Jammu Flood: 'अरे थांब, पुढे नको जाऊ...' स्कॉर्पिओ चालकाने ऐकलं नाही, 2 सेकंदात भयानक घडलं LIVE VIDEO
- Published by:Sachin S
Last Updated:
जम्मू येथील तवी नदीवर मुसळधार पावसामुळे पूर आला आहे. या पुराच्या पाण्यामुळे तवी नदीवरील चौथा पूल कोसळला.
जम्मू-काश्मिरमध्ये पावसाने हाहाकार माजवला आहे. मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. मुसळधार पावसामुळे वैष्णो देवीची यात्रा थांबवण्यात आली आहे. अशातच जम्मूच्या तवी नदीवरचा पूल पुरामुळे खचला. यावेळी अनेक वाहनं हे नदीत कोसळली. सुदैवानने या कोणतीही जीवितहानी झाली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, जम्मू येथील तवी नदीवर मुसळधार पावसामुळे पूर आला आहे. या पुराच्या पाण्यामुळे तवी नदीवरील चौथा पूल कोसळला. अवघ्या काही क्षणात पूल हा खचला. यावेळी पुलावरून वाहतूक सुरू होती. अचानक पुलाचा समोरील भाग खचला आणि मोठा खड्डा पडलाय यावेळी एक स्कॉर्पिओ एसयूव्ही खाली कोसळली. लोकांनी आरडाओरडा करत गाडीतील लोकांना बाहेर येण्याचं आवाहन केलं.
advertisement
जम्मूमध्ये मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे पोलीस प्रशासनाने ठिकठिकाणी उभं राहून प्रवास करण्यास मनाई केली आहे. पण तरीही काही जण या तुफान पावसातून प्रवास करत आहे. अशातच तवी नदीच्या पुलावर ही घटना घडली. तवी नदीच्या परिसरातील लोकांनी प्रवाशांना या भागात प्रवास करू नका, असं आवाहन करत आहे. या भागात प्रवास करण्यास प्रशासनाकडून मनाई केली जात आहे.
advertisement
५ जणांचा मृत्यू
दरम्यान, माता वैष्णो देवीच्या यात्रामार्गावर अर्धकुंवारीजवळ अचानक भूस्खलन झालं. जोरदार आवाजासह डोंगरावरून माती आणि प्रचंड दगड खाली घसरून यात्रेकरूंच्या मार्गावर आले. या भीषण दुर्घटनेत 5 जणांचा मृत्यू झाला असून 14 जण जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने कटरा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डोडा येथे घर कोसळून दोन जणांचा मृत्यू झाला, तर अन्य दोघांचा मृत्यू अचानक आलेल्या पुरात झाला.
advertisement
वैष्णो देवी यात्रा थांबवली
घटनेनंतर लगेच श्राइन बोर्ड, सुरक्षा यंत्रणा आणि एनडीआरएफच्या टीमने बचाव कार्य सुरू केलं आहे. जम्मू शहरातील सुंजवां भागात पाणी शिरल्याने पूरस्थिती निर्माण झाली आहे. श्रद्धाळूंच्या सुरक्षेच्या दृष्टीने वैष्णो देवी यात्रा तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. अर्धकुंवारी ते भवन हा मार्ग बंद केला गेला असून खालचा मार्ग देखील मर्यादित करण्यात आला आहे. सध्या यात्रेवर गेलेल्या भाविकांना सुरक्षित ठिकाणी थांबवण्यात आले आहे. दरम्यान जम्मू-कश्मीरच्या अनेक भागांत मोबाइल आणि इंटरनेट सेवा ठप्प झाली आहे. शाळांनाही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
Location :
Jammu,Jammu and Kashmir
First Published :
August 26, 2025 8:54 PM IST
मराठी बातम्या/ऑटो/
Jammu Flood: 'अरे थांब, पुढे नको जाऊ...' स्कॉर्पिओ चालकाने ऐकलं नाही, 2 सेकंदात भयानक घडलं LIVE VIDEO