Bajaj च्या साम्राज्याला देणार धक्का, Hyundai आणि TVS ने केली हातमिळवणी, आणतेय हटके गाडी!
- Published by:Sachin S
Last Updated:
बजाज हा भारतातला दुचाकी आणि तीनचाकी वाहनांचं उत्पादन करणारा मोठा ब्रँड आहे. पण, आता बजाज ऑटोला टक्कर देण्यासाठी
भारतात बजाज ऑटो हे नाव कुणी ऐकलं नसेल असं कुणीही सापडणार नाही. बजाज हा भारतातला दुचाकी आणि तीनचाकी वाहनांचं उत्पादन करणारा मोठा ब्रँड आहे. पण, आता बजाज ऑटोला टक्कर देण्यासाठी टीव्हीएस मोटर्स आणि हुंदईने हातमिळवणी केली आहे. टीव्हीएस आणि हुंदई एकत्र येऊन बजाजच्या साम्राज्याला धक्का देण्याच्या तयारीत आहे. दक्षिण कोरियन कंपनी हुंदईने आती टीव्हीएससोबत काही वाहनं लाँच करणार आहे.
त्याचं झालं असं की, या वर्षाच्या सुरुवातीलाच Auto Expo 2025 मध्ये हुंदईने आपले E3W आणि E4W कॉन्सेप्ट्स रिक्षा लाँच केला होता. ही एक आगळेवेगळी ईलेक्ट्रिक रिक्षा आहे. भारतीयांना डोळ्यासमोर ठेवून ही रिक्षा तयार केली आहे. E3W ही रिक्षा हुंदईने खास भारतासाठी डिझाइन केली आहे. हे काम पूर्ण करण्यासाठी हुंडईने टीव्हीएससोबत भागीदारी केली, जेणेकरून भारतीय रस्त्यांवर आणि किफायतशीरतेच्या बाबतीत टीव्हीएसच्या अनुभवाचा फायदा घेता येईल.
advertisement

AutoCar India ला दिलेल्या एका मुलाखतीत हुंदईचे एग्जिक्युटिव्ह व्हाइस प्रेसिडेंट आणि ग्लोबल हेड ऑफ डिझाइन, सांगयूप ली यांनी E3W च्या निर्मितीबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या. 'आम्ही याआधी असं काही डिझाइन केलं नव्हतं. गाडी एखाद्या शानदार डिझाइन स्टुडिओमध्ये बनवण्याऐवजी, आम्ही थेट रस्त्यावर गेलो, जिथे लोकांना विचारलं, आणि रिक्षा वापरणाऱ्यांसोबत वेळ घालवला, जेणेकरून त्यांच्या रोजच्या गरजा चांगल्या समजू शकलो, ही प्रक्रिया जवळपास दोन वर्षे चालली." असं सांगयूप ली यांनी सांगितलं.
advertisement
E3W वेगळी कशी?
E3W ही एक रिक्षा जरी असली तरी तिचं डिझाइन एखाद्या कारपेक्षा कमी नाही. जरी ती हुंदईने डिझाइन केली आहे, तरी त्यावर हुंदईचा अधिकृत लोगो नाही. त्याऐवजी "Designed by Hyundai" असं लिहिलं आहे, त्यामुळे वाटतं की. ती दुसऱ्या ब्रँडखाली विकली जाईल. तिचा बॉक्सी आणि मिनिमलिस्ट डिझाइनही खास आहे. यात एक स्क्रीन दिली आहे, ज्यावर टेक्स्ट दिसू शकतो. E3W असं डिझाइन केलं आहे की मॅन्युफॅक्चरिंग खर्च कमी राहील आणि कोणत्याही गुंतागुंतीच्या प्रक्रियेची गरज भासणार नाही.
advertisement
डिझाइनशिवाय, E3W सध्याच्या रिक्षांपेक्षा मोठी आहे, त्यामुळे प्रवास जास्त आरामदायक आणि मोकळा वाटेल. तिचा व्हीलबेस सामान्य रिक्षापेक्षा 280 मिमी जास्त आहे. यात अॅडव्हान्स्ड इंडिपेंडंट रिअर सस्पेंशन दिलं आहे, त्यामुळे गाडी जास्त स्थिर राहील.

पॉवरफुल बॅटरी
हुंदईने सेफ्टीवरही विशेष लक्ष दिलं आहे. एफिशिएंसीच्या बाबतीत, हुंडईने ड्रायव्हरच्या सीटखाली मोठा बॅटरी पॅक बसवला आहे, त्यामुळे जागेचा चांगला वापर होईल. मोठ्या बॅटरीमुळे रेंजही जास्त मिळेल आणि यात जास्त पॉवरफुल मोटरही देता येईल, त्यामुळे परफॉर्मन्स आणखी चांगला होईल.
advertisement
भारतीय ऑटोमोबाईल मार्केटमध्ये मोठ्या संधी पाहिल्या. हुंदईला वाटतं की भारत जगात सर्वात वेगाने EV स्वीकारणाऱ्या देशांपैकी एक आहे आणि E3W आणि E4W सारखी वाहनं लवकरच भारताच्या पब्लिक ट्रान्सपोर्टचा भाग बनू शकतात. कंपनीला भारताच्या मायक्रो-मोबिलिटी सेक्टरमध्ये मोठा हिस्सा मिळवायचा आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Dec 22, 2025 11:46 PM IST
मराठी बातम्या/ऑटो/
Bajaj च्या साम्राज्याला देणार धक्का, Hyundai आणि TVS ने केली हातमिळवणी, आणतेय हटके गाडी!









