Marathi Natak : यंदाची दीपावली खास! सुरेल दिवाळी पहाटनंतर नाटकांची मेजवानी, ही घ्या लिस्ट
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Marathi Natak : विजयादशमीचा मुहूर्त साधत नवीन नाटकांची घोषणा करण्याची परंपरा मराठी व्यावसायिक रंगभूमीने यंदाही जपली आहे. दसऱ्याचे औचित्य साधत सहा नव्या नाटकांची घोषणा करण्यात आली आहे.
advertisement
कुणीतरी आहे तिथं : अश्वमी थिएटर्स निर्मित आणि अद्वैत थिएटर्स प्रकाशित 'कुणीतरी आहे तिथ' हे नाटक दिवाळी पाडव्याला रंगभूमीवर येणार आहे. महेश वामन मांजरेकर सादर करीत असलेल्या या नाटकाचं लेखन सुरेश खरे यांनी केलं आहे. तर नाटकाचे दिग्दर्शक कुमार सोहोनी आहेत. नाटकात कोणते कलाकार दिसणार हे अद्याप गुलदस्यात ठेवण्यात आलं आहे.
advertisement
करुणाष्टके : प्रसाद कांबळी यांचं भद्रकाली प्रोडक्शन 'करुणाष्टके' हे नाटक प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन आलं आहे. 'उंबरठचा पलीकडची गोष्ट' अशी नाटकाची टॅगलाइन आहे. या नाटकात अभिनेत्री पर्ण पेठे आणि गीतांजली कुलकर्णी यांच्यासोबत कल्याणी मुळे, केतकी सराफ, माधुरी भारती, किरण खोजे, प्रतीक्षा खासनीस, विनायक चव्हाण हे कलाकार आहेत. प्राजक्त देशमुखनं या नाटकाचं दिग्दर्शन केलं आहे. यंदाच्या दिवाळीत नाटक सुरू होणार आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement