कारचं ब्रेक अचानक फेल झाल्यास काय करायचं? पाहा या 5 सेफ्टी टिप्स, वाचेल जीव
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
ड्रायव्हिंग करताना खुप सांभाळून करावे लागते. कारण एका चुकीने आपला जीव धोक्यात येऊ शकतो. आज आपण कार ड्रायव्हिंग करतानाची अत्यंत महत्त्वाची गोष्ट जाणून घेणार आहोत.
Emergency Car Driving Tips: कार ड्रायव्हिंग करणं असो किंवा मग बाइक ड्रायव्हिंग, काहीच सोपं नसतं. रोडवर वाहन उतरवल्यानंतर आपली नजर आणि कान हे पूर्णपणे रोडवर असणं गरजेचं असतं. कारण एक चूकही तुमचा आणि तुमच्या कुटुंबाचा जीव धोक्यात घालू शकते. कार चालवत असताना अचानक गंभीर परिस्थिती येऊ शकते. ब्रेक फेल होणं ही त्यापैकी एक समस्या आहे. ज्यामुळे क्षणार्धात दुर्घटना होऊ शकते. पण तुम्ही योग्य वेळी योग्य पाऊलं उचलली तर मोठी दुर्घटना टाळता येते. म्हणूचन अशा परिस्थितीत काय करावं हे जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे. चला जाणून घेऊया...
घाबरू नका
तुमच्या कारचं ब्रेक काम करत नसेल तर सर्वात आधी स्वतःला शांत ठेवा. घाबरुन निर्णय घेऊ नका. स्टीयरिंग मजबूतीने पकडा आणि गाडीला कंट्रोलमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करा. जेणेकरुन तुम्ही कोणालाडी धडक देणार नाही.
वारंवार ब्रेक पॅडल दाबा
यानंतर लगेच वारंवार ब्रेक बॅडल दाबण्याचा प्रयत्न करा. अनेकदा सिस्टममध्ये किरकोळ प्रॉब्लम असतो. जो वारंवार ब्रेक दाबल्याने दुरुस्त होऊ शकतो. यामुळे ब्रेक पुन्हा काम करू लागते आणि गाडीची स्पीड कमी होण्यात मदत होते.
advertisement
इंजिन ब्रेकिंगचा वापर करा
ब्रेकिंग पॅडल काम करत नसल्यास गाडीची स्पीड कमी करण्यासाठी गियर डाउन करा. म्हणजेच गाडी हळु-हळू लोअर गियरमध्ये आणा. यामुळे इंजिनवर दबाव वाढतो आणि गाडी आपोआप स्लो होते.
advertisement
हँड ब्रेकचा योग्य वापर
गाडीचा वेग थोडा कमी होईल, तेव्हा तुम्ही हँड ब्रेकचा वापर करू शकता. मात्र याचा वापर हळुहळू करा. अचानक जोरात हँड ब्रेक लावल्याने गाडी घसरू शकते किंवा कँट्रोलच्या बाहेर जाऊ शकते.
advertisement
गाडी सुरक्षित ठिकाणी न्या
गाडी रस्त्याच्या कडेला किंवा एखाद्या सुरक्षित ठिकाणी नेण्याचा प्रयत्न करा. आजुबाजूला रिकामी जागा, मातीचा रस्ता किंवा हलका चढ दिसला तर गाडी तिकडे न्या. गाडी आपोआप हळुहळू थांबू लागते.
या काळामध्ये हिंमत ठेवणे खुप गरेजचे असते. यासोबतच विचारपूर्वक निर्णय घेणं गरजेचं आहे. घाई-घाईत किंवा घाबरुन निर्णय घेतल्यास स्थिती बिघडू शकते. योग्य निर्णय घेऊन स्वतःला सुरक्षित ठेवू शकता.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 22, 2026 3:54 PM IST








