'हौसेला मोल नाही अन् भाऊला तोड नाही', 55 हजारांच्या स्कुटरसाठी 15,44,000 रुपयांची नंबरप्लेट!
- Published by:Sachin S
Last Updated:
हौसेला मोल नसतं, असं आपल्याकडे नेहमी म्हटलं जातंय. त्याामुळे हौसेपोटी माणूस काय करेल, याचा नेम नाही. आपल्या बाईक आणि कारसाठी फॅन्सी नंबर किंवा...
हौसेला मोल नसतं, असं आपल्याकडे नेहमी म्हटलं जातंय. त्याामुळे हौसेपोटी माणूस काय करेल, याचा नेम नाही. आपल्या बाईक आणि कारसाठी फॅन्सी नंबर किंवा लकी नंबर घेण्याची लोकांमध्ये चांगलीच क्रेझ आहे. अशातच एका ५५ हजार रुपयांच्या स्कुटरच्या नंबरसाठी तब्बल १५ लाख ४४ हजार रुपये मोजले असल्याचा प्रकार समोर आला आहे. अधिकृत लिलावामधून ही आकडेवारी समोर आली आहे. चंदीगड शहरातील लोक त्यांच्या आवडत्या क्रमांकासाठी मोठी रक्कम मोजत आहेत, काही प्रकरणांमध्ये ही किंमत वाहनाच्या किमतीपेक्षा वीस पट जास्त आहे.
TOI च्या अहवालानुसार, चंदीगड प्रशासनाच्या नोंदणी आणि परवाना प्राधिकरण (RLA) चे रेकॉर्ड धक्कादायक आहेत. जानेवारी २०२० ते जुलै २०२५ दरम्यान, एक डझन 'फॅन्सी' क्रमांकांचा लिलाव करण्यात आला, ज्यांच्या जिंकण्याच्या बोली त्या कार आणि स्कूटरच्या किमतीपेक्षा खूप जास्त होत्या.
55 हजारांच्या स्कुटरसाठी 15 लाखांचा नंबर
एप्रिल २०२२ मध्ये, एका व्यक्तीने फक्त ५५,५८५ रुपये किमतीच्या स्कुटरच्या नोंदणी क्रमांकासाठी १५.४४ लाख रुपये मोजले होते. याचा अर्थ असा की नंबर प्लेटची किंमत स्कूटर बसवलेल्या नंबर प्लेटपेक्षा जवळजवळ २८ पट जास्त होती. ही एकमेव घटना नव्हती. जून २०२४ मध्ये, ५९,३३६ रुपये किंमतीच्या एका दुचाकीचा नंबर ४.९५ लाख रुपयांना लिलाव झाला.
advertisement
नंबरप्लेटसाठी इतके पैसे का मोजतात?
ऑगस्ट २०२३ मध्ये झालेल्या दुसऱ्या एका घटनेत, ६४,०२४ रुपये किमतीच्या एका वाहनाचा नंबर ५.७५ लाख रुपयांना लिलाव झाला. एकूण १.२८ लाख रुपयांपेक्षा कमी किमतीच्या नऊ दुचाकींना १.७० लाख रुपयांपासून ते १५.४४ लाख रुपयांपर्यंतच्या सिंगल डिजिट फॅन्सी नंबर देण्यात आले होते. ९.५६ लाख ते १३.२२ लाख रुपयांपर्यंतच्या वाहनांना नंबर प्लेट बसवण्यात आल्या ज्याचा लिलाव १२.२१ लाख ते २४.४० लाख रुपयांना झाला होता.
Location :
Punjab
First Published :
September 08, 2025 10:00 PM IST
मराठी बातम्या/ऑटो/
'हौसेला मोल नाही अन् भाऊला तोड नाही', 55 हजारांच्या स्कुटरसाठी 15,44,000 रुपयांची नंबरप्लेट!