एकदा टँक फूल केल्यास 800 KM धावेल ही बाईक! EMI फक्त 5 हजार

Last Updated:

Bajaj Platina 100: कंपनीने बजाज प्लॅटिना 100 मध्ये 102 सीसी इंजिन दिले आहे. हे इंजिन 7.9 पीएस च्या कमाल पॉवरसह 8.3 एनएमचा पीक टॉर्क जनरेट करते. चला जाणून घेऊया डिटेल्स.

बजाज प्लॅटिनो
बजाज प्लॅटिनो
मुंबई : तुम्ही दररोज अप-डाऊनसाठी बाईक शोधत असाल, जी किफायतशीर आहे आणि चांगली मायलेज देते. तर बजाज प्लॅटिना बाईक तुमच्यासाठी एक चांगला पर्याय असू शकते. विशेष म्हणजे जर तुम्ही ही बाईक खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही एकदाही पूर्ण पैसे न भरता फायनान्स देखील करू शकता. बजाज प्लॅटिना बाईक तुम्हाला कोणत्या ईएमआयवर मिळेल ते जाणून घेऊया.
दिल्लीमध्ये बजाज प्लॅटिना 100 बाईकची ऑन-रोड किंमत सुमारे 85 हजार रुपये आहे. एक्स-शोरूम किमतीव्यतिरिक्त, त्यात आरटीओ फी आणि विमा रक्कम देखील समाविष्ट आहे. ही बजाज बाईक खरेदी करण्यासाठी, जर तुम्ही 5 हजार रुपयांचे डाउन पेमेंट केले तर तुम्हाला बँकेकडून 80 हजार रुपयांचे बाईक कर्ज घ्यावे लागेल. ही कर्जाची रक्कम तुमच्या क्रेडिट स्कोअरवर अवलंबून असते.
advertisement
तुम्हाला कोणत्या EMIवर बाईक मिळेल?
तुमचा CIBIL स्कोअर चांगला असेल, तर तुम्हाला 9 टक्के व्याजदराने बाईक लोन मिळेल. जर तुम्हाला 3 वर्षांसाठी कर्ज मिळाले तर तुम्हाला दरमहा सुमारे 2800 रुपये EMI भरावे लागतील. या संपूर्ण कालावधीत तुम्हाला सुमारे 22 हजार रुपये व्याज म्हणून द्यावे लागतील.
advertisement
Bajaj Platinaचे पॉवरट्रेन आणि मायलेज
कंपनीने बजाज प्लॅटिन 100 मध्ये 102 सीसी इंजिन दिले आहे. हे इंजिन 7.9 पीएसच्या कमाल पॉवरसह 8.3 Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. तसेच, या बाईकचे वजन सुमारे 117 किलो आहे. या बाईकमध्ये ड्रम ब्रेक दिले आहेत. तसेच, त्यात 11 लिटरची इंधन टँक आहे. ARAI ने दावा केला आहे की या बाईकचे मायलेज प्रति लिटर 70-75 किमी आहे. 11 लिटरच्या इंधन टँकसह, ही बाईक 800 किमी पेक्षा जास्त रेंज देऊ शकते.
advertisement
या बाईकमध्ये डीआरएल, स्पीडोमीटर, फ्युएल गेज, टॅकोमीटर, अँटी-स्किड ब्रेकिंग सिस्टम आणि 200 मिमी ग्राउंड क्लिअरन्स आहे. बाजारात ही बाईक होंडा शाइन, टीव्हीएस स्पोर्ट्स आणि हिरो स्प्लेंडर प्लस सारख्या बाईक्सना थेट स्पर्धा देते. त्याचबरोबर, ही देशातील सर्वोत्तम मायलेज असलेल्या बाईक्सपैकी एक आहे.
view comments
मराठी बातम्या/ऑटो/
एकदा टँक फूल केल्यास 800 KM धावेल ही बाईक! EMI फक्त 5 हजार
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement