आता बुलेट होणार आणखी स्वस्त, रॉयल एनफील्ड आणतेय सगळ्यात स्वस्त BIKE
- Published by:sachin Salve
Last Updated:
जर तुम्हाला रॉयल एनफील्डची दणकट अशी बुलेट विकत घ्यायचा प्लॅन असेल तर थोडं थांबा. कारण रॉयल एनफील्ड आता स्वस्तात मस्त अशी बुलेट आणण्याच्या तयारीत आहे.
मुंबई : जर तुम्हाला रॉयल एनफील्डची दणकट अशी बुलेट विकत घ्यायचा प्लॅन असेल तर थोडं थांबा. कारण रॉयल एनफील्ड आता स्वस्तात मस्त अशी बुलेट आणण्याच्या तयारीत आहे. रॉयल एनफील्ड आता लहान इंजिन असलेल्या बाईकवर काम करत आहे. यापूर्वीही अशी चर्चा होती. पण आता रॉयल एनफिल्ड अशा प्लॅटफॉर्मवर काम करत आहे जे ३५० सीसी पेक्षा लहान इंजिन असणार आहे. त्यामुळे या कमी सीसी इंजिन असलेली बाइकही स्वस्त येईल.
Autocar India ने दिलेल्या वृत्तानुसार, रॉयल एनफील्ड २५० सीसी प्लॅटफॉर्मवर काम करत आहे जे CFMoto कडून घेतलेल्या इंजिनचा वापर करणार आहे. एनफिल्ड इंजिन तंत्रज्ञानाचा परवाना मिळविण्यासाठी चिनी मोटारसायकल कंपनी CFMoto सोबत चर्चा करत आहे.
पहिली हायब्रिड बाईक
कोडनेम V, ही नवीन प्लॅटफॉर्म रॉयल एनफिल्डने भारताच्या इंधन स्टँडर्ट मानकांना आणि आगामी कडक कॉर्पोरेट इंधन कार्यक्षमता (CAFE) उत्सर्जन नियमांना पूर्ण करण्यासाठी काम करत आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, या नवीन प्रकल्पामुळे एनफिल्डला वाढत्या एंट्री-प्रीमियम मोटरसायकल बाजारात प्रवेश करण्यास आणि भविष्यात त्यांच्या पहिल्या हायब्रिड मोटरसायकलचा पाया रचण्यास मदत होईल.
advertisement
२५० सीसी बीएस६ इंजिन
CFMoto चे नवीन २५० सीसी इंजिन सध्याच्या बीएस६ फेज २ मानकांचे आणि आगामी कॅफे मानदंडांचे पालन करेल, ज्यामुळे संपूर्ण फ्लीटमध्ये सुधारित सरासरीची आवश्यकता असेल. हे इंजिन कॉम्पॅक्टनेस, इंधन-कार्यक्षमता आणि हायब्रिड सुसंगतता लक्षात घेऊन विकसित केले गेले आहे. स्पर्धात्मक खर्च राखण्यासाठी आणि भारताच्या 'आत्मनिर्भर भारत' उपक्रमाला पाठिंबा देण्यासाठी रॉयल एनफिल्डने चेन्नईतील त्यांच्या प्लांटमध्ये ८५-९०% स्थानिकीकरण साध्य करण्यासाठी उत्पादन वाढवण्याची योजना आखली आहे. स्थानिकीकरणाची ही उच्च पातळी कंपनीचे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठांना लक्ष्य करत असताना खर्च कार्यक्षमतेवर लक्ष केंद्रित करण्याचे ठरवले आहे. रॉयल एनफील्डच्या वार्षिक उत्पादन १० लाख ते २० लाख युनिट्सपर्यंत वाढवण्याच्या प्लॅन आहे. त्यात २५० सीसी प्लॅटफॉर्म महत्त्वाची भूमिका बजावेल. पण, या नवीन बाईकची किंमत किती असेल, हे मात्र अजून गुलदस्त्यात ठेवण्यात आलं आहे.
Location :
First Published :
May 23, 2025 11:57 PM IST