'धुरंधर'चा नादच खुळा! आता शिल्पा शेट्टीलाही चढली FA9LA ची नशा; अक्षय खन्नाच्या हुकस्टेपवर बनवला VIDEO

Last Updated:

Dhurandhar Fa9la Song: शिल्पाने सोशल मीडियावर एक जबरदस्त व्हिडिओ शेअर केला असून, त्यात ती अक्षय खन्नाच्या गाजलेल्या 'FA9LA' गाण्यावर थिरकताना दिसत आहे.

News18
News18
मुंबई: आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर' सिनेमाने सध्या बॉक्स ऑफिसवर नुसता धुराळा उडवला आहे. ५ डिसेंबरला रिलीज झालेला हा सिनेमा केवळ प्रेक्षकांच्याच नाही, तर बॉलिवूड सेलिब्रिटींच्याही पसंतीस उतरला आहे. आता 'धुरंधर'च्या या लाटेत बॉलीवूडची फिटनेस क्वीन शिल्पा शेट्टी देखील सामील झाली आहे. शिल्पाने सोशल मीडियावर एक जबरदस्त व्हिडिओ शेअर केला असून, त्यात ती अक्षय खन्नाच्या गाजलेल्या 'FA9LA' गाण्यावर थिरकताना दिसत आहे.

FA9LA गाण्यावर शिल्पा शेट्टीने धरला ठेका

'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाने साकारलेली 'रहमान डकैत'ची भूमिका आणि त्याची गाण्यातील एन्ट्री सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. शिल्पा शेट्टीनेही हा ट्रेंड फॉलो केला असून, तिने अक्षय खन्नाच्या त्या विशिष्ट डान्स स्टेप्सची हुबेहूब कॉपी केली आहे. व्हिडिओ शेअर करताना शिल्पाने कॅप्शनमध्ये लिहिलंय, "फॅन तर मिळाला नाही, पण मी स्वतः या सिनेमाची फॅन झाली आहे! त्यामुळे हा ट्रेंड करणं तर बनता है!"
advertisement
शिल्पाने केवळ डान्सच केला नाही, तर संपूर्ण टीमवर कौतुकाचा वर्षाव केला. तिने लिहिलं, "रणवीर सिंग, तुझी वेळ आली आहे! तू ही व्यक्तिरेखा अगदी चपखलपणे आणि संयतपणे साकारली आहेस. अक्षय खन्ना, तुझा ऑरा जबरदस्त आहे! आर. माधवन, तुझ्यापेक्षा चांगलं हे कोणीच करू शकलं नसतं. अर्जुन रामपाल तू एक वेगळंच सरप्राईज आहेस आणि संजय दत्त नेहमीप्रमाणे रॉकस्टार आहेस!"
advertisement
advertisement

'ॲनिमल'ला टाकलं मागे; 'धुरंधर' टॉप १० मध्ये!

बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने जे काही केलंय, ते पाहून मोठे मोठे ट्रेड अ‍ॅनालिस्टही चक्रावून गेले आहेत. अवघ्या १७ दिवसांत 'धुरंधर'ने भारतात तब्बल ५५५.७५ कोटींचा गल्ला जमवला आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, या सिनेमाने रणबीर कपूरच्या 'ॲनिमल'चा ५५३ कोटींचा रेकॉर्ड मोडीत काढला आहे. आता भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या टॉप १० चित्रपटांच्या यादीत 'धुरंधर'ने आपलं स्थान पक्कं केलं आहे.
advertisement

मार्च महिन्यात पुढचा राडा, सिक्वेलची तारीख ठरली!

सिनेमा संपल्यानंतर प्रेक्षकांसाठी मेकर्सनी एक मोठं सरप्राईज ठेवलं होतं. चित्रपटाच्या 'पोस्ट-क्रेडिट' सीनमध्ये याच्या सिक्वेलची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. 'धुरंधर २' पुढच्या वर्षी १९ मार्च २०२६ रोजी सिनेमागृहात धडकणार आहे. त्यामुळे पहिल्या भागानंतर आता दुसरा भाग पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर झाले आहेत.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
'धुरंधर'चा नादच खुळा! आता शिल्पा शेट्टीलाही चढली FA9LA ची नशा; अक्षय खन्नाच्या हुकस्टेपवर बनवला VIDEO
Next Article
advertisement
Nagar Parishad Election : ह्याला म्हणतात कमबॅक! पराभवानंतर राजकारणातून संपला म्हणाले, पण पठ्ठ्याने ९ वर्षानं मैदान मारलं
ह्याला म्हणतात कमबॅक! पराभवानंतर राजकारणातून संपला म्हणाले, पण पठ्ठ्याने ९ वर्षा
  • ह्याला म्हणतात कमबॅक! पराभवानंतर राजकारणातून संपला म्हणाले, पण पठ्ठ्याने ९ वर्षा

  • ह्याला म्हणतात कमबॅक! पराभवानंतर राजकारणातून संपला म्हणाले, पण पठ्ठ्याने ९ वर्षा

  • ह्याला म्हणतात कमबॅक! पराभवानंतर राजकारणातून संपला म्हणाले, पण पठ्ठ्याने ९ वर्षा

View All
advertisement