advertisement

Rajdoot ची वेळ नव्हती तिचा काळ होता, पण त्या एका कंपनीमुळे मार्केटमधून झाली गायब!

Last Updated:

एकेकाळी रस्त्यांवर सत्ता गाजवलेली बाईक आत्ता दिसत नसली तरीही उत्पादन बंद झाल्यानंतर 34 वर्षांनीही बाईकप्रेमींच्या मनांतलं मात्र राजदूतचं स्थान अढळ आहे.

News18
News18
भारतात स्वातंत्र्यानंतर काही कंपन्या उदयाला आल्या आणि त्या उद्योजकांनी अथक प्रयत्न करून देशात औद्योगिक क्रांती घडवली. शेती, ऑटोमोबाईल, दुग्धोत्पादन, अंतराळविज्ञान, अणुविज्ञान अशा सगळ्याच आघाड्यांवर भारताने भरारी मारली. भारतासारख्या मोठ्या विस्तार असलेल्या देशात रस्ते वाहतुकीचा पाया तयार करणाऱ्या कंपन्यांमध्ये जसं टाटा, अशोक लेलँड या कंपन्यांची नावं घेतली जातात तसं, दुचाकी क्षेत्रात प्रवासी वाहतूक करणारी वाहन उत्पादन करणाऱ्या कंपन्यांमध्ये यझदी, रॉयल एनफिल्ड आणि राजदूत यांची नावं आहेत. यापैकी कधीकाळी राजदूत या जनसामान्यांच्या मनांवर राज्य करणाऱ्या मोटरसायकलचा इतिहास जाणून घेऊ या.
राजदूत मोटरसायकल ही भारतातील एक प्रतिष्ठित मोटरसायकल होती. हा ब्रँड विविध कारणांनी हिंदुस्थानात लोकप्रिय होता. राजदूत मोटरसायकल्स दणकटपणा आणि टिकाऊपणासाठी अत्यंत प्रसिद्ध आणि लोकप्रिय होत्या. विशेषत: ग्रामीण भागांतील रस्त्यांवर ती सत्ताच गाजवायची.
इतिहास
हरप्रसाद नंदा यांनी 1948 मध्ये एस्कॉर्ट्स लिमिटेड कंपनीची स्थापना केली होती. 1960 में एस्कॉर्ट्स ने जर्मन कंपनी फोर्ड राइनशी करार करून 1962 मध्ये राजदूत ही पहिली मोटरसायकल भारतीय रस्त्यांवर लाँच केली होती. ही बाईक फोर्ड राइन Taunus 175 या बाईकचं भारतीय रूप होतं.
advertisement
राजदूत 175 भारतीय बाजारात खूप वेगाने लोकप्रिय झाली होती. दणकटपणा, मायलेज आणि परवडणारी किंमत यामुळे ही बाईक सामान्य भारतीयाची लाडकी झाली. राजदूतने 1970 च्या दशकात भारतीय मोटरसायकल बाजारापेठेचा 60 टक्क्यांहून अधिक भाग व्यापला होता. राजदूत 175, 250, 350 आणि 500cc सहित अनेक मॉडल्स तेंव्हा आली होती. राजदूत मोटरसायकल्स पोलीस, संरक्षण दलं आणि सरकारी विभागांतील अधिकारी करायचे.
advertisement
ही होती मॉडेल्स
राजदूत 175 सर्वाधिक लोकप्रिय मॉडेल होतं जे 1962 ते 1985 पर्यंत कंपनी तयार करत होती. राजदूत 250 हे अधिक शक्तिशाली मॉडेल कंपनीने 1970 च्या दशकात बाजारपेठेत उतरवलं होतं. राजदूत 350 हे मॉडेल 1983 मध्ये ग्राहकांच्या सेवेत रुजू झालं हे त्यावेळचं एक स्पोर्टी मॉडेल होतं. या मॉडेलला तेंव्हा ‘ब्लॅक विडो’ असं टोपणनावही मिळालं होतं. कंपनीने 1985 मध्ये राजदूत 500 हे सगळ्यात शक्तीशाली मॉडेल बाजारात आणलं होतं. राजदूत 350 ही भारतात तयार झालेली पहिली डिस्क ब्रेक असणारी मोटरसायकल होती.
advertisement
अस्ताला सुरूवात
जपानी बाईक उत्पादकांनी भारतीय बाजारपेठेत 1980 च्या दशकात प्रवेश केला. जपानी बाईक्स अत्याधुनिक, स्टायलिश आणि अधिक मायलेज देणाऱ्या होत्या. त्यामुळे हळूहळू नव्या पिढीला या बाईक्स आवडू लागल्या आणि राजदूतची विक्री कमी होऊन 1990 च्या दशकात कंपनीने राजदूत बाईकचं उत्पादन बंद केलं. 2005 मध्ये एस्कॉर्ट्सने मोटरसायकल व्यवसायातूनच बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. आता राजदूत पुन्हा रस्त्यांवर धावण्याची शक्यता खूपच धूसर आहे.
advertisement
त्या काळात चित्रपट आणि टीव्ही मालिकांमध्ये राजदूत बाईक्स वापरल्या जायच्या. या बाईकला 2 स्ट्रोक इंजिन असायचं, जे शक्तीशाली आणि मायलेज देणारं असायचं. पण त्यामुळे प्रदूषण व्हायचं. या बाईकला इलेक्ट्रिक स्टार्ट सोय नव्हती त्यामुळे पायांनी ढकलून गाडी पुढे नेली की ती सुरू व्हायची. बाईकला 4-स्पीड गिअरबॉक्स आणि सिंगल-बीम हेडलाईट, सिंगल-बीम टेललाईट आणि सिंगल-सीट किंवा डबल-सीट असायचं. अशा वैशिष्ट्यांनी या बाईक्स सुसज्ज होत्या. आताच्या बाईक्सच्या तुलनेत राजदूत बाइकमध्ये आधुनिक इलेक्ट्रॉनिक्स पार्ट्स नव्हते,त्यामुळे त्यांची निगा राखणं कठीण जायचं.
advertisement
जरी ही बाईक आज तयार होत नसली तरीही जुनी राजदूत बाईक रस्त्यावरून धावत असेल तर आजची तरुणाईही मागे वळून त्या बाईककडे पाहत राहते. एकेकाळी रस्त्यांवर सत्ता गाजवलेली बाईक आत्ता दिसत नसली तरीही उत्पादन बंद झाल्यानंतर 34 वर्षांनीही बाईकप्रेमींच्या मनांतलं मात्र राजदूतचं स्थान अढळ आहे.
view comments
मराठी बातम्या/ऑटो/
Rajdoot ची वेळ नव्हती तिचा काळ होता, पण त्या एका कंपनीमुळे मार्केटमधून झाली गायब!
Next Article
PBKS vs GT : आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
  • आयपीएलमध्ये पहिल्यांदाच असं घडलं

  • शेवटच्या ओव्हरला काय घडलं

  • सोशल मीडियावर प्रचंड टीका

View All
advertisement