advertisement

Solapur Crime: प्रियकराच्या प्रेमापोटी प्रेयसीने रचलेला अजब कट, तपासात जे समोर आलं ते ऐकून पोलीसही चक्रावले

Last Updated:

महिलेच्या मैत्रिणी आणि बहिणीची चौकशी केली असता बलात्काराची कोणतीही घटना घडली नसल्याचे स्पष्ट झाले.

News18
News18
सोलापूर : सोलापूरच्या विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत खळबळ उडवून देणाऱ्या सामूहिक बलात्काराप्रकरणाला धक्कादायक वळण मिळाले आहे. स्वतःच्या प्रियकराला जुन्या गुन्ह्यातून वाचवण्यासाठी आणि साक्षीदारांवर दबाव आणण्यासाठी एका महिलेने रचलेला हा 'बलात्काराचा बनाव' पोलिसांच्या सतर्कतेमुळे उघड झाला आहे.
विजापूर नाका परिसरात चार जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची खळबळजनक तक्रार देणारी महिला आणि तिचा प्रियकर यांनीच हा संपूर्ण कट रचल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. जुन्या गुन्ह्यातील फिर्यादी आणि साक्षीदारांना अडकवण्यासाठी स्वतःवर बलात्काराचा खोटा आरोप करणाऱ्या या महिलेसह तिच्या प्रियकराला पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण सोलापूर पोलीस दलात आणि शहरात मोठी चर्चा सुरू झाली आहे.
advertisement

नेमकं प्रकरण काय? 

18 मार्च 2026 रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास एका महिलेने 112 या नंबरवर फोन करून आपल्यावर चार जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची माहिती दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तात्काळ हालचाली केल्या. मात्र, तपासादरम्यान पोलिसांना या घटनेत अनेक विसंगती आढळल्या.

खोटी तक्रार का केली?

तक्टनुसार गुन्हे दाखल होते. 18 सप्टेंबर 2025 रोजी त्याला उच्च न्यायालयाकडून जामीन मिळाला होता. त्या प्रकरणात त्याला 22 डिसेंबर 2023 रोजी अटक झाली होती. नंतर त्याला 1 सप्टेंबर 2025 रोजी उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमधून जामीन मिळाला होता मात्र, या जुन्या प्रकरणातील फिर्यादी आणि साक्षीदारांवर दबाव आणून त्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी या प्रियकर-प्रेयसीने सामूहिक बलात्काराची खोटी कथा रचली.
advertisement

महिलेने दिली कबुली

पोलीस तपासात सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल कॉल डिटेल्स (CDR) आणि वैद्यकीय तपासणी करण्यात आली. तसेच महिलेच्या मैत्रिणी आणि बहिणीची चौकशी केली असता बलात्काराची कोणतीही घटना घडली नसल्याचे स्पष्ट झाले. अखेर पोलिसी खाक्या दाखवताच महिलेने हा सर्व प्रकार बनाव असल्याची कबुली दिली.

दोन्ही आरोपींना अटक

याप्रकरणी विजापूर नाका पोलीस ठाण्यात दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा क्रमांक 199/2026 नोंद करण्यात आला असून भारतीय न्याय संहितेच्या कलम 248, 217 व 61(2) अंतर्गत गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलीस तपास करत आहेत.
advertisement
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Solapur Crime: प्रियकराच्या प्रेमापोटी प्रेयसीने रचलेला अजब कट, तपासात जे समोर आलं ते ऐकून पोलीसही चक्रावले
Next Article
जगातील सर्वात आनंदी देश फिनलंड, सर्वात दुःखी कोण? भारताचा आनंद नेमका कुठे अडकला? या वर्षी पाकिस्तानच्या मागे
जगातील सर्वात आनंदी देश फिनलंड, सर्वात दुःखी कोण? भारताचा आनंद नेमका कुठे अडकला?
  • आर्थिक संकटात असलेला पाकिस्तान भारतापेक्षा जास्त आनंदी?

  • 'वर्ल्ड हॅप्पीनेस रिपोर्ट' वाचून चक्रावून जाल

  • सर्वात आनंदी देश फिनलंड, तर सर्वात दुःखी अफगाणिस्तान

View All
advertisement