई आणि इतर सात्विक पदार्थ अर्पण करू शकता. देवीच्या पूजेमध्ये 'ब्रह्मचारिणी' देवीचा मंत्र जपल्याने विशेष फलप्राप्ती होते.
advertisement

मां ब्रह्मचारिणी आरती

जय अंबे ब्रह्माचारिणी माता।
जय चतुरानन प्रिय सुख दाता।
ब्रह्मा जी के मन भाती हो।
ज्ञान सभी को सिखलाती हो।
ब्रह्मा मंत्र है जाप तुम्हारा।
जिसको जपे सकल संसारा।
जय गायत्री वेद की माता।
जो मन निस दिन तुम्हें ध्याता।
कमी कोई रहने न पाए।
कोई भी दुख सहने न पाए।
advertisement
उसकी विरति रहे ठिकाने।
जो तेरी महिमा को जाने।
रुद्राक्ष की माला ले कर।
जपे जो मंत्र श्रद्धा दे कर।
आलस छोड़ करे गुणगाना।
मां तुम उसको सुख पहुंचाना।
ब्रह्माचारिणी तेरो नाम।
पूर्ण करो सब मेरे काम।
भक्त तेरे चरणों का पुजारी।
रखना लाज मेरी महतारी। 
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
view comments
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Shardiya Navratri: नवरात्रीमध्ये आज देवी ब्रह्मचारिणीची पूजा! या अभिजित मुहूर्तावर करून घ्या सर्व विधी
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement