Suniel Shetty First EV : 519 रुपयात महिनाभर चालते सुनील शेट्टीची इलेक्ट्रिक कार! किंमत ऐकून घाम फुटेल
- Published by:Minal Gurav
Last Updated:
भारतीय मार्केटमध्ये इलेक्ट्रिक गाड्यांची मागणी वाढत चालली आहे. दररोज वाढणाऱ्या पेट्रोलच्या किंमतीपेक्षा लोक इलेट्रिक कार चालवण्याला प्राधान्य देत आहेत. अभिनेता सुनील शेट्टीनं नवी खरेदी केली आहे.
फक्त सर्वसामान्य लोक नाही तर बॉलिवूड कलाकार देखील इलेक्ट्रिक कार खरेदी करण्यावर भर देत आहेत. अभिनेता सुनील शेट्टी यानं देखील त्याची पहिली इलेक्ट्रिक कार खरेदी केली आहे.

advertisement
MG Comet EV ही इलेक्ट्रिक कार सुनील शेट्टीनं खरेदी केली. सुनीलनं सोशल मीडियावर त्याच्या नव्या कारचे फोटो शेअर केलेत.
[caption id="attachment_1101603" align="aligncenter" width="1200"]
" width="1200" height="900" /> एकीकडे बॉलिवूड सेलिब्रेटी कोटी रुपयांच्या लग्झरी कार खरेदी करत असताना सुनील शेट्टीनं स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक कार खरेदी केली आहे.[/caption]

advertisement

MG Comet EV या कारची सुरूवातीची किंमत 7.98 लाख रूपये आहे. 2023 वर्षातच ही कार भारतीय मार्केटमध्ये लाँच करण्यातआली आहे. सिंगल चार्जमध्ये ही कार 230किमी रेंज देते.
advertisement

कंपनीचा दावा आहे की, याची रनिंग कॉस्ट किंमत 519 रूपये प्रतिमाह आहे. म्हणजेच दररोज चार्जिंग करण्यासाठी तुम्हाला 17 रूपये खर्च करावे लागतील. ही कास्ट 1000 किमी ड्राइव्हनुसार करण्यात आली आहे.
advertisement
[caption id="attachment_1101606" align="aligncenter" width="1200"]
" width="1200" height="900" /> MG Comet EVकारमध्ये 10.25 इंचाचा टचस्क्रिन इंफोटेमेंट सिस्टिम देण्यात आली आहे. स्टीअरिंग व्हिलवर कंट्रोल बटन्स बसवण्यात आलेत.ipad वर प्रेरित होऊन हे डिझाइन तयार करण्यात आलंय.[/caption]

advertisement

लेस एंट्री, इलेक्ट्रिकली एड्जेस्टेबल आऊट साइड रियर व्यू मिरर, टिल्ट एड्जेस्टेबल स्टीअरिंग व्हील, 50:50 रेशियोमध्ये फोल्ड होणारी रिअर सीट्सनं कारचं इंटिरिअर तयार करण्यात आलं आहे.
advertisement

कारमध्ये 17.3kWh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. याची इलेक्ट्रिक मोटर 41bhp पावर आणि 110Nmचा टॉर्क जनरेट करण्याची क्षमता आहे.

कंपनीचा दावा आहे की 3.3kWमध्ये चार्ज होण्यासाठी या कारला जवळपास 7 तासांचा कालावधी लागतो. 5 तासात बॅटरी जवळपास 80 टक्के चार्ज होते.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 25, 2023 4:11 PM IST
मराठी बातम्या/ऑटो/
Suniel Shetty First EV : 519 रुपयात महिनाभर चालते सुनील शेट्टीची इलेक्ट्रिक कार! किंमत ऐकून घाम फुटेल