advertisement

Tulsi Puja Vidhi: तुळशीमध्ये या 2 गोष्टी ठेवणं शुभ फळदायी; लक्ष्मीची कृपा घरावर अबाधित राहते

Last Updated:

Tulsi Plant Puja Vidhi: आपल्याकडे जवळपास प्रत्येक घरात तुळशी वृंदावन किंवा कुंडीतही तुळशीचे रोप लावतात. सकाळ-संध्याकाळी योग्य विधींनी तुळशीची पूजा केली जाते. तुळशीसाठी दिवा लावण्याची परंपरा आहे. ज्या घरात तुळशीची पूजा...

News18
News18
मुंबई : हिंदू धर्मात तुळशीचे रोप पूजनीय मानले जाते. आपल्याकडे जवळपास प्रत्येक घरात तुळशी वृंदावन किंवा कुंडीतही तुळशीचे रोप लावतात. सकाळ-संध्याकाळी योग्य विधींनी तुळशीची पूजा केली जाते. तुळशीसाठी दिवा लावण्याची परंपरा आहे. ज्या घरात तुळशीची पूजा केली जाते, त्या घरात नेहमीच सुख, समृद्धी आणि शांती असते, असे मानले जाते. याशिवाय काही खास गोष्टी तुळशीच्या रोपाशेजारी ठेवल्या तर घर स्वर्गासारखे बनू शकते. देवी लक्ष्मीची कृपा घरावर नेहमीच राहील. भागवताचार्य राघवेंद्र शास्त्री यांच्या मते तुळशीजवळ काय ठेवणे चांगले मानले जाते, जाणून घेऊया
तुळशीजवळ गोमती चक्र ठेवा - धार्मिक मान्यतेनुसार, ज्या घरात तुळशीचे रोप असते तिथे यमराज यायला घाबरतात. गोमती चक्र तुळशीच्या झाडाखाली ठेवले तर घरात सकारात्मकता वाढते. या चक्राच्या प्रभावामुळे घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते.
शाळीग्राम तुळशीच्या रोपा - पुराणानुसार शाळिग्रामला भगवान विष्णूचे रूप मानले जाते आणि तुळशीला देवी लक्ष्मीचे रूप मानले जाते. म्हणून, शास्त्रांमध्ये असे मानले जाते की शाळिग्राम तुळशीजवळ ठेवण्याचे विशेष महत्त्व आहे. असे मानले जाते की, शाळिग्राम तुळशीच्या झाडाजवळ ठेवला तर देवी लक्ष्मीचा आशीर्वाद घरावर राहतो आणि धान्य कोठार भरलेले राहते.
advertisement
तुळशीमध्ये हळद - धार्मिक मान्यतेनुसार, हळद श्री हरी विष्णूंना प्रिय मानली जाते, तुळशीला देवी लक्ष्मीचे रूप मानले जाते. त्यामुळे तुळशीच्या रोपात थोडीशी हळद ठेवल्यास व्यक्तीचे भाग्य बदलते. हा उपाय केल्याने देवी लक्ष्मी कुटुंबावर आपला विशेष आशीर्वाद देते, व्यक्तीच्या नशिबाचे बंद दरवाजे उघडतात.
advertisement
कच्चे दूध अर्पण करणे - घरात असलेल्या तुळशीच्या रोपाची सकाळी आणि संध्याकाळी योग्य विधींनी पूजा करावी. तसेच आठवड्यातून एकदा तुळशीच्या झाडाला कच्चे दूध अर्पण करावे. या उपायाचा अवलंब केल्याने घरात सुख-समृद्धी येते आणि व्यक्तीला कधीही आर्थिक टंचाईचा सामना करावा लागत नाही, असे मानले जाते.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
view comments
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Tulsi Puja Vidhi: तुळशीमध्ये या 2 गोष्टी ठेवणं शुभ फळदायी; लक्ष्मीची कृपा घरावर अबाधित राहते
Next Article
advertisement
BMC Mayor Election: महापौर निवडीआधी मोठी घडामोड, शिंदे गटानं घेतला मोठा निर्णय, भाजपच्या रणनीतिला धक्का, ठाकरेंना दिलासा?
महापौर निवडीआधी मोठी घडामोड, शिंदे गटाचा मोठा निर्णय, भाजपच्या रणनीतिला धक
  • भाजप आणि शिंदे सेना यांच्यातील अंतर्गत हालचालींना वेग आला आहे.

  • महापौर निवडीसाठी काठावरचं बहुमत असलेल्या भाजप-शिंदे गटामध्ये सत्ता वाटपावर चर्चा

  • सत्ता संघर्षाच्या दरम्यान शिवसेना शिंदे गटाने महत्त्वाचा निर्णय घेतला

View All
advertisement