Navratri Day 1 Puja Vidhi: नवरात्राच्या पहिल्या दिवशी देवी शैलपुत्रीची पूजा; अशा पद्धतीनं करा सर्व विधी

Last Updated:

Navratri Day 1 Puja Vidhi: पर्वतीय राजा हिमालयाची कन्या असल्यानं तिला शैलपुत्री म्हणतात. तिची पूजा केल्याने मानसिक शांती, स्थिरता आणि सकारात्मक विचार मिळतात. नवरात्राच्या पहिल्या दिवसाची पूजा पद्धत, शुभ वेळ, मंत्र, कथा, आरती आणि शुभ रंग याबद्दल जाणून घेऊया.

News18
News18
मुंबई : शारदीय नवरात्राची सुरुवात 22 सप्टेंबर 2025 रोजी कलश प्रतिष्ठापनेनं होणार आहे. दसऱ्यानिमित्त आधीच लोकांनी घराची स्वच्छता केलेली असते, स्वच्छता करून घटस्थापनेचा विधी केला जातो. नवरात्राच्या पहिल्या दिवशी दुर्गेच्या पहिल्या रूपातील शैलपुत्री मातेची पूजा केली जाते. पर्वतीय राजा हिमालयाची कन्या असल्यानं तिला शैलपुत्री म्हणतात. तिची पूजा केल्याने मानसिक शांती, स्थिरता आणि सकारात्मक विचार मिळतात. नवरात्राच्या पहिल्या दिवसाची पूजा पद्धत, शुभ वेळ, मंत्र, कथा, आरती आणि शुभ रंग याबद्दल जाणून घेऊया.
नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी शैलपुत्रीची पूजा -
नवरात्राच्या पहिल्या दिवशी देवी शैलपुत्रीची पूजा करण्यापूर्वी घटस्थापनेचा विधी करा. कलश प्रतिष्ठापनेनंतर देवीच्या समोर तुपाचा दिवा लावून फुले अर्पण करा. देवीला बर्फी, खीर आणि रबडी इ. अर्पण करा. देवीचे मंत्र जप करा. शेवटी, शैलपुत्री मातेची आरती करा आणि सर्वांना प्रसाद वाटा.
नवरात्रीचा पहिला दिवस - नवरात्रीच्या पहिल्या दिवशी पिवळे कपडे परिधान करणे शुभ मानले जाते. असे मानले जाते की या दिवशी हा रंग परिधान केल्यानं देवी शैलपुत्रीचे आशीर्वाद मिळतात. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी शैलपुत्रीला बर्फी, खीर आणि रबडीसारखे पांढरे नैवेद्य अर्पण करा.
advertisement

देवी शैलपुत्रीची आरती -

शैलपुत्री मां बैल असवार। करें देवता जय जयकार।
शिव शंकर की प्रिय भवानी। तेरी महिमा किसी ने ना जानी।
पार्वती तू उमा कहलावे। जो तुझे सिमरे सो सुख पावे।
ऋद्धि-सिद्धि परवान करे तू। दया करे धनवान करे तू।
सोमवार को शिव संग प्यारी। आरती तेरी जिसने उतारी।
advertisement
उसकी सगरी आस पुजा दो। सगरे दुख तकलीफ मिला दो।
घी का सुंदर दीप जला के। गोला गरी का भोग लगा के।
श्रद्धा भाव से मंत्र गाएं। प्रेम सहित फिर शीश झुकाएं।
जय गिरिराज किशोरी अंबे। शिव मुख चंद्र चकोरी अंबे।
मनोकामना पूर्ण कर दो। भक्त सदा सुख संपत्ति भर दो।
advertisement

शैलपुत्री देवीची कथा -

पूर्वजन्मात देवी शैलपुत्री सती या नावाने ओळखली जात होती. त्या दक्ष प्रजापतींची कन्या होत्या. सतीचे लग्न भगवान शिवाशी झाले होते. एकदा दक्ष प्रजापतीने एका मोठ्या यज्ञाचे आयोजन केले. त्यांनी आपल्या यज्ञात सर्व देवदेवतांना आमंत्रण दिले, पण जावई असलेल्या भगवान शिवाला आमंत्रण दिले नाही. सतीला जेव्हा याबद्दल समजले, तेव्हा तिला खूप दुःख झाले. तिने आपल्या पित्याच्या घरी न बोलावता जाण्याचा निर्णय घेतला. भगवान शिवाने तिला न जाण्याचा सल्ला दिला, पण सतीने ऐकले नाही. ती यज्ञात पोहोचली, पण तिथे तिचा आणि भगवान शिवाचा अपमान झाला. दक्ष प्रजापतीने शिवाचा अपमान केला, ज्यामुळे सतीला असह्य वेदना झाल्या. आपल्या पतीचा अपमान सहन न झाल्याने सतीने त्याच यज्ञकुंडात स्वतःला जाळून घेतले. तिच्या आत्मयज्ञामुळे भगवान शिव खूप क्रोधित झाले. त्यांनी आपला गण, वीरभद्र, याला दक्ष प्रजापतीचा यज्ञ नष्ट करण्यासाठी पाठवले आणि नंतर सतीचा मृतदेह घेऊन तांडव नृत्य केले.
advertisement

देवी शैलपुत्री मंत्र -

1. “ॐ देवी शैलपुत्र्यै नमः॥”
2. “वन्दे वाञ्छितलाभाय चन्द्रार्धकृतशेखराम्।
वृषारूढां शूलधरां शैलपुत्रीं यशस्विनीम्॥”
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
view comments
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Navratri Day 1 Puja Vidhi: नवरात्राच्या पहिल्या दिवशी देवी शैलपुत्रीची पूजा; अशा पद्धतीनं करा सर्व विधी
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement