34 किमी मायलेज देणाऱ्या Maruti च्या टँकसारख्या कारचा जलवा, Creta ला टाकलं मागे, ठरली नंबर 1

Last Updated:

मारुती सुझुकीने आपली पहिली ५ स्टार सेफ्टी रेटिंग अशी कार लाँच करून खळबळ उडवून दिली होती.

मुंबई : मागील काही वर्षांपासून मार्केटमध्ये दमदार आणि दणकट अशा सेफ्टी फिचर्ससह सज्ज असलेल्या गाड्यांची मागणी वाढली आहे. एकीकडे टाटा आणि महिंद्राने मार्केटमध्ये आपला दबदबा निर्माण केला होता. त्यानंतर मारुती सुझुकीने आपली पहिली ५ स्टार सेफ्टी रेटिंग अशी कार लाँच करून खळबळ उडवून दिली. मारुती सुझुकी डिझायरने आता जुलै महिन्यात सर्वाधिक विक्रीमध्ये नंबर वनची जागा पटकावली आहे. मारुती सुझुकी डिझायरने हुंदईच्या क्रेटालाही मागे टाकलंय.
जुलै महिन्यात सर्वाधिक कार विक्रीची आकडेवारी समोर आली आहे. जुलै महिन्यात टॉप १० मध्ये मारुती सुझुकीने बाजी मारली आहे.  मागील महिन्यात Maruti Suzuki Dzire च्या  20,895 यूनिट्सची विक्री झाली. तर हुंदई क्रेटा 16,898 यूनिट्सची विक्री झाली आहे. या स्पर्धेत डिझायरने नंबर १ चं स्थान पटकावलं आहे. Maruti Suzuki Dzire ही एक सेडान फॅमिली कार आहे. मागील काही वर्षांपासून ती ग्राहकांच्या पसंतीत उतरली आहे.
advertisement
मागील वर्षीच मारुतीने Dzire चं नवी व्हर्जन लाँच केलं. यामध्ये कारचा लूक आणि सेफ्टीमध्ये बदल करण्यात आले होते. त्यामुळे भारत क्रॅश टेस्टमध्ये Maruti Suzuki Dzire ला ५ स्टार सेफ्टी रेटिंग मिळाले होते. डिझायर ही मारुतीची पहिली ५ स्टार सेफ्टी रेटिंग मिळवणारी कार ठरली आहे.  या कारमध्ये 1200cc चं पेट्रोल इंजिन दिलं आहे जे 82 PS आणि 112 Nm टॉर्क जनरेट करतो. या इंजिनसह 5 स्पीड म्यॅनुअल आणि 5 स्पीड AMT दिलं आहे.
advertisement
मायलेज 34 किमी!
पेट्रोलसह डिझायरमध्ये CNG चाही पर्याय दिला आहे. पेट्रोल मोडवर डिझायर 24.79 kmpl आणि CNG मोडवर 34km/kg इतकं मायलेज देते. त्यामुळे अल्पावधीत डिझायरही लोकप्रिय झाली.  डिझायरमध्ये  सेफ्टीसाठी 6 एअरबॅग्स आणि अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टम सारखे स्टँडर्ड फिचर्स दिले आहे. क्रॅश टेस्टमध्ये डिझायरला 5 स्टार रेटिंग मिळाले होते. या कारमध्ये ५ जण आरामात बसू शकतात.
advertisement
डिझायर भारतात सर्वाधिक विक्री करणारी कार ठरली आहे, कारण या कारचं इंजिन हे दमदार आणि मायलेज देणार आहे. कोणत्याही मार्गावर ही कार धोका देत नाही. त्यामुळे ही कार आता ट्रॅव्हल्स व्यवसायामध्ये जास्त पसंतीला उतली आहे. लांबपल्ल्याचा प्रवास आणि शहरात ही कार एक चांगला पर्याय आहे.
SUV सेगमेंटमध्ये हुंडई क्रेटाला चांगली पसंती आहे.  या कारची किंमत 11 लाख रुपयांपासून सुरू होते. त्यामुळे वेगवेगळ्या ऑप्शनमध्ये ही कार विक्रीसाठी उपलब्ध आहे.
advertisement
जुलै 2025 महिन्यात टॉप 10 विक्री होणाऱ्या कार
1. मारूती सुझुकी डिझायर - 20,895 यूनिट्स
2. हुंदुई क्रेटा - 16,898
3. मारूती सुझुकी अर्टिगा 16,604 यूनिट्स
4. मारूती सुझुकी वॅगन आर 14,710 यूनिट्स
5. मारूती सुझुकी स्विफ्ट 14,200 यूनिट्स
6. मारूती सुझुकी ब्रेजा 14,100 यूनिट्स
7. महिंद्रा स्कॉर्पिओ 13,800 यूनिट्स
advertisement
8. मारूती सुझुकी फ्रोंक्स 12,900 यूनिट्स
9. टाटा नेक्सन 12,855 यूनिट्स
10. मारूती सुझुकी बलेनो 12,600 यूनिट्स
मराठी बातम्या/ऑटो/
34 किमी मायलेज देणाऱ्या Maruti च्या टँकसारख्या कारचा जलवा, Creta ला टाकलं मागे, ठरली नंबर 1
Next Article
advertisement
Bollywood Movies: हिरोच बनला खलनायक, बॉक्स ऑफिसवर उडवली खळबळ; तिन्हीही ठरले ब्लॉकबस्टर
: हिरोच बनला खलनायक, बॉक्स ऑफिसवर उडवली खळबळ; तिन्हीही ठरले ब्लॉकबस्टर
    View All
    advertisement