Tata Sierra ला थेट भिडणार, येतेय Kia Seltos नवी SUV, लूक आला समोर

Last Updated:

नवीन Kia Seltos चा टिझर रिलीज करण्यात आला आहे. टिझरवरून Kia Seltos मध्ये बरेच मोठे बदल करण्यात आले आहे.

News18
News18
टाटा मोटर्सने Sierra लाँच करून मार्केटमध्ये धुरळा उडवून दिला आहे. दमदार फिचर्स आणि कमी किंमतीमुळे Tata Sierra ने मार्केटमध्ये दहशत निर्माण केली आहे. अशातच आता दक्षिण कोरियन कंपनी किया मोटर्स आता आपल्या  Kia Seltos चं नवीन व्हेरियंट लाँच करण्याच्या तयारीत आहे. नवीन जनरेशनची Kia Seltos येत्या १० डिसेंबरला लाँच केली जाणार आहे. त्याआधी Kia Seltos ची झलक आता समोर आली आहे.
नवीन Kia Seltos चा टिझर रिलीज करण्यात आला आहे. टिझरवरून Kia Seltos मध्ये बरेच मोठे बदल करण्यात आले आहे. नव्या Kia Seltos मध्ये  लाइट सिग्नेचरसह नव्याने डिझाइन केलेले LED हेडलॅम्प दिले आहे. एसयूव्हीचा समोरील लूक आणखी आक्रमक असा करण्यात आला आहे. यामध्ये अपडेटेड बोनट, एक अपडेटेड बंपर आणि एक अपराइट स्टांस दिला आहे. नव्या 2026 Kia Seltos मध्ये रूफ रेल्स, नवीन डिझाइनचे अलॉय व्हिल्स आणि  व्हील आर्च दिले आहे. मागे, एक कनेक्टेड टेललॅम्प स्ट्रिप दिली आहे, ज्यामुळे कारचा लूक आणखी हटके असा दिसतो.
advertisement
काय आहे खास फिचर्स?
नवीन Seltos चं सध्या जे मॉडेल मार्केटमध्ये आहे, त्याच्यापेक्षा लांबी आणि रुंदी जास्त असणार आहे. सध्याच्या Seltos ची लांबी 4,365 mm, रूंदी 1,800 mm आणि उंची 1,645 mm इतकी आहे. पण, नव्या Seltos ही जुन्या Seltos पेक्षा मोठी असणार आहे, त्यामुळे आतमध्ये जास्त आरामदायक असणार आहे.  पण नव्या 2026 Kia Seltos च्या इंटीरिअरबद्दल कोणतीही माहिती समोर आली नाही. पण, नव्या Seltos मध्ये कर्व्ड डुअल स्क्रीन सेटअप दिला जाणार आहे. जो आधी Hyundai Creta मध्ये पाहण्यास मिळाला. डॅशबोर्ड डिझाइन आणि कंट्रोल पॅनलच्या वर नव्याने डिझाइन केलं आहे. या शिवाय, नवीन सीट अपहोल्स्ट्री, ट्रिम्स आणि  इतर फिचर्सही दिले आहे.
advertisement
इंजन कसं असेल? 
नव्या Seltos मध्ये नवीन इंजिन आणि  गियरबॉक्स सध्याच्या मॉडेलपेक्षा वेगळा मिळणार आहे. सध्याच्या Seltos 1.5L नॅचुरली एस्पिरेटेड पेट्रोल, 1.5L टर्बो पेट्रोल आणि 1.5L डिझेल इंजिनचा पर्याय आहे. मिळालेल्या माहितीनुसार,   2026 Kia Seltos मध्ये डिझेल इंजिनसह  6-स्पीड ऑटोमॅटिक यूनिट ऐवजी आता  नवीन 7-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्स दिली जाण्याची शक्यता आहे. इंजिन सेटअपमध्ये बदल करण्यात आला आहे.
advertisement
तर  ग्लोबल मार्केटमध्ये नवीन Kia Seltos 2026 एक स्ट्राँग हायब्रिड पॉवरट्रेन सुद्धा दिला आहे. यामध्ये 1.6L पेट्रोल इंजिनसह इलेक्ट्रिक मोटर दिली आहे. हायब्रिड व्हर्जन 2027 मध्ये भारतात लाँच होईल. पण, नव्या मॉडेलमध्ये Kia 1.6L गॅसोलिन मोटरचा वापर करण्याऐवजी 1.5L नॅचुरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजन आणि हायब्रिड रूप देऊ शकतो. या हायब्रिड पर्यायमुळे एसयूव्ही सेगमेंटमध्ये इंधन वाचवणे आणि पर्यावरणाचा विचार करून लाँच केली जाणार आहे.
view comments
मराठी बातम्या/ऑटो/
Tata Sierra ला थेट भिडणार, येतेय Kia Seltos नवी SUV, लूक आला समोर
Next Article
advertisement
Gold Price Prediction: सोन्याच्या बाजारात ऐतिहासिक उलथापालथ! १९७९ चीच पुनरावृत्ती? एक्सपर्टचा धडकी भरवणारा अंदाज
सोनं बाजारात ऐतिहासिक उलथापालथ! १९७९ ची पुनरावृत्ती? एक्सपर्टचा धडकी भरवण
  • सोनं बाजारात ऐतिहासिक उलथापालथ! १९७९ ची पुनरावृत्ती? एक्सपर्टचा धडकी भरवण

  • सोनं बाजारात ऐतिहासिक उलथापालथ! १९७९ ची पुनरावृत्ती? एक्सपर्टचा धडकी भरवण

  • सोनं बाजारात ऐतिहासिक उलथापालथ! १९७९ ची पुनरावृत्ती? एक्सपर्टचा धडकी भरवण

View All
advertisement