Car: फॅमिलीसाठी कार घेण्याची आली वेळ, GST मुळे 7 सीटर कार फक्त 5.76 लाखांपासून!
- Published by:Sachin S
Last Updated:
अनेक वाहनांच्या किंमतीत कपात झाली आहे. भारतात स्वस्त कार आणि एसयूव्ही विकणाऱ्या renault रेनॉल्टच्या किंमतीतही कपात झाली आहे.
महागाईने होरपळणाऱ्या सर्वसामान्यांच्या जखमेवर आता GST 2.0 ची मलमपट्टी करण्यात आली आहे. केंद्र सरकारने २८ टक्के जीएसटी स्लॅब रद्द केला आहे. त्यामुळे अनेक वाहनांच्या किंमतीत कपात झाली आहे. भारतात स्वस्त कार आणि एसयूव्ही विकणाऱ्या renault रेनॉल्टच्या किंमतीतही कपात झाली आहे. renault च्या कारमध्ये 40 हजारांपासून ते 96 हजार रुपये कपात करण्यात आली आहे. या नवीन किमती २२ सप्टेंबर २०२५ पासून लागू होतील. पण ग्राहक आधीच कमी किमतीत रेनॉल्ट कार बुक करू शकतात.
renault kwid आता 4.29 लाख रुपयांमध्ये
नवीन जीएसटी स्लॅबसह रेनॉल्ट कार अधिक परवडणाऱ्या झाल्या आहेत. एंट्री-लेव्हल renault kwid आता फक्त ४.२९ लाख रुपयांपासून सुरू होते, तर renault kwid आणि रेनॉल्ट triber ची किंमत ५.७६ लाख रुपयांपासून सुरू होते (एक्स-शोरूम, दिल्ली). व्हेरिएंटनुसार, किंमतीत ४०,०९५ ते ९६,३९५ रुपयांपर्यंत कपात करण्यात आली आहे.

advertisement
kwid 55 हजारांनी स्वस्त
kwid च्या सीरिजमध्ये नवीन रेनॉल्ट kwid च्या किमती ५५,०९५ रुपयांपर्यंत कमी करण्यात आल्या आहेत. आरएक्सई एमटीचा एंट्री व्हेरिएंट आता ४.२९ लाख रुपयांना उपलब्ध आहे, तर टॉप-एंड क्लाइंबर एएमटी डीटीची किंमत ५.९० लाख रुपये आहे.
renault kiger 96 हजारांनी स्वस्त
रेनॉल्टच्या kiger कॉम्पॅक्ट एसयूव्हीमध्ये सर्वात मोठी कपात करण्यात आली आहे, जी ९६,३९५ रुपयांपर्यंत कमी झाली आहे. ऑथेंटिक एमटी आता ५.७६ लाख रुपयांपासून सुरू होते, तर टॉप-स्पेक इमोशन डीटी सीव्हीटी १एलटीची किंमत १०.३३ लाख रुपये आहे.
advertisement
triber सुद्धा झाली स्वस्त
नवीन रेनॉल्ट triber ही एक ७ सीटर लोकप्रिय एमपीव्ही आहे. या triber ७-सीटर एसयूव्हीच्या किंमतीत सुद्धा ८०,१९५ रुपयांपर्यंत कपात करण्यात आली आहे. ऑथेंटिक व्हेरिएंटसाठी आता किमती ५.७६ लाख रुपयांपासून सुरू होते आणि इमोशन एएमटी डीटी व्हेरिएंटसाठी ८.५९ लाख रुपयांपर्यंत जातात.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 08, 2025 7:09 PM IST