Hero मार्केटमध्ये करणार मोठा धमाका, आणतेय इलेक्ट्रिक स्प्लेंडर, किती असेल रेंज?

Last Updated:

लवकरच या कंपनीच्या इलेक्ट्रिक पोर्टफोलिओमध्ये मोठी भर पडणार आहे. स्प्लेंडर ही लोकप्रिय बाइकदेखील इलेक्ट्रिक स्वरूपात येण्याची शक्यता आहे. 

News18
News18
मुंबई : आजचा जमाना इलेक्ट्रिक बाइक्स आणि कार्सचा आहे. बाजारात दररोज नवनव्या इलेक्ट्रिक बाइक्स आणि कार्स दाखल होत आहेत. टीव्हीएस, बजाज या कंपन्यांच्या इलेक्ट्रिक टू-व्हीलर्सनी बाजारात चांगलाच जम बसवला आहे. ओला, एथर वगैरे कंपन्यांच्या ई-बाइक्सही चांगल्या चालल्या आहेत. या सगळ्यात हीरो मोटोकॉर्प ही आघाडीची बाइक उत्पादक कंपनी मात्र काहीशी मागे राहिलेली दिसते. हिरोच्या इलेक्ट्रिक टू-व्हीलर्सच्या यादीत फक्त विदा व्ही वन ही एकच गाडी आहे; मात्र लवकरच या कंपनीच्या इलेक्ट्रिक पोर्टफोलिओमध्ये मोठी भर पडणार आहे. स्प्लेंडर ही लोकप्रिय बाइकदेखील इलेक्ट्रिक स्वरूपात येण्याची शक्यता आहे.
हीरो कंपनी इलेक्ट्रिक मोटरसायकल्सच्या बाबतीत बरंच काही करण्याचं नियोजन करत आहे. 2026 साली विदा लिंक्स ही गाडी सादर करण्याचं नियोजन सुरू आहे. ती एक इलेक्ट्रिक डर्ट बाइक असेल. वर्षाला तिची 10 हजार युनिट्स विकली जातील. हे मॉडेल मुख्यत्वेकरून डेव्हलप इंटरनॅशनल मार्केटसाठी असेल. 2027 साली कंपनी ग्राहक आणि किमतीच्या व्यापक रेंज लक्षात घेऊन इलेक्ट्रिक मोटरसायकल आणण्याचा विचार करील.
advertisement
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हीरो मोटोकॉर्प कंपनी आपल्या आणि देशाच्या सर्वांत लोकप्रिय असलेल्या हीरो स्प्लेंडरच्या इलेक्ट्रिक व्हॅरिएंटवर काम करत आहे. कंपनीच्या इलेक्ट्रिक प्रोजेक्टमध्ये या बाइकचा समावेश आहे. हे प्रॉडक्ट जयपूरमध्ये सीआयटी या टेक्नॉलॉजी सेंटरमध्ये दोन वर्षांपासून तयार केलं जात आहे. 2027मध्ये ते लाँच केलं जाण्याची शक्यता आहे. स्प्लेंडर प्रोजेक्टचं नाव AEDA असं आहे. दर वर्षी सुमारे दोन लाख युनिट्स विकण्याचं नियोजन केलं जात आहे. स्प्लेंडर ही देशातली सर्वांत जास्त विकली जाणारी बाइक आहे.
advertisement
डेली बिझनेस युझर्स किंवा कम्युटर सेगमेंट हे AEDA प्रोजेक्टचं उद्दिष्ट आहे. ADZA प्रोजेक्टअंतर्गत आणखी दोन मोटरसायकल्स बनवण्याचं नियोजन केलं जात आहे. दीडशे सीसी आणि अडीचशे सीसी ICE मॉडेल्सच्या बरोबरीच्या मॉडेल्सचा त्यात समावेश असेल. स्टाइल आणि कामगिरी या दृष्टीने तरुणांना ही मॉडेल्स आकर्षित करतील. 2027-28पर्यंत वार्षिक पाच लाखांहून अधिक इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीचं उद्दिष्ट ठेवण्याचा कंपनीचा विचार आहे. मोटरसायकल्स अडीच लाखांहून अधिक, तर स्कूटर्स अडीच ते तीन लाख असं विक्रीचं उद्दिष्ट असेल. एकंदरीत, येत्या दोन-तीन वर्षांत अनेक नवी मॉडेल्स हीरो कंपनीकडून बाजारात येणार आहेत.
Click here to add News18 as your preferred news source on Google.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
view comments
मराठी बातम्या/ऑटो/
Hero मार्केटमध्ये करणार मोठा धमाका, आणतेय इलेक्ट्रिक स्प्लेंडर, किती असेल रेंज?
Next Article
advertisement
Nagpur News: 'बुलडोजर पॅटर्न'नं घर पाडलं, दंगलीच्या आरोपात चार महिने नवरा तुरुंगात, आता थेट नगरसेवक!
'बुलडोजर पॅटर्न'नं घर पाडलं, दंगलीच्या आरोपात चार महिने तुरुंगात आता थेट नगरसेवक
  • यंदाच्या महापालिका निवडणुकीत अनेक घडामोडी घडल्या असून काही आश्चर्यकारक निकाल ला

  • बुलडोझरच्या धक्क्याने या कुटुंबातील एका महिलेला थेट महापालिकेच्या सभागृहात पोहोच

  • अलिशा खान यांच्या रूपाने 'बुलडोझर पॉलिटिक्स'ला मतदारांनी चपराक दिल्याची चर्चा

View All
advertisement