आमदार रोहित पवार यांच्या लेकीने केली कौतुकास्पद कामगिरी, काम ऐकून तुम्हीही कराल कौतुक

Last Updated:

महाराष्ट्राच्या समृद्ध कला, संस्कृती आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेचे दर्शन घडवणारी भीमथडी जत्रा सध्या पुण्यात उत्साहात सुरू आहे. याच जत्रेत आमदार रोहित पवार यांची कन्या आनंदिता पवार हिने एक आगळा- वेगळा स्टॉल उभारला आहे.

+
भीमथडी 

भीमथडी 

पुणे: महाराष्ट्राच्या समृद्ध कला, संस्कृती आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेचे दर्शन घडवणारी भीमथडी जत्रा सध्या पुण्यात उत्साहात सुरू आहे. राज्याच्या विविध भागांसह देशाच्या वेगवेगळ्या राज्यांतून आलेल्या कलाकुसरीच्या वस्तूंमुळे ही जत्रा नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे. लोककला, हस्तकला, खाद्यसंस्कृती यांचा सुरेख संगम साधणाऱ्या या जत्रेमुळे महिला बचत गट, लघुउद्योग आणि नवउद्योजकांना मोठी चालना मिळत आहे.
याच जत्रेत आमदार रोहित पवार यांची कन्या आनंदिता पवार हिने ‘अंडीज टी-शर्ट’ या नावाने एक आगळा- वेगळा स्टॉल उभारला असून, तो विशेष चर्चेचा विषय ठरत आहे. शाळकरी वयोगटातील मुलांनी आपल्या सुट्टीच्या दिवसांत स्वतः तयार केलेले सुमारे 250 प्रकारचे हँडमेड, कस्टमाइज्ड टी- शर्ट आणि उटणे या स्टॉलवर विक्रीस उपलब्ध आहेत. या उपक्रमातून मिळणारा संपूर्ण निधी धर्मदाय पशु सेवा केंद्राला देण्यात येणार आहे.
advertisement
आनंदिता पवार हिने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या दोन वर्षांपासून हा उपक्रम सातत्याने राबवला जात आहे. याआधी जमा झालेल्या निधीतून रस्त्यावरच्या भटक्या कुत्र्यांना निवारा मिळवून देण्यासाठी पशु सेवा केंद्राला मदत करण्यात आली आहे. यंदा देखील त्याच उद्देशाने हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. सात मित्र-मैत्रिणींनी मिळून हे टी-शर्ट तयार केले असून, त्यासाठी किमान दहा दिवसांचा कालावधी लागला आहे. एक टी- शर्ट सुमारे 600 रुपयांना विक्रीस असून, हे टी-शर्ट मुख्यत्वे लहान मुलांसाठी डिझाइन करण्यात आले आहेत. या उपक्रमातून अंदाजे दीड लाख रुपयांचा निधी जमा होतो तो सगळा निधी पशु सेवा केंद्राला दिला जातो.
advertisement
भीमथडी जत्रेच्या माध्यमातून केवळ खरेदी-विक्रीच नव्हे, तर समाजभान, दानशीलता आणि उद्योजकतेची मूल्ये रुजवली जात असल्याचे आनंदिताच्या उपक्रमातून दिसून येत आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
आमदार रोहित पवार यांच्या लेकीने केली कौतुकास्पद कामगिरी, काम ऐकून तुम्हीही कराल कौतुक
Next Article
advertisement
Nagar Parishad Election : ह्याला म्हणतात कमबॅक! पराभवानंतर राजकारणातून संपला म्हणाले, पण पठ्ठ्याने ९ वर्षानं मैदान मारलं
ह्याला म्हणतात कमबॅक! पराभवानंतर राजकारणातून संपला म्हणाले, पण पठ्ठ्याने ९ वर्षा
  • ह्याला म्हणतात कमबॅक! पराभवानंतर राजकारणातून संपला म्हणाले, पण पठ्ठ्याने ९ वर्षा

  • ह्याला म्हणतात कमबॅक! पराभवानंतर राजकारणातून संपला म्हणाले, पण पठ्ठ्याने ९ वर्षा

  • ह्याला म्हणतात कमबॅक! पराभवानंतर राजकारणातून संपला म्हणाले, पण पठ्ठ्याने ९ वर्षा

View All
advertisement