Hyundai ने आणली स्पेशल एडिशन, Creta आजपर्यंत अशी कधी पाहिली नसेल!
- Published by:Sachin S
Last Updated:
दक्षिण कोरियन कंपनी ह्युंदई मोटर इंडियाने (Hyundai Motor India) आता भारतामध्ये सण उत्सवाच्या काळात नव्या गाड्यांची सीरिज लाँच केली आहे.
दक्षिण कोरियन कंपनी ह्युंदई मोटर इंडियाने (Hyundai Motor India) आता भारतामध्ये सण उत्सवाच्या काळात नव्या गाड्यांची सीरिज लाँच केली आहे. Hyundai ने Knight Edition लाइनअपचा विस्तार केला आहे आणि ह्युंदाई क्रेटा इलेक्ट्रिक नाईट (Hyundai Creta Electric Knight), ह्युंदाई अल्काझार नाईट (Hyundai Alcazar Knight ) आणि ह्युंदाई आय२० नाईट (Hyundai i20 Knight) लाँच केल्या आहेत. विशेष म्हणजे, या सगळ्या गाड्यांची डिझाईन ब्लॅक रंगामध्ये आहे, त्यामुळे जी आणखी आकर्षक दिसत आहे.
77000 हजार युनिट्सची झाली विक्री
Hyundai ने सांगितलं की, २०२२ मध्ये पदार्पणापासून नाईट एडिशनच्या ७७,००० हून अधिक युनिट्स विकल्या गेल्या आहेत. नवीनतम जोडणीसह, ह्युंदाईच्या नाईट एडिशन श्रेणीमध्ये आता ६ उत्पादनं असून यामध्ये Creta Knight, Venue Knight, Exter Knight, Creta Electric Knight, i20 आणि i20 N Line Knight आणि Alcazar Knight. यासोबतच, कार निर्मात्याने i20, i20 N Line आणि Alcazar मॉडेल लाइनअपमध्ये काही नवीन फिचर्स देखील दिले आहेत.
advertisement

Knight Edition मध्ये नवं काय?
Knight Edition मध्ये मॅट ब्लॅक फ्रंट आणि रीअर Hyundai लोगो, एक्सक्लुझिव्ह नाईट सिम्बॉल, ब्लॅक ओआरव्हीएम आणि रूफ रेल, ब्लॅक साईड सिल गार्निश, ब्लॅक फ्रंट आणि रीअर स्किड प्लेट्स, ब्लॅक रिअर स्पॉयलर आणि ब्लॅक अलॉय व्हील्स लाल ब्रेक कॅलिपर्ससह आहेत. आतील भागात, नाईट एडिशन्समध्ये ब्रास कलर इन्सर्टसह ऑल-ब्लॅक केबिन थीम, स्पोर्टी मेटल पेडल्स आणि ब्रास कलर हायलाइट्ससह ब्लॅक सीट अपहोल्स्ट्री आहे. Hyundai Creta Electric Knight आणि Hyundai Alcazar Knight मध्ये नवीन मॅट ब्लॅक कलर स्कीम देखील आहे.
advertisement
51.4kWh बॅटरी पॅक (लांब रेंज)
view commentsHyundai Creta Electric Knight Excellence 51.4 kWh बॅटरी पॅक (लांब रेंज) आणि 42kWh बॅटरी पॅक पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. पहिला व्हेरियंट ५१० किमी ड्रायव्हिंग रेंज देतो, तर दुसरा व्हेरियंट पूर्ण चार्जवर ४२० किमी रेंज देतो. ह्युंदाई आय२० नाईट १.२ लीटर कप्पा पेट्रोल इंजिनमध्ये दोन व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे. ५-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्ससह स्पोर्ट्झ (ओ) आणि आयव्हीटी ट्रान्समिशनसह एस्टा (ओ). ह्युंदाई अल्काझर नाइट ही सिग्नेचर ७-सीटर प्रकारात येते ज्यामध्ये १.५ लीटर टर्बो GDi पेट्रोल इंजिन (७ स्पीड DCT) आणि १.५ लीटर U2 CRDi डिझेल इंजिन (६ स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन) आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 05, 2025 7:44 PM IST


