advertisement

Dhurandhar 2 बघून भडकली फॅमिली, थिएटरबाहेरच दिल्या 'पाकिस्तान जिंदाबाद'च्या घोषणा, नेमकं घडलं तरी काय?

Last Updated:

Dhurandhar 2 Movie Updates: हा सिनेमा रेकॉर्ड ब्रेकिंग कामगिरी करत असतानाच या फिल्ममुळे मोठा राडा झाल्याचं पाहायला मिळालं. फिल्मच्या थिएटरबाहेर एका कुटुंबाने 'पाकिस्तान जिंदाबाद'च्या घोषणा द्यायला सुरुवात केली.

News18
News18
मुंबई : १९ मार्चला रिलीज झालेल्या 'धुरंधर २' ने पहिल्या दिवसापासून राडा घालायला सुरुवात केली होती. या एकट्या फिल्मने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः त्सुनामी आणली आहे. अवघ्या तीन दिवसात या सिनेमाने ३३९.२७ कोटींची कमाई केली असून जगभरात ५०० कोटींचा आकडा पार केला आहे. हा सिनेमा रेकॉर्ड ब्रेकिंग कामगिरी करत असतानाच या फिल्ममुळे मोठा राडा झाल्याचं पाहायला मिळालं. फिल्मच्या थिएटरबाहेर एका कुटुंबाने 'पाकिस्तान जिंदाबाद'च्या घोषणा द्यायला सुरुवात केली.
सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, जिथे एका पाकिस्तानी कुटुंबाने थिएटरच्या बाहेर जो राडा केला आहे, तो पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. कॅनडामधील थिएटरच्या स्क्रीन तोडल्याची घटना ताजी असतानाच आता युनायटेड किंगडममधून धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये चित्रपट पाहून एक पाकिस्तानी कुटुंब संतापलेलं दिसत असून ते थिएटर बाहेर 'पाकिस्तान जिंदाबाद'च्या घोषणा देत आहेत.
advertisement

धुरंधर २ पाहून संतापलं पाकिस्तानी कुटुंब

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये हे पाकिस्तानी कुटुंब लंडनमधील एका थिएटरमधून बाहेर पडताना दिसतंय. त्यांना फिल्मबद्दल विचारलं असता, कुटुंबातील एका सदस्याने म्हटलं, "अत्यंत वाईट... मी माझ्या संपूर्ण आयुष्यात इतकी भिकार फिल्म पाहिली नाही." त्यांच्यासोबत असलेल्या एका महिलेने "घटियापेक्षाही खालच्या दर्जाचा एखादा शब्द असेल, तर तो या फिल्मसाठी वापरावा," असं म्हणत आपली नाराजी व्यक्त केली. इतकं म्हणून हे कुटुंब थांबलं नाही, तर त्यांनी थिएटरच्या बाहेरच 'मेजर इक्बाल जिंदाबाद' आणि 'पाकिस्तान जिंदाबाद' अशा घोषणा द्यायला सुरुवात केली.
advertisement
advertisement

अक्षय खन्नाचं केलेलं तोंड भरून कौतुक

महत्त्वाची गोष्ट म्हणजे, याच पाकिस्तानी कुटुंबाने धुरंधरच्या पहिल्या भागाचं कौतुक करत सर्वांना ही फिल्म पाहण्याचं आवाहनही केलं होतं. 'धुरंधर २' पाहिल्यानंतर या कुटुंबाने सांगितलं की सीक्वलमध्ये अक्षय खन्नाची प्रचंड उणीव भासली. पहिल्या भागात अक्षयने साकारलेला 'रहमान डकैत' हा तोड नव्हता, असं त्यांचं म्हणणं आहे. या फिल्ममध्ये पाकिस्तानचं केलेलं चित्रण आणि दाखवण्यात आलेल्या सत्य घटना पाहता, या फिल्मला अनेकांनी प्रोपेगेंडा म्हटलं जात आहे, तर भारतात काही राजकीय वर्तुळात याला सरकारी जाहिरात म्हणून हिणवलं जात आहे. पण या वादाचा फिल्मच्या कमाईवर मात्र काडीचाही परिणाम झालेला दिसत नाही. अधिकृतपणे हा सिनेमा पाकिस्तानात बॅन असला, तरी तिथे पायरेटेड व्हर्जनद्वारे हा सिनेमा पाहिला जात असल्याच्या बातम्या येत आहेत.
advertisement

वादाच्या भोवऱ्यात राहूनही 'धुरंधर २' चा राडा

'धुरंधर २' वर वादाचं सावट असतानाही या फिल्मने अवघ्या ३ दिवसांत देशात ३३९ कोटी आणि जगभरात ५०० कोटींहून अधिकची कमाई करत २०२६ मधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या फिल्मच्या यादीत आपलं नाव पहिल्या स्थानावर पक्कं केलं आहे.
advertisement
रणवीर सिंगने या फिल्ममध्ये 'जसकीरत सिंह रंगी' उर्फ 'हमजा अली मजारी' या अंडरकव्हर एजंटची भूमिका साकारली आहे. संजय दत्त, आर. माधवन, अर्जुन रामपाल आणि सारा अर्जुन यांच्या तगडे कलाकार असलेले ही फिल्म भारतातील खऱ्या दहशतवादी हल्ल्यांच्या घटनांपासून प्रेरित आहे.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
Dhurandhar 2 बघून भडकली फॅमिली, थिएटरबाहेरच दिल्या 'पाकिस्तान जिंदाबाद'च्या घोषणा, नेमकं घडलं तरी काय?
Next Article
जगातील सर्वात आनंदी देश फिनलंड, सर्वात दुःखी कोण? भारताचा आनंद नेमका कुठे अडकला? या वर्षी पाकिस्तानच्या मागे
जगातील सर्वात आनंदी देश फिनलंड, सर्वात दुःखी कोण? भारताचा आनंद नेमका कुठे अडकला?
  • आर्थिक संकटात असलेला पाकिस्तान भारतापेक्षा जास्त आनंदी?

  • 'वर्ल्ड हॅप्पीनेस रिपोर्ट' वाचून चक्रावून जाल

  • सर्वात आनंदी देश फिनलंड, तर सर्वात दुःखी अफगाणिस्तान

View All
advertisement