advertisement

सावधान! तुमच्याकडे बाइक किंवा स्कूटर असेल तर अवश्य जाणून घ्या या गोष्टी

Last Updated:

तुमची बाईक किंवा स्कूटर रस्त्यात बंद पडत असेल तर तिची नियमित देखभाल करणे हे गरजेचे आहे. योग्य वेळी सर्व्हिस, इंजिन ऑइल बदल, एयर फिल्टरची स्वच्छता आणि स्पार्क प्लग अवश्य तपासा. बॅटरी आणि टायर प्रेशरही नियमित चेक करा.

ऑटो न्यूज
ऑटो न्यूज
मुंबई : तुमच्याजवळ बाईक किंवा स्कूटर आहे आणि तुम्ही नेहमीच रस्त्यात ब्रेकडाउनचा सामना करत असाल. तर हा चिंतेचा विषय आहे. विशेषतः निर्जन ठिकाणी. पण काही सवयी फॉलो करुन तुम्ही तुमचे वाहन दीर्घकाळ योग्य ठेवू शकता. चला याविषयी सविस्तर जाणून घेऊया.
सर्व्हिसमध्ये कोणताही हलगर्जीपणा करु नका
आपली बाईक किंवा स्कूटरची वेळोवेळी सर्व्हिसिंग करणे खुप गरजेचे आहे. वेळोवेळी सर्व्हिस केल्याने लहान-मोठ्या समस्या लवकर कळतात आणि मोठ्या दुरुस्ती टाळता येऊ शकतात. नेहमी अधिकृत सर्व्हिस सेंटरवर सर्व्हिस करुन घ्या. सर्व्हिस दरम्यान इंजिन ऑइल बदलणे सर्वात महत्त्वपूर्ण असते. कारण हे इंजिनला स्मूथ चालण्यात मदत करतात.
advertisement
दर 1500-2000 किलोमीटरवर किंवा जेव्हा ते गडद किंवा कमी होते तेव्हा इंजिन ऑइल तपासण्याचा आणि बदलण्याचा प्रयत्न करा. तसेच, चेन सेटिंग आणि ल्युब्रिकेशन नियमितपणे तपासा.
एअर फिल्टर साफ करणे
तुमच्या एअर फिल्टरची साफसफाई कधीही दुर्लक्ष करू नका. घाणेरडे एअर फिल्टर इंजिनच्या कामगिरीवर परिणाम करते आणि इंधनाचा वापर वाढवू शकते. तुमच्या वाहनाच्या चांगल्या ऑपरेशनसाठी नियमित स्वच्छता आवश्यक आहे.
advertisement
स्पार्क प्लगची तपासणी करा 
इंजिन स्टार्ट करण्यात नेहमी प्रॉब्लम येणे हे स्पार्क प्लगच्या खराबीमुळे होते. यामुळे दर 1500-2000 किलोमीटरवर स्पार्ग प्लगची स्थिती पाहा आणि गरज पडल्यावर बदलून घ्या.
बॅटरीची देखभाल 
बाईक किंवा स्कूटरची बॅटरीही वेळोवेळी तपासून घेतली पाहिजे. लक्षात ठेवा की, बॅटरीमध्ये लिकेज किंवा दुसऱ्या समस्या असू नयेत. काही समस्या असतील तर लगेच दुरुस्त करुन घ्या.
advertisement
टायर आणि व्हीलची देखरेख 
टायरच्या एयर प्रेशरची तपासणी किंमान आठवड्यातून एकदा करा. योग्य प्रेशर नसल्याने वाहनाच्या परफॉर्मेंसवर परिणाम होतो. सोबतच वेळोवेळी व्हील बॅलेंसिंगही करत राहा. टायर घासले असतील तर फाटत असतील तर ते लगेच बदलून घ्या.
view comments
मराठी बातम्या/ऑटो/
सावधान! तुमच्याकडे बाइक किंवा स्कूटर असेल तर अवश्य जाणून घ्या या गोष्टी
Next Article
advertisement
Shahid Afridi : पाकिस्तानच्या आफ्रिदीने 140 कोटी भारतीयांचं मन जिंकलं, सचिन-विराटला दिलं मानाचं स्थान, Inside Video
पाकिस्तानच्या आफ्रिदीने 140 कोटी भारतीयांचं मन जिंकलं, सचिन-विराटला दिलं मानाचं
  • पाकिस्तानच्या शाहिन आफ्रीदीच्या व्हिडिओची चर्चा

  • सचिन तेंडुलकर विराटशी ठेवलं खास कनेक्शन

  • आफ्रीदीच्या त्या कृतीने भारतीय फॅन्स खुश

View All
advertisement