Bike ला 6 गिअर, मायलेज 200 किमी, एका भारतीय व्यक्तीने बनवलं आजपर्यंतचं दमदार इंजिन!
- Published by:Sachin S
Last Updated:
हे इंजिन कोणत्या इंधनावर चालणार असं तयार केलं आहे. पेट्रोल, डिझेल, CNG, इथेनॉल सारख्या कोणत्याही इंधनावर चालवता येईल.
भारतामध्ये सध्या ऑटो इंडस्ट्रीमध्ये रोज वेगवेगळे प्रयोग होत आहे. सध्या इलेक्ट्रिक वाहनांनी मार्केटमध्ये आपला दबदबा निर्माण केला आहे. पेट्रोल आणि डिझेलचा खर्च वाचवण्यासाठी इलेक्ट्रिक वाहनांना पसंती दिली जात आहे. पण इलेक्ट्रिक वाहनं चार्ज करण्याची समस्या मात्र अजूनही कायम आहे. पण जर तुमची बाईक जर एका लिटरमध्ये 200 किमी मायलेज देईल, असं तुम्हाला कुणी सांगितलं तर खरं वाटेल का? दचकू नका, असा प्रयोग एका भारतीय व्यक्तीने केला आहे. त्याने एक ६ स्ट्रोक बाइक इंजिन बनवलं आहे, जे एका लिटर पेट्रोलमध्ये 200 किमी मायलेज देतंंय.
200 किमी पर्यंत मायलेज
प्रयागराज इथं राहणारे शैलेंद्र कुमार यांनी 18 वर्षांच्या कठोर परिश्रमानंतर हे 6-स्ट्रोक इंजिन तयार केलं आहे. जर या इंजिनला जागतिक उद्योगात मान्यता मिळाली तर ते जागतिक ऑटो इंडस्ट्रीचा चेहराच बदलून जाईल. बाईकच्या सामान्य 4-स्ट्रोक इंजिनला 6 स्ट्रोकमध्ये बदलून, शैलेंद्र आता त्याच्या बाईकपासून 200 किमी पर्यंत मायलेज मिळवत आहेत.
advertisement
शैलेंद्र कुमार यांनी सांगितलं की, हे ६ स्ट्रोक इंजिन केवळ बाईकचे मायलेज सुधारत नाही तर बाईकची शक्ती आणि कार्यक्षमता तीन वेळा वाढवते. हे इंजिन पारंपारिक इंजिनच्या तुलनेत खूप पर्यावरणपूरक आहे. त्यातील धुराचे उत्सर्जन देखील खूप कमी आहे, ज्यामुळे प्रदूषण देखील मोठ्या प्रमाणात नियंत्रित केले जाऊ शकतं, असं शैलेंद्र कुमार यांचं म्हणणं आहे.
advertisement
advertisement
कोणतंही इंधन टाका बाईक चालणारच!
हे इंजिन कोणत्या इंधनावर चालणार असं तयार केलं आहे. पेट्रोल, डिझेल, CNG, इथेनॉल सारख्या कोणत्याही इंधनावर चालवता येईल. शैलेंद्र यांनी त्यांच्या जुन्या बाईकवर संशोधन करून हे इंजिन तयार केलं आहे. त्यांना या इंजिनचे पेटंट देखील मिळालं आहे.
इंजिनसाठी घरदार विकलं
शैलेंद्र यांनी हे इंजिन तयार करण्यासाठी त्यांच्या संपूर्ण आयुष्याची कमाई पणाला लावली आहे. त्यांनी त्यांची संपूर्ण मालमत्ता विकली. ज्यामध्ये त्यांचे वडिलोपार्जित घर देखील समावेश आहे. ते सध्या आर्थिक संकटातून जात आहेत. मुलांना शिक्षण देणे आणि त्यांचे पोट भरणे खूप कठीण आहे.
advertisement
पंतप्रधान मोदींना आवाहन
view commentsशैलेंद्र कुमार हे मूळचे कानपूरचे आहेत. सध्या ते प्रयागराज इथं त्याच्या कुटुंबासह भाड्याच्या घरात राहत आहे. त्यांनी १९८३ मध्ये सीएमपी डिग्री कॉलेजमधून बी.एससी केलं आणि २००७ मध्ये टाटा मोटर्समध्ये काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर, त्यांनी आयआयटी-बीएचयूमध्ये इंजिनांबद्दल शिकलं. त्यांनी पंतप्रधान मोदींना या इंजिनचे व्यावसायिकीकरण करण्याचं आवाहन केलं आहे. त्याचा असा विश्वास आहे की, हे इंजिन देशाच्या आणि जगातील ऑटो उद्योगात मोठा बदल घडवून आणू शकतं.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 02, 2025 10:37 PM IST
मराठी बातम्या/ऑटो/
Bike ला 6 गिअर, मायलेज 200 किमी, एका भारतीय व्यक्तीने बनवलं आजपर्यंतचं दमदार इंजिन!


