Tata Nexon आणि Creta ची किंमत होणार कमी, मोदी सरकारकडून मोठ्या हालचाली सुरू, इतके पैसे वाचतील!
- Published by:Sachin S
Last Updated:
मोदी सरकारने GST च्या करप्रणालीमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे याचा परिणाम भारतातील सगळ्याच क्षेत्रात होणार आहे.
मागील अनेक वर्षांपासून GST च्या करप्रणालीमध्ये बदल करण्याची मागणी होत होती. पण आता अखेरीस मोदी सरकारने GST च्या करप्रणालीमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे याचा परिणाम भारतातील सगळ्याच क्षेत्रात होणार आहे. ऑटो इंडस्ट्रीचा विचार केला तर छोट्या कार या आता आणखी स्वस्त होणार अशी शक्यता वर्तवली जात आहे. कारण, मोदी सरकाने दिवाळीच्या आधी 28 टक्के GST कर रद्द करून तो 18 टक्क्यांवर आणण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, भारतात कार आणि एसयूव्हीवर त्यांची क्षमता जसे लांबी, इंजिन पाहून GST आकारला जात असतो. त्यामुळे GST मध्ये कपात केली तर इतर गाड्यांना किती फायदा होईल हे पाहण्याचं ठरणार आहे.
Tata Nexon आणि Creta ची किंमत होईल का कमी?
ज्या SUVs ची लांबी ही 4 मीटर पेक्षा जास्त आहे, त्यांना GST कपातचा फायदा होणार आहे. पण लांबीच्या गाड्यांना याचा फटका बसण्याची शक्यता आहे. Tata Nexon ची लांबी 4 मीटरपेक्षा कमी आहे. त्यामुळे या कारच्या किंमतीत जवळपास 80 हजार रुपये कमी होऊ शकतात. तर दुसरीकडे हुंदई क्रेटाची लांबी ही 4 मीटरपेक्षा जास्त आहे. त्यामुळे क्रेटाला कमी फायदा होईल. कारण क्रेटाची लांबीही थोडी जास्त आहे. पण तरीही क्रेटाच्या किंमतीत 55 हजार 585 रुपयांची कपात होणार आहे. कारण, मोठ्या एसयूव्हीच्या किंमती या ४० टक्के GST स्लॅबमध्ये जाणार आहे.
advertisement
Tata Nexon
टाटा नेक्सॉनमध्ये 1.2 लिटर टर्बो पेट्रोल (120PS/170Nm) आणि 1.5 लिटर डिझेल (115PS/260Nm) इंजिनांचा समावेश आहे. हे इंजिन 120 बीएचपी आणि १७० एनएम पीक टॉर्क जनरेट करते. पेट्रोल इंजिनमध्ये पूर्वी फक्त 6 स्पीड एमटी आणि 6 स्पीड एएमटी ऑप्शन होते. तर, आता या गाडीत 5 स्पीड एमटी आणि 7 स्पीड डीसीए देखील ऑफर करण्यात आली आहे. डिझेल इंजिन 6 स्पीड एमटी आणि 6 स्पीड एएमटी ऑप्शनसह आहे. ग्राउंड क्लिअरन्स 1 मिमीनं कमी होऊन 208 मिमी आहे. तसंच बूट स्पेस 382 लिटरपर्यंत वाढवण्यात आहे.
advertisement
Hyundai Creta
Hyundai Creta 2025 मध्ये तीन इंजिन पर्याय आहेत: 1.5L नैसर्गिकरित्या एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन जे 17.4 ते 18.2 किमी प्रति लिटर पर्यंत मायलेज देते, 1.5L टर्बो पेट्रोल इंजिन जे अधिक पॉवर आणि रिफाइनमेंटसाठी ओळखले जाते आणि 1.5L डिझेल इंजिन जे 21.8 किमी प्रति लिटर पर्यंत उत्तम इंधन कार्यक्षमता देते. ही इंजिने मॅन्युअल, सीव्हीटी आणि 7-स्पीड डीसीटी ट्रान्समिशन पर्यायांसह उपलब्ध आहेत, जी वेगवेगळ्या ड्रायव्हिंग स्टाइलला समर्थन देतात.
advertisement
सध्या किती टॅक्स लागतो?
view commentsसध्या पेट्रोल गाड्यांवर ज्यांची लांबी ४ मीटर पेक्षा कमी आहे आणि इंजिन 1.2 लिटरपर्यंत आहे, त्यांच्यावर 28% GST सह 1% सेस आकारला जातो. तर,मोठ्या पेट्रोल आणि डिझेल कारवर ज्यांची लांबी 4 मीटरपेक्षा जास्त आहे आणि इंजिन 1.5 लिटरपेक्षा मोठं आहे, त्यांच्यावर 28% GST आणि 3% ते 15 टक्के सेस आकारला जातो. त्यामुळे एकूण टॅक्स 31% ते 43% टक्क्यांपर्यंत पोहोचतो.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 03, 2025 8:26 PM IST
मराठी बातम्या/ऑटो/
Tata Nexon आणि Creta ची किंमत होणार कमी, मोदी सरकारकडून मोठ्या हालचाली सुरू, इतके पैसे वाचतील!


