Auto News: जुन्या वाहनधारकांना दिलासा! 20 वर्षांपुढील वाहनांना परवानगी, जाणून घ्या नवे नियम
- Reported by:Pooja Satyavan Patil
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Old Vehicle Re-registration: जुन्या वाहनधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे. आता 20 वर्षांवरील वाहने वापरता येणार आहेत.
पुणे : वाहनधारकांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारने मोटार वाहन कायद्यात बदल करत 20 वर्षांपेक्षा जुन्या वाहनांना वाहतुकीसाठी परवानगी दिली आहे. यामुळे वाहनधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे. यासोबतच सरकारने नवा नियम लागू केला आहे. प्रमाणपत्र नूतनीकरणासाठी आता दुप्पट शुल्क आकारले जाणार आहे. त्यामुळे जुनी वाहने नोंदणीसाठी वाहनधारकांना अधिक पैसे मोजावे लागतील. नव्या निर्णयामुळे जुनी वाहने रस्त्यावर धावण्याचा मार्ग मोकळा झाला असला तरी नूतनीकरणासाठीचा आर्थिक बोजा मात्र वाढला आहे.
जुन्या वाहनांसाठी नूतनीकरण शुल्क दुप्पट
पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयांतर्गत सध्या 40 लाखांहून अधिक वाहनांची नोंद आहे. यामध्ये अनेक 15 वर्षांनंतरही वापरली जाणारी वाहने आहेत. पूर्वी अशा वाहनांच्या पुनर्नोंदणीसाठी पर्यावरण शुल्क भरून सुमारे साडेचार हजार रुपये खर्च येत असे. मात्र, केंद्रीय रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्रालयाने आता 20 वर्षांपुढील वाहनांच्या नोंदणीसाठी नवे शुल्क निश्चित केले आहे. हे नियम केंद्रीय मोटार वाहन (तृतीय सुधारणा) नियम, 2025 या नावाने लागू होणार आहेत. नव्या नियमांनुसार वाहनांच्या नोंदणीसाठी नियमित शुल्कासोबत स्वतंत्रपणे जीएसटीही आकारला जाणार आहे.
advertisement
वाहन घेतल्यानंतर त्याची नोंदणी 15 वर्षांपर्यंत वैध असते. त्यानंतर पर्यावरण कर भरून पुनर्नोंदणी करावी लागते. मात्र, जर वाहनाची नोंदणी केली नाही तर दंड आकारला जातो. दुचाकीसाठी महिन्याला 300 रुपये तर चारचाकीसाठी 500 रुपये दंड निश्चित आहे. तरीही शहरात 17 वर्षांपुढील अनेक वाहने पुनर्नोंदणी न करता वापरली जात असून, याकडे आरटीओकडून मोठ्या प्रमाणावर दुर्लक्ष केल्याची चर्चा आहे.
advertisement
केंद्र सरकारने 20 वर्षांपुढील वाहनांना वापरण्यास परवानगी दिली असली तरी वाढीव नोंदणी शुल्कामुळे वाहनधारकांमध्ये नाराजी आहे. त्यामुळे शुल्क कमी करण्यात यावे, अशी मागणी वाहनधारकांकडून होत आहे.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
Sep 06, 2025 12:03 PM IST
मराठी बातम्या/ऑटो/
Auto News: जुन्या वाहनधारकांना दिलासा! 20 वर्षांपुढील वाहनांना परवानगी, जाणून घ्या नवे नियम









