Kia ने थाटात लाँच केली Carens Clavis 7 सीटर कार, पण मायलेजचं सत्य अखेर आलं समोर, Ertiga ला हरवलं?

Last Updated:

Kia ने Carens Clavis नावाची एमपीव्ही लाँच केली आहे. ही गाडी थेट मारुती सुझुकीच्या अर्टिगाला टक्कर देत आहे. दमदार फिचर्समुळे या कारची चांगलीच चर्चा आहे.

News18
News18
मुंबई : दक्षिण कोरियन कंपनी असलेल्या किआ मोटर्सने भारतात हटके लूक आणि दमदार फिचर्ससह एसयूव्ही, एमपीव्ही लाँच करण्याचा सपाटा लावला आहे. भारतात एसयुव्ही गाड्यांची क्रेझ पाहता कंपनीने अलीकडेच दोन मॉडेल लाँच केले आहे. दोन्ही एसयूव्हींना चांगला प्रतिसाद आहे. अशातच Kia ने Carens Clavis नावाची एमपीव्ही लाँच केली आहे. ही गाडी थेट मारुती सुझुकीच्या अर्टिगाला टक्कर देत आहे. दमदार फिचर्समुळे या कारची चांगलीच चर्चा आहे. अशातच  ARAI-मंजूर मायलेजचे आकडे अधिकृतपणे आता समोर आले आहे.
Carens Clavis मध्ये ३ इंजिन पर्याय दिले आहे.  ११५ एचपी, १.५-लिटर नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल युनिट, १६० एचपी, १.५-लिटर टर्बो-पेट्रोल मोटर आणि ११६ एचपी, १.५-लिटर डिझेल इंजिन दिलं आहे. तिन्ही इंजिन ६-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्ससह उपलब्ध आहेत, तर डिझेल इंजिनमध्ये ६-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक गिअरबॉक्स देखील आहे. टर्बो-पेट्रोल युनिटमध्ये मॅन्युअल व्यतिरिक्त आणखी दोन ट्रान्समिशन पर्याय आहेत - एक 6-स्पीड iMT आणि एक 7-स्पीड ड्युअल-क्लच ऑटोमॅटिक आहे.
advertisement
 किती मायलेज मिळालं?
Carens Clavis डिझेल सर्वाधिक मायलेज देतं, ६-स्पीड मॅन्युअल मॉडेल हे १९.५४ किलोमीटर प्रति लिटर तर ६-स्पीड ऑटोमॅटिक १७.५० किलोमीटर प्रति लिटर मायलेज देतं. दुसऱ्या स्थानावर स्पोर्टी १.५-लिटर टर्बो-पेट्रोल इंजिन आहे, जे ७-स्पीड ड्युअल-क्लच ऑटोमॅटिकसह १६.६६ किलोमीटर प्रति लिटर आणि ६-स्पीड मॅन्युअल आणि आयएमटी ट्रान्समिशनसह १५.९५ किलोमीटर प्रति लिटर मायलेज देतं. एंट्री-लेव्हल नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन १५.३४ किलोलिटर मायलेज देतं, जे फक्त ६-स्पीड मॅन्युअल कॉन्फिगरेशनमध्ये उपलब्ध आहे.
advertisement
maruti ertiga पेक्षा कमीच मायलेज
आता मार्केटमध्ये याच सेगमेंटमध्ये असलेल्या इतर गाड्यांची तुलना ही kia carens clavis शी केली असता कॅरेन्स क्लॅव्हिस ही मार्केटमध्ये असलेल्या इतर गाड्यांपेक्षा कमी निघालं आहे. जसं की मारुती सुझुकी XL6 (20.27-20.97kpl), एर्टिगा (20.30-26.11kpl), आणि टोयोटा रुमियन (20.11-26.11kpl), ज्यापैकी नंतरचे दोन अत्यंत किफायतशीर CNG पर्याय देखील देतात. पण, हे लक्षात घेण्यासारखे आहे की कॅरेन्स क्लॅव्हिसमधील सर्व इंजिन अधिक शक्तिशाली आहेत.
advertisement
७ ट्रिम्समध्ये उपलब्ध असलेली किआ २३ मे रोजी कॅरेन्स क्लॅव्हिसच्या किंमती जाहीर करणार आहे. ही एमपीव्ही ६ आणि ७-सीट कॉन्फिगरेशनसह ७ ट्रिम लेव्हलमध्ये उपलब्ध असणार आहे. HTE, HTE(O), HTK, HTK+, HTK+(O), HTX आणि HTX+. तसंच, ६-सीटर लेआउट फक्त कॅरेन्स क्लॅव्हिसच्या टॉप-स्पेक HTX+ ट्रिममध्ये उपलब्ध असेल. कॅरेन्स क्लॅव्हिसची किंमत सध्याच्या कॅरेन्सपेक्षा जास्त असण्याची अपेक्षा आहे, परंतु किआ फेसलिफ्ट केलेल्या  मॉडेलसह सध्याचे मॉडेल विक्री ही सुरूच असणार आहे.
मराठी बातम्या/ऑटो/
Kia ने थाटात लाँच केली Carens Clavis 7 सीटर कार, पण मायलेजचं सत्य अखेर आलं समोर, Ertiga ला हरवलं?
Next Article
advertisement
एकही सिनेमा केला नाही, तरीही बी टाऊनमध्ये सर्वात श्रीमंत; संपत्तीत शाहरुखलाही सोडलं मागे
एकही सिनेमा केला नाही, तरीही बी टाऊनमध्ये सर्वात श्रीमंत; शाहरुखलाही सोडलं मागे
    View All
    advertisement