5 सीटर गाडीमध्ये 7 लोक बसले आणि पोलिसांनी पकडलं तर काय कारवाई होईल? तुम्हाला वाहातुकेचा हे नियम माहितीय का?

Last Updated:

कार चालवताना किंवा प्रवास करताना अनेक वेळा लोक लहान-लहान नियमांकडे दुर्लक्ष करतात. यामध्येच एक आहे कारमध्ये जास्त लोकांना बसवणं. म्हणजेच ओव्हरलोडिंग.

सोर्स : सोशल मीडिया
सोर्स : सोशल मीडिया
मुंबई : भारतात कार घेणाऱ्या ग्राहकांसाठी सध्या भरपूर पर्याय उपलब्ध आहेत. प्रत्येकजण आपल्या गरजेनुसार आणि कुटुंबातील माणसांनुसार कारची निवड करतो. मात्र, कार घेताना किंवा वापरताना फक्त तिचं लुक्स, मायलेज किंवा ब्रँड बघणं पुरेसं नसतं. तर नवीन वाहन घेताना किंवा पहिल्यांना वाहन घेताना आपल्याला वाहतूकीचे नियम माहित असणं गरजेचं आहे. ज्यामुळे आपल्याला पुढे जाऊन भविष्यात समस्यांना तोंड द्यावं लागत नाही आणि अर्थात दंड देखील भरावा लागणार नाही.
सुरुवातील कार चालवताना किंवा प्रवास करताना अनेक वेळा लोक लहान-लहान नियमांकडे दुर्लक्ष करतात. यामध्येच एक आहे कारमध्ये जास्त लोकांना बसवणं. म्हणजेच ओव्हरलोडिंग. हे फक्त चुकीचंच नाही, तर जीव घेणं ही आहे, यामुळे तुमच्यावर दंडही ठोठावला जाऊ शकतो.
कारमध्ये ओव्हरलोडिंग म्हणजे काय?
जर तुमच्याकडे 5 सीटर कार आहे आणि तुम्ही त्यात 6 किंवा 7 लोकांना बसवत असाल, तर हे ओव्हरलोडिंग नियमाचं उल्लंघन मानलं जातं. मोटर वाहन कायद्याप्रमाणे, वाहनाच्या क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी घ्यायचा किंवा बसवण्याचा प्रयत्न केल्यास 1000 रुपयांचा दंड ठोठावला जाऊ शकतो.
advertisement
ओव्हरलोडिंगचे नियम खासगी कारपुरतेच मर्यादित नाहीत. कमर्शियल वाहनांसाठी हे नियम अधिक कठोर आहेत. जर मालवाहू गाडीत अधिक वजन भरलं गेलं किंवा प्रवासी गाडीत ठरलेल्यापेक्षा जास्त लोक बसवले गेले, तर 20 हजार रुपये दंड आणि त्यासोबत 2000 रुपये प्रती टन अतिरिक्त दंड भरावा लागू शकतो.
इतर वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास होणारा दंड:
विना लायसन्स वाहन चालवल्यास ₹5,000
advertisement
वेगमर्यादा ओलांडल्यास (ओव्हरस्पीडिंग) ₹1,000
दारू पिऊन वाहन चालवल्यास ₹10,000
वाहन इन्शुरन्स नसल्यास ₹2,000
वाहन चालवणं म्हणजे केवळ गाडी स्टार्ट करून रस्त्यावर चालवणं नव्हे, तर ती सुरक्षित आणि नियमबद्धपणे चालवणं गरजेचं आहे. कारण वाहन चालवताना केलेली एक चूक तुमच्या आणि इतरांच्या जीवावर बेतू शकते. म्हणूनच कार किंवा कोणतीही गाडी वापरताना नियम पाळा, सुरक्षित रहा.
मराठी बातम्या/ऑटो/
5 सीटर गाडीमध्ये 7 लोक बसले आणि पोलिसांनी पकडलं तर काय कारवाई होईल? तुम्हाला वाहातुकेचा हे नियम माहितीय का?
Next Article
advertisement
Bollywood Movies: हिरोच बनला खलनायक, बॉक्स ऑफिसवर उडवली खळबळ; तिन्हीही ठरले ब्लॉकबस्टर
: हिरोच बनला खलनायक, बॉक्स ऑफिसवर उडवली खळबळ; तिन्हीही ठरले ब्लॉकबस्टर
    View All
    advertisement