HSRP आणि सामान्य नंबर प्लेटमध्ये नेमका फरक काय?

Last Updated:

Difference between HSRP and normal number plate : चला तर जाणून घेऊया, HSRP नंबर प्लेट म्हणजे काय आणि ती सामान्य प्लेटपेक्षा कशी वेगळी आहे.

प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
मुंबई : गाडी चालवताना नंबर प्लेटवरं आपण क्वचितच लक्ष देतो. पण आजकाल तुम्ही पाहिलं असेल, अनेक गाड्यांवर HSRP म्हणजेच High Security Registration Plate लावलेली असते. अनेक राज्यांमध्ये ही प्लेट अनिवार्यही केली आहे. मात्र, अजूनही बऱ्याच वाहनचालकांना HSRP आणि सामान्य नंबर प्लेटमधील फरक ठाऊक नाही.
चला तर जाणून घेऊया, HSRP नंबर प्लेट म्हणजे काय आणि ती सामान्य प्लेटपेक्षा कशी वेगळी आहे.
HSRP म्हणजे काय?
HSRP (High Security Registration Plate) ही भारत सरकारने मान्यता दिलेली एक सुरक्षित आणि स्टँडर्ड नंबर प्लेट आहे. ती चोरी आणि डुप्लिकेट नंबर प्लेटच्या समस्यांपासून वाहनांची ओळख सुरक्षित ठेवण्यासाठी तयार करण्यात आली आहे.
advertisement
HSRP नंबर प्लेटची खास वैशिष्ट्ये:
अ‍ॅल्युमिनियम प्लेट- प्लेट उच्च दर्जाच्या अ‍ॅल्युमिनियमपासून बनवलेली असते.
हॉट स्टॅम्प क्रोमियम होलोग्राम - नंबर प्लेटवर भारताचा चिन्ह असलेला होलोग्राम असतो.
Laser-etched नंबर - गाडीच्या चॅसिस/इंजन नंबरचा कोड लेसरने कोरलेला असतो.
Tamper proof लॉक - प्लेट फक्त एकदाच फिट केली जाऊ शकते; नंतर काढल्यास तोडफोड होईल.
Colour-coded sticker (for fuel type) – विंडशील्डवर इंधन प्रकार (पेट्रोल, डिझेल, CNG, इलेक्ट्रिक) दर्शवणारा स्टिकर असतो.
advertisement
HSRP आणि सामान्य नंबर प्लेट यामधील फरक:
HSRP नंबर प्लेट डुप्लिकेट होणं कठीण, तर सामान्य नंबर प्लेट सहज डुप्लिकेट बनवता येते
HSRP नंबर प्लेट ही भारत सरकारमान्य फॉरमॅट, तर सामान्य नंबर प्लेट कोणत्याही प्रकारची डिझाईन
HSRP नंबर प्लेटवर होलोग्राम आणि कोड होलोग्राम, लेसर कोड, बारकोड तर सामान्य नंबर प्लेटवर कोणतेही कोड नाहीत
advertisement
HSRP नंबर प्लेटवरची फिटिंग पद्धत फक्त सरकारी अधिकृत एजन्सीकडूनच, सामान्य नंबर प्लेट ही कुठेही फिट करता येते.
HSRP नंबर प्लेटची किंमत थोडी अधिक (₹400-₹600 पर्यंत), तर सामान्य नंबर प्लेट स्वस्त (₹100-₹300 पर्यंत).
HSRP नंबर प्लेट का अनिवार्य केली जात आहे?
1. चोरी झालेल्या गाड्यांची ओळख पटवणं सोपं होतं
2. ट्रॅफिक पोलिसांसाठी गाडी ट्रेस करणं सोपं होतं
advertisement
3. गाडीची बनावट नंबर प्लेट वापरणं अशक्य होतं
4. डिजिटायझेशनसाठी महत्वाचं पाऊल
कोणाला HSRP घ्यावी लागते?
सध्या 1 एप्रिल 2019 नंतर खरेदी केलेल्या सर्व गाड्यांमध्ये HSRP प्लेट अनिवार्य आहे.
त्याआधीची वाहने असल्यास, ती बदलणे शिफारसीय असले तरी काही राज्यांमध्ये आता सक्तीने बदलण्याचे आदेश आहेत.
HSRP नंबर प्लेटची किंमत किती?
दुचाकी ₹300 ते ₹400
advertisement
चारचाकी ₹500 ते ₹600
HSRP नंबर प्लेट केवळ सुरक्षिततेसाठी नाही, तर सरकारी नियमांचं पालन करण्यासाठीही आवश्यक आहे. त्यामुळे जर तुमच्याकडे अजूनही सामान्य नंबर प्लेट असेल, तर लवकरात लवकर HSRP नंबर प्लेटसाठी अधिकृत पोर्टलवरून किंवा डीलरकडून बुकिंग करा.
मराठी बातम्या/ऑटो/
HSRP आणि सामान्य नंबर प्लेटमध्ये नेमका फरक काय?
Next Article
advertisement
Bollywood Movies: हिरोच बनला खलनायक, बॉक्स ऑफिसवर उडवली खळबळ; तिन्हीही ठरले ब्लॉकबस्टर
: हिरोच बनला खलनायक, बॉक्स ऑफिसवर उडवली खळबळ; तिन्हीही ठरले ब्लॉकबस्टर
    View All
    advertisement