Bangladesh Crisis: '...तर मी आज जिवंत नसतो', बांगलादेशातून कसाबसा सुटला भारतीय कलाकार, सांगितला भयंकर प्रकार

Last Updated:
Bangladesh News: बांगलादेशातून कसाबसा जीव वाचवून परतलेल्या या कलाकाराने तिथला जो स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेला थरार सांगितला आहे, तो ऐकून कोणाचंही काळीज धडधडेल.
1/10
संगीत ही शांततेची भाषा मानली जाते, पण एका भारतीय सरोद वादकासाठी हीच संगीताची सफर आयुष्यातील सर्वात भयावह स्वप्न ठरली. सध्या बांगलादेश जळतोय, तिथे हिंसेचा वणवा पेटला आहे आणि धर्माच्या नावावर रक्ताचे पाट वाहत आहेत.

advertisement
2/10
अशा परिस्थितीत प्रख्यात सरोद वादक शिराज अली खान यांना आपला जीव वाचवण्यासाठी चक्क आपली 'भारतीय' ही ओळख लपवावी लागली. बांगलादेशातून कसाबसा जीव वाचवून परतलेल्या या कलाकाराने तिथला जो स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेला थरार सांगितला आहे, तो ऐकून कोणाचंही काळीज धडधडेल.

3/10
शिराज अली खान १६ डिसेंबर रोजी चार कार्यक्रमांसाठी बांगलादेशात गेले होते. सुरुवातीला वातावरण शांत वाटत होतं, पण अचानक परिस्थिती बिघडली. एका चेकपोस्टवर त्यांना पोलिसांनी अडवलं.

4/10
शिराज सांगतात,
शिराज सांगतात, "मला आधीच सांगण्यात आलं होतं की पासपोर्ट सोबत ठेवू नका. चेकपोस्टवर जेव्हा विचारपूस झाली, तेव्हा मी त्यांना माझं नाव 'शिराज अली खान' असल्याचं सांगितलं. मी भारतीय आहे हे मी जाणीवपूर्वक लपवलं."
advertisement
5/10
त्यांनी पुढे सांगितलं,
त्यांनी पुढे सांगितलं, "नशिबाने माझं आडनाव 'खान' होतं आणि मी स्थानिक ढंगात बांगला बोलू शकत होतो, त्यामुळे मी तिथल्या कट्टरवाद्यांच्या तावडीतून वाचलो. जर त्यांना कळलं असतं की मी भारतीय आहे, तर कदाचित मी आज जिवंत नसतो."
advertisement
6/10
बांगलादेशात सध्या जे सुरू आहे ते भीषण आहे. ईश्वर निंदेच्या खोट्या आरोपाखाली एका हिंदू व्यक्तीला जमावाने जिवंत जाळल्याची घटना घडली. शिराज यांच्या मते, तिथे आता कोणत्याही भारतीयासाठी जागा उरलेली नाही.

7/10
 "तिथे प्रत्येक पाऊलावर भारतीयांना शोधून टार्गेट केलं जातंय. हॉटेलमधील कर्मचाऱ्यांनीही मला बाहेर पडू नका आणि ओळख सांगू नका, असा सल्ला दिला होता. ज्या देशात माझं स्वागत सनई-चौघड्यांनी व्हायचं, तिथेच आज मला चोरट्या पावलांनी फिरावं लागलं," असं त्यांनी सांगितलं.

8/10
शिराज अली खान भारतात सुखरूप परतले असले, तरी त्यांचं मन मात्र अजूनही बांगलादेशातच अडकलेलं आहे. त्याचं कारण म्हणजे त्यांची आई. त्यांचे काही नातेवाईक तिथेच असल्याने त्यांची आई अजूनही बांगलादेशातच आहे. तसेच त्यांचा तबला वादकही तिथे अडकला आहे. भारतीय दूतावासाशी संपर्क साधण्याचे सर्व प्रयत्न अपयशी ठरल्याने शिराज सध्या प्रचंड चिंतेत आहेत.

9/10
शिराज यांनी स्पष्ट केलं की, हा केवळ हिंदू-मुस्लिम असा विषय राहिलेला नाही, तर तिथे आता संपूर्णपणे भारतविरोधी वातावरण तयार झालं आहे. कलाकारांच्या कलेला तिथे आता किंमत उरलेली नाही, तर केवळ धर्माची जात तपासली जात आहे.

10/10
शिराज अली खान यांची ही सुटका म्हणजे एका कलाकाराने मृत्यूच्या दाढेतून शोधलेली पळवाटच आहे. गेल्या काही दिवसांत बांगलादेशातून भारतात परतणाऱ्या लोकांची संख्या वाढली असून, तिथली परिस्थिती हाताबाहेर गेल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे.

Nagar Parishad Election : ह्याला म्हणतात कमबॅक! पराभवानंतर राजकारणातून संपला म्हणाले, पण पठ्ठ्याने ९ वर्षानं मैदान मारलं
ह्याला म्हणतात कमबॅक! पराभवानंतर राजकारणातून संपला म्हणाले, पण पठ्ठ्याने ९ वर्षा
  • ह्याला म्हणतात कमबॅक! पराभवानंतर राजकारणातून संपला म्हणाले, पण पठ्ठ्याने ९ वर्षा

View All
advertisement