Sonam Raghuvanshi: किलर सोनम, राजा आणि स्कुटर! पर्यटनस्थळी तुमच्यासोबतही होऊ शकतो असा 'गेम'
- Published by:sachin Salve
Last Updated:
शिलाँगमध्ये फिरण्यासाठी त्यांनी एक स्कुटर रेंटवर विकत घेतली होती. या स्कुटरमुळे सोनम चांगलीच अडचणीत सापडली
मुंबई : संपूर्ण देशाला हादरावून सोडणाऱ्या सोनम आणि राजा रघुवंशी प्रकरणामुळे समाज मन ढवळून निघालं आहे. प्रियकरासोबत लग्न झालं नाही म्हणून अवघ्या आठवड्याभरात नवरा राजा रघुवंशीचा एखाद्या सिनेमाला लाजवेल असा कट रचून खून केला. लग्नानंतर दोघेही हनिमूनला गेले होते, त्यावेळी शिलाँगमध्ये फिरण्यासाठी त्यांनी एक स्कुटर रेंटवर विकत घेतली होती. या स्कुटरमुळे सोनम चांगलीच अडचणीत सापडली आहे. जर तुम्ही अशा प्रकारे कुठे पर्यटनाला गेला तर स्कुटर किंवा बाइक रेंटवर घेण्यासाठी या गोष्टी नक्की तपासून पाहा.
मध्य प्रदेशमधील इंदूर इथं राहणाऱ्या सोनमने प्रियकराच्या मदतीने नवरा राजा रघुवंशीचा अत्यंत थंड डोक्याने काटा काढला. लग्नानंतर सोनमने मृत पती राजाला घेऊन हनिमूनसाठी मेघालय शिलाँगला गेले होते. शिलाँग शहरात फिरण्यासाठी सोनम आणि राजाने एक स्कुटर रेंटवर विकत घेतली होती. जेव्हा सोनम ही मृत पती राजाला निर्जनस्थळी घेऊन जात होती, तेव्हा दोघेही एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. राजाने ही स्कुटर रेंटवर घेतली होती.
advertisement
स्कुटर रेंटवर घेण्याआधी हे कराच!
जर तुम्ही पर्यटनस्थळी स्कुटर घेणार असाल तर आधी तिची पूर्ण पाहणी करा. टायरमध्ये हवा, ब्रेक बरोबर काम करताय ना, हँडल व्यवस्थिती आहे ना, कुठे स्कुटर डॅमेज तर नाही ना हे नक्की पाहावे. स्कुटरवर प्रवास करताना नेहमी हेल्मेटचा वापर करा, स्कुटरमध्ये सेफ्टी टुल्सचा वापर करा.
या गोष्टी न चुकता तपासा
स्कुटर कंट्रोल, फिचर्स आणि सेफ्टी सिस्टम आधी समजून घ्या, स्कुटरचे डॉक्युमेंट्स नीट पाहून घेतले पाहिजे. तुमच्याकडे अशावेळी ड्रायव्हिंग लायसन्स आणि परवाना असणे आवश्यक आहे. शहारातील वाहतुकीचे नियम समजून घ्या, स्कुटरचं रेंट, वेळ, किंमत आणि किती रक्कम जमा केली आहे, याची माहिती आधी घ्या.
advertisement
स्कॅमरपासून सावध राहा
पर्यटनस्थळी स्कुटर रेंट देण्याच्या नावाखाली नेहमी फसवणूक होत असते. त्यामुळे स्कुटर रेंटवर घेताना स्कुटरचा पूर्ण व्हिडीओ किंवा फोटो काढून ठेवा, कारण जेव्हा तुम्ही स्कुटर परत करतात तेव्हा कुठे तरी डॅमेज झालं आहे असं सागून तुमच्याकडून पैसे उकळले जातात. एवढंच नाहीतर काही स्कॅमर हे तुम्हाला आणखी अडचणीत आणण्यासाठी प्रयत्नही करतात, यासाठी ते पोलिसांचीही धमकी देतात. त्यामुळे अशा वेळी स्कुटर रेंटवर घेण्याआठी नीट पडताळणी करून व्हिडीओ किंवा फोटो काढून ठेवा.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
June 09, 2025 5:53 PM IST
मराठी बातम्या/ऑटो/
Sonam Raghuvanshi: किलर सोनम, राजा आणि स्कुटर! पर्यटनस्थळी तुमच्यासोबतही होऊ शकतो असा 'गेम'