Ather ची मोठी घोषणा, हायटेक स्कुटर होणार छ.संभाजीनगरमध्ये तयार, असा आहे लूक

Last Updated:

अशातच आता  Ather Energy एथर एनर्जीने नवीन EL स्केलेबल प्लॅटफॉर्मसह एथर EL01 कन्स्पेट स्कूटर लाँच केली आहे.

News18
News18
सध्या भारतीय ऑटो इंडस्ट्रीमध्ये एकापेक्षा एक ईलेक्ट्रिक स्कुटर आणि बाइकची भाऊगर्दी केली आहे. अशातच आता  Ather Energy एथर एनर्जीने नवीन EL स्केलेबल प्लॅटफॉर्मसह एथर EL01 कन्स्पेट स्कूटर लाँच केली आहे. EL01 चं उत्पादन व्हर्जन हे नवीन डिझाईनवर आधारित ब्रँडचं पहिलं उत्पादन असेल. 2026 च्या सण उत्सवाच्या काळात हे मॉडेल लाँच करण्याचा कंपनीचा प्लॅन आहे. Ather Energy ची नवीन EL प्लॅटफॉर्म सेवा कालावधी 10,000 किमीपर्यंत वाढवली आहे, जी 5,000 किमीच्या जवळजवळ दुप्पट आहे. यामुळे असेंब्ली वेळ 15 टक्क्यांनी कमी होईल.
ACDC चार्जिंग सिस्टम
नवीन एथर EL प्लॅटफॉर्म ऑनबोर्ड चार्जरसह एक नवीन ACDC चार्जिंग सिस्टम दिली आहे, ज्यामुळे वाहन थेट मानक तीन-पिन घरगुती सॉकेटद्वारे चार्ज केलं जाऊ शकतं. ते जलद चार्जिंगला देखील स्पोर्ट करेल. हे स्केलेबल प्लॅटफॉर्म मॅक्सी-स्कूटरपासून ते  दुचाकी वाहनांपर्यंत आणि स्कूटरमध्ये बॅलेन्स करू शकतं.
advertisement
 हायटेक इलेक्ट्रॉनिक ब्रेकिंग सिस्टम
EL प्लॅटफॉर्म 2kWh ते 5kWh पर्यंतच्या बॅटरी पॅकशी सज्ज आहे. यात हायटेक इलेक्ट्रॉनिक ब्रेकिंग सिस्टम आहे, जी मुळात सीबीएस (कम्बाइंड ब्रेकिंग सिस्टम) ची  कॉपी आहे. ही नवीन आर्किटेक्चर एथरच्या भविष्यातील उत्पादनांना आधार देईल, परंतु ब्रँडच्या विद्यमान इलेक्ट्रिक स्कूटर त्यांच्या सध्याच्या चेसिसचा वापर करत राहतील.
दिवाळीच्या काळात लाँच 
Ather Energy EL01 कन्स्पेट स्कूटरमध्ये आयताकृती एलईडी हेडलाइट, एक लहान काळा एप्रन, रुंद हँडलबार, एक सिंगल-पीस सीट आणि एक आकर्षक एलईडी टेललॅम्प आहे. एथर EL01 ही नवीन ईएल प्लॅटफॉर्मवर डिझाइन केलेली पहिली इलेक्ट्रिक स्कूटर असू शकते, जी पुढील वर्षी दिवाळीत येऊ शकते. कंपनीने पुष्टी केली आहे की, त्यांचे आगामी ईएल प्लॅटफॉर्मवर आधारित मॉडेल महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर इथं असलेल्या नवीन उत्पादन सुविधेत तयार केले जातील.
view comments
मराठी बातम्या/ऑटो/
Ather ची मोठी घोषणा, हायटेक स्कुटर होणार छ.संभाजीनगरमध्ये तयार, असा आहे लूक
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement